HCN (पेस्ट) मध्ये जर्मिनेटर कधीही फायदेशीरच

श्री. शिवाजी बन्सीलाल जाधव, मु. पो. खेरवाडी, ता. निफाड, जि. नाशिक.
फोन नं. (०२५५०) २६०१७९


माझ्याकडे थॉमसन एक एकर आणि तास - ए - गणेश एक एकर द्राक्षबाग आहे. मागील वर्षी एप्रिल छाटणीनंतर ७ व्या दिवशी किटकनाशकासोबत जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले. त्याने घड निर्मिती चांगली होऊन गर्भधारणा चांगली झाली. पाने रुंद होऊन ऑक्टोबर छाटणीपर्यंत टिकली. थॉमसन बागेची १२ ऑक्टोबर २००७ ला तर तास - ए - गणेश बागेची १९ ऑक्टोबर २००७ ला ऑक्टोबर छाटणी केली. या छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड (HCN) २८ लि. पेस्टमध्ये १ लि. जर्मिनेटर चा वापर केला. त्याने डोळे एकसारखे फुटले. फुट एकसारखी मिळाली. पहिली डिपींग २५ व्या दिवशी करतान जी. ए. सोबत ७ मिली जर्मिनेटर चा/ लि. पाण्यातून वापर केला. घडाला लांबी, साईड पाळल्या मिळाल्या. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि, ची २०० लि. पाण्यातून डिपींगनंतर फवारणी केली. त्याने शेंडा वाढ जोमाने होऊन पाने रुंद मिळाली, डाऊनीचा प्रादुर्भाव कमी झाला.

निरोगी व दर्जेदार द्राक्षेत्पादन

दुसरी फवारणी द्राक्षमणी ज्वारीच्या आकाराचे असतान थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून केली. त्याने घडांचे पोषण झाले. भुरीस प्रतिबंध झाला. तिसरी फवारणी द्राक्षमणी शेंगदाण्याच्या आकाराचे असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून केली. पिंकबेरीज, वॉटरबेरीज, क्रॅकिंग झाले नाही. डिपींगच्या वेळी १८: ४६ खताची एक बॅग दिली तसेच किटकनाशक, बुरशीनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या केल्या.

द्राक्ष मण्यात ५०% पाणी उतरण्याच्या अवस्थेत चौथी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून केली. घडाला शाईनिंग मिळून कडकपणा मिळाला, गोडी उतरून १६ ते १८ एम. एम. साईज मिळाली.