डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर व फायदे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जर्मिनेटर : पेस्टमधील वापर जाड काड्या एकसारख्या फुटतात .

१) Head to tail फुटी एकसमान मिळतात.

२) हायड्रोजन सायनामाईड बरोबरच जर्मिनेटरचा वापर पेशी सतेज राखण्यास मदत होऊन कालांतराने ओलांडे वुडी(लाकडी) होण्याचा संभाव्य धोका टाळला जातो.

३) फवारणी : पहिल्या डीपींग अगोदर जर्मिनेटरच्या फवारणीमुळे शेंडा वाढ व पाकळ्या मिळतात. छाटणीनंतरचा ७,८,९ यापैकी कोणत्याही एका दिवशी २०० लि. पाण्यात जर्मिनेटर १ लि. ची (पेस्टमध्ये वापर करता अला नाही तरी) फवारणी केल्यास एकसारख्या फुटी मिळतात.

४) रूट स्टॉंक वरील बागांना दोन्ही छाटणीच्या वेळेस डबल पेस्टमध्ये जर्मिनेटरचा वापर जाड काड्या फुटीसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

५) डिपींग मधील G.A. बरोबर (जर्मिनेटर ५ मिली) वापर - केल्याने साईड पाकळ्या मोकळ्या, सुटसुटीत मिळतात. घडांचा दांडा मण्यांची फुगवण व पोषण होण्यास मदत होते. दोन पाकळ्यातील अंतर वाढल्यामुळे थिनींगचा खर्च वाचतो.

६) मागेपुढे झालेली फुट एकसारखी मिळते.

७) सोनाका, माणिकचमन, तास -ए- गणेश, काळी सोनाका या जातींमध्ये डिपींगमधील वापरामुळे मण्यांना लांबी मिळते.

थ्राईवर: छाटणी नंतर फवारणीपत्रकाप्रमाणे वापर केल्यास पानांमध्ये राखीव अन्नसाठा तयार होऊन प्रकाश संश्लेषण वेगाने (Photosynthesis) क्रिया होते. रोग प्रतिकार शक्ती वाढते. पानांना कॅनॉपी चांगली मिळते.

निर्यातक्षम द्राक्षासाठी पानांची साईज व आवश्यक संख्या तयार होते. सुक्ष्म अन्नघटकांची न्युनता पानांमध्ये जाणवत नाही. नैसर्गिक चिलेटींग एजंटचे कार्य होते. संजीवकांचे शोषण तत्पर होण्यास मदत होते. दुसर्‍या डिपींग अवस्तेथ ८०% फ्लॉवरींग अगोदर फवारणी झाल्यास गळ (Shading) थांबली जाते. तिसर्‍या डिपीगनंतर मणी वजनदार होऊन सुकवा टाळला जातो.

क्रॉंपशाईनर: थ्राईवर सोबत क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे पाने सतेज, टवटवीत राहून पानांवर मेणचटपणा आल्याने रोगाचे प्रमाण कमी होते .

२) क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे पाने व घडांना विकृती येत नाही.

३) मण्यांना शाईनींग मिळते.

४) काढणीनंतर टिकाऊपणा (Keeping Quality ) उत्तम वाढतो.

५) घडांचा दांडा लवकर सुकत नाही.

६) अतिथंडीत मण्यांना क्रॅकिंग होत नाही.

राईपनर :

१) फवारणी पत्रकाप्रमाणे फवारणीतील वापरामुळे मण्यांचा आकारमान वाढण्यास मदत होते.

२) डिपींगमधील वापराने फुगवण मिळते.

३) सोनाका, माणिकचमन जातीमध्ये दोन डिपींगमधील जर्मिनेटर ५ मिली. + राईपनर ५ मिलीच्या वापरामुळे लांबी बरोबरच फुगवणही होते.

४) लोकल बाजारपेठेत आवश्यक असलेला सोनेरी कलर मिळतो.

प्रोटेक्टंट:

१) वनस्पतीजन्य आयुर्वेदिक प्रभावी पावडर.

२) फुलपाखरे व मधमाशा यांना परागी भवनासाठी आकर्षित करते.

३) द्राक्षघडांत विषारी रसायनांचा अंश निर्माण होत नाही.

४) एक्सप्रोर्ट द्राक्ष व बेदाणा तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त.

५) किटकांची प्रतिकारशक्ती वाढत नाही.

६) नैसर्गिक संतुलन राखते.

प्रिझम :

१) ऑक्टोबर छाटणीचे वेळेस अति विषारी औषधे न वापरता "प्रिझम" जर्मिनेटर बरोबर वापरून १००% बागा फुटतात.

२) प्रतिकुल परिस्थितीत शेंडा व्यवस्थित चालतो.

३) जुन्या, थकलेल्या द्राक्षवेलींची फूट जोमदार, हिरवीगार निघते.

न्युट्राटोन:

सी.पी. पी. यु. वापरून एरवी द्राक्षाच्या मण्यांचा आकार वाढून मणी वजनदार मिळतो, परंतु मण्याची साल जाड होते. पेशी जाड टणक बनतात, गोडी कमी होते. सर्वसाधारण द्राक्ष खाताना ती दाताखाली धरल्या - धरल्या गोड लागतात, मात्र नंतर त्यांची गोडी कमी - कमी होत जाते, याकरीता डॉं. बावसकर तंत्रज्ञानाच्या फवारण्यामध्ये न्युट्राटोनचा वापर केला असता. मण्यांचा आकार वाढून गोडी आवश्यक मिळते. मण्याची साल जास्त जाड न होता मध्यम जाडीची राहते. पेशी मध्यम टणक असतात. अशी द्राक्षे खाताना सुरुवातीला जी गोडी मिळते ती शेवटपर्यंत एकसारखी मधून राहते. म्हणून या द्राक्षांना युरोपीय राष्ट्रांत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात मागणी असते असे सांगली, नाशिक भागातील शेतकर्‍यांनी केलेल्या प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.

सप्तामृतात न्युट्राटोन वापरल्याने द्राक्ष मण्यांचा आकार मोठा, रंग पोपटी, पेशी मध्यम टणक, मण्यांची साल कमी कडक, घड मोठा, वजनदार, आकर्षक तयार होती. घडाच्या साईड पाकळ्या मोठ्या, मण्यांची घडतील रचना आकर्षक, मण्यांना घडास जोडणारे देठ चिवट, लवचिक असतात. घड टोकाकडून देठाकडे गुंडाळून चेंडूसारखा धरून सोडला तरी स्प्रिंगसारखा घड लगेच मुळची अवस्था प्राप्त करतो. मणीगळ अजिबात होत नाही, तेव्हा वाहतूक निर्यात करताना घड सशक्त, निरोगी राहून मणीगळ, मणीसड प्रवासात होत नाही. टिकाऊपणा वाढतो, त्यामुळे द्राक्षाला नेहमीपेक्षा देशांतर्गत व निर्यात मार्केटमध्ये अधिक भाव मिळतो.

हार्मोनी : 'हार्मोनी' चा वापर हा डाऊनी मिल्ड्यू (केवडा) आणि पावडरी मिल्ड्यू (भूरी) या रोगांवर परिणामकारक होतो. तसेच अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे प्रभावी आहे.

कल्पतरू :

१) उत्कृष्ट सेंद्रिय खत.

२) जमिनीची भौतिक व जैविक सुपिकता वाढवते.

३) हवेतील बाष्प मुळाजवळ खेचून जारवा वाढवते.

४) पाणी कमी असताना छाटणीपासून माल काढेपर्यंत वरदान.