द्राक्षाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कलर येऊन शरद एक्सपोर्ट

श्री. रमेश सुर्वे, मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक द्राक्ष फ्लेम, क्षेत्र - ३० गुंठे


लाखलगाव येथील बरेच शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी औषधे वापतात. मला माझे परशुराम कांडेकर यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी सांगितले. म्हणून मी माझ्या नवीन ही औषधे वापरून पहिल्याच वर्षी उत्पन्न घेण्याचे ठरविले.

त्यानुसार वेळापत्रकाप्रमाणे नवीन द्राक्षबागेल औषधे वापरली. जर्मिनेटरमुळे हुंडीची वाढ चांगली झाली. थ्राईवर व क्रॉपशाईनर वापरल्यामुळे पाने जाड, रुंद होऊन मे अखेर ओलांडे व काडी तयार झाली. राईपनर वापरल्यामुळे काडी व्यवस्थित पक्व झाली. ऑक्टोबर छाटणीला पेस्टमध्ये जर्मिनेटर (१० मिली / १ लि.) वापरले. फुट एकसारखी होऊन माल भरपूर निघाला. थ्राईवर व क्रॉपशाईनरची फवारणी केली असता घड अजिबात जिरले नाही, नान्ते फ्लॉवरींग, सेटींग, फुगवणीचेवेळी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर या औषधांच्या फवारण्या केल्या. त्यामुळे घडांची साईज चांगली मिळून पाकळ्या भरपूर प्रमाणात निघाल्या. डिपींगला राईपनर वापरले. प्रत्येक मणी २० ते २२ एस.एम. साईजचा झाला. पहिल्याच वर्षी एकून उत्पन्न ४० क्विंटल माल एक्सपोर्ट क्वलिटीचा निघाला. प्रत्येक घड एक ते दीड किलोचा निघाला. पहिल्याच वर्षी बागेपासून उत्पन्न मिळून माल एक्सपोर्ट झाला. त्यामुळे मी फार समाधानी आहे. खरड छाटणी ला व भाजीपाला पिकांनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरणार आहे.