फयान वादळाच्या तडाख्यातही आमची द्राक्षबाग चांगली

श्री. महेश देशमुख, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक


माझ्याकडे २ एकर थॉमसन द्राक्ष बाग असून ती ४ वर्षाची आहे. नवीन ओनरूटवर लावली तेव्हापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत आहे.

७ ऑक्टोबर २००९ रोजी ऑक्टोबर छाटणी केली. पेस्टमधील जर्मिनेटर चा वापर झाला नाही, परंतु छाटणीनंतर ७ व्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात किटकनाशकाबरोबर फवारणी केली. तर बाग एकसारख्या फुटला.

पोंगा अवस्थेत असताना थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन ५०० मिली + २०० लि. पाणी अशी फवारणी केली. त्याने घड जिरले नाही. फुट जोमदार वाढली निरोगी वाढ झाली.

लिहोसिनच्या वापरामुळे अतिरिक्त शेंड्याची वाढ थांबली. द्राक्ष बाग फुलोऱ्यात असताना थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी अशी दुसरी फवारणी केली. या अवस्थेत डाऊनीचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात असताना आमच्या बागेवर १० % ही डाऊनी मिल्ड्यू नव्हता. मात्र एका ओळीत फवारणी व्यवस्थित न झाल्याने डाऊनीचा अटॅक मोठ्या प्रमाणात होता. सोबत बुरशीनाशक व किटकनाशकांचा प्रमाणात वापर झाला. डिपींगनंतर व छाटणी अगोदर रासायनिक खताचा संतुलित वापर केला.

द्राक्ष मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाणी अशी फवारणी केली.

अशा पद्धतीने एकंदरीत तीन फवारण्या केल्या. आमच्या द्राक्ष बागेत पिंकबेरीज, सनबर्न, शॉटबेरीज, क्रॅकिंग तसेच पाकळीत मर झालीच नाही.

फयान वादळाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा सापडल्या व बरेच नुकसान झाले. परंतु आमची द्राक्ष बाग या तंत्रज्ञानाने सुस्थितीत होती. मण्यांची साईज १७ - १८ एम. एम. मिळाली. १८० क्विंटल / २ एकरमध्ये वजन मिळाले. लोकल मार्केटमध्ये २२०० रू. क्विंटल असा दर मिळाला.