डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार्‍या शेतकर्‍यांच्या यशोगाथा

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ६ फवारण्या, दर्जेदार द्राक्ष व उत्तम भाव

श्री. विष्णु आव्हाड, मु. पो. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक,
मोबा. ९८२२३६९२०४


सोनाका २॥ एकर बागेचा २५,२६ फेब्रुवारी २००७ रोजी रिकट घेऊन श्री. सय्यदसाहेबांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी व ड्रिपमधून जर्मिनेटरचा (१ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात) वापर दर १५ दिवसांनी केला. मार्च महिन्यात ओलांडे तयार झाले. पेस्टमध्ये जर्मिनेटर ३० मिली / लि. याप्रमाणे दोन वेळेस वापर केला. बाग एकसारखा फुटला. ७ व्या दिवशी जर्मिनेटर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. पुढील फवारण्या वेळापत्रकाप्रमाणे केल्या. रिकटपासून ६ व्या महिन्यात झाडांवर ३० घड मिळाले. तिन्ही डिपींगमध्ये जी.ए. सोबत जर्मिनेटर, थ्राईवर, राईपनर, न्युट्राटोनचा ५ मिली प्रति लि. वापर केला. फवारणीतील वापरामुळे बागेवर डाऊनी मिल्ड्यु, भूरी रोगांचा प्रादुर्भाव नगण्य स्वरूपात होता. बागेस शेंडा व्यवस्थित मिळाला. पाने रुंद व निरोगी राहून घडांचे पोषण व्यवस्थित मिळाला. पाने रुंद व निरोगी राहून घडांचे पोषण व्यवस्थित होऊन मण्यांत १६ ते १८ मिमी साईज मिळाली. मिलीबग नव्हताच.याचप्रमाणे जुन्या २ एकर गणेशबागेसाठी वापर केला व वरीलप्रमाणे टेक्नॉंलॉजीच्या एकंदरीत ६ फवारण्या व डिपींगमध्ये वापर केला. अपेक्षेपेक्षा चांगली साईज मिळाली. रिझल्ट फारच उत्तम मिळाले. जुन्या २ एकर गणेशबागेची १५ ऑगस्ट २००७ रोजी छाटणी झाली होती.

नवीन बागा असूनही दोन्ही बागेत एकूण ४॥ एकरमध्ये १४॥ टन माल निघाला. गणेश ३ डिसेंबरपासून काढणीस सुरुवात केली होती. तर सोनाका ८ जानेवारीपासून काढणी स सुरुवात केली. सरांच्या औषधांच्या वापरामुळे दोन्ही बागेत २॥ टनापर्यंत माल वाढल्याचे जाणवले अति थंडीतसुध्दा वजन वाढून सुकाव्याचे प्रमाण नव्हते. मणीसड, क्रॅकिंग, पिचके मणी नाही. सोनाकास २८ रू. प्रति किलो दर मिळाला. गणेशला देखील २७.५ रू. / कि. दर मिळाला. दोन्ही बागेत खते व औषधांचा एकूण ७६ हजार रू. खर्च करून एकूण तीन लाख चाळीस हजार रू. झाले. सोनाका बागेत प्रथम वर्षीच समाधानकारक उत्पादन घेणे केवळ डॉ.बावसकर सरांच्या औषधाने शक्य झाले.