दुष्काळात एकाच पाण्यावर आलेली द्राक्षबाग

श्री.बाबुराव दत्तू माळी, मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली.
फोन : २५७०५७, २५७३५७


आमच्या भागात गेले ३ वर्षापासून दुष्काळ आहे. कमी पाणी असूनसुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून माल अपेक्षीत मिळाला. २४ मार्चला खरड छाटणी केली. बागेस पाणी १० एप्रिलपर्यंत मिळाले नाही. त्यानंतर ११ एप्रिलला पाटणे पाणी दिले व ओलांड्यावर दोन्ही बाजूस जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ४०० मिलीची दाट फवारणी केली. त्यामुळे ७ दिवसात पूर्ण बाग एकसारखी फुटली त्यांनतर माझ्या बागेस ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाणी मिळाले नाही, परंतु मी थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + १०० लि. पाणी या प्रमाणात एकूण ३० दिवसाच्या पाच फवारण्या घेतल्यामुळे पाणी एकच वेळ दिले व जुलैमध्ये थोडाच पाऊस पडला असताना अतिशय कमी पाणी म्हणजे १ पाण्यावर बागेची पुर्ण काडी तयार झाली शेवटपर्यंत काडी पिकली, पानगळ झाली नाही. पाने काढून टाकावी लागली. झाडे सशक्त राहून अपेक्षीत माल म्हाणजे झाडास २.५ ते ३ पेटी दर्जेदार माल निघाला. दुष्काळी परिस्थिती व पाणी कमी असेल्यास पुर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले तरी हमखास व दर्जेदार उत्पादन घेता येते व बाग नुसत्या जिवंत ठेवल्या जात नाहीत ते त्या निरोगी ठेवून दुष्काळावर मात करतात.