जर्मिनेटर द्राक्ष बागायतीत घडविलेली क्रांती

श्री. दिलीप कोंडाजी कदम, मु.पो. कोराटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक


मी प्रथमच खरड छाटणीच्या वेळी द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरण्याचे वापरण्याचे ठरविले. द्राक्षबाग छाटल्यानंतर जर्मिनेटरचा वापर केला असता फुट जोमदार झाली. जर्मिनेटर वापरल्याने ७० ते ८० काडी निघाली. आम्ही २० ते २५ काड्या विरळूण टाकल्या. फुटीचा अप्रतिम रिझल्ट पहिल्यामुळे ऑक्टोबर छाटणीस जर्मिनेटरचा १ लि. १० मिली पेस्टमध्ये वापर केला. त्यामुळे एकसारखी जोमदार फुट निघाली. गड जिरण्याचे प्रमाण कमी राहिले. थ्राईवर, क्रॉंपशाईनरची २०० लि. पाण्यामध्ये १ लि. याप्रमाणे फवारणी करीत आहे. सर्व फवारण्या शेड्युलप्रमाणे करण्याचे ठरविले आहे. पानामध्ये रोगप्रतिकारक शक्ति मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाच नाही. पाने, निरोगी, सतेज व रुंद आहेत.