जर्मिनेटर न वापरल्याने झालेला तोटा

श्री. दत्तात्रय नानाजी शिंदे, मु. पो. ओझर, ता. निफाड, जि. नाशिक


मी द्राक्षबागेसाठी कल्पतरू खताचा वापर ऑक्टोबर छाटणीचे १० - १२ दिवस अगोदर केला. दि. ७ ऑक्टोबरला ऑक्टोबर छाटणीस सुरुवात केली. सुरुवातीस १० लि. पेस्टमध्ये जर्मिनेटर ३० मिली याप्रमाणे वापरले. त्यामुळे डोळे उसासून आले (जोमाने फुटले). १६ ऑक्टोबर रोजी १ लि. जर्मिनेटर ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. ज्या ठिकाणी जर्मिनेटर चा वापर करता आला नाही. त्या ठिकाणची फुट मागेपुढे झाली. जर्मिनेटरच्या फवारणीमुळे व पेस्टमधील वापरामुळे एकसारखी जोमदार फुट झाली. घड हिरवेगार निघून अजिबात जिरले नाहीत व पिवळी फुट निघाली नाही.

२० व्या दिवशी थ्राईवर व क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. या प्रमाणात फवारणी केली. डाऊनी मिल्ड्युचा अटॅक आला नाही. पाने रुंद व पानावरती काळोखी आली. पहिल्या डिपींगच्या वेळेस जर्मिनेटरचा वापर करणार आहे. फवारणी पत्रकाप्रमाणे उर्वरित फवारण्य घेणार आहे.