प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाय पेस्ट, डिपींगमध्ये हर्मोनीचा वापर, घडांवर डावण्या नाही

श्री. रामचंद्र बाबुराव पवार, मु. पो. कवठेएकंद, ता. तासगाव, जि. सांगली
मोबा. ९९२३२४४०९८


क्षेत्र - २ एकर, जात - सोनका

छाटणी - तारीख १ सप्टेंबर २०१०

माझ्या बागेत हार्मोनी या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधाचे अगदी सुरूवातीपासून प्रतिबंधक म्हणून मी स्प्रे घेत गेलो. त्यामुळे बर्‍याचवेळो वातावरण बदलूनही डावणी माझ्या बागेत आला नाही. मि माझ्या बागेत हार्मोनी हे डिपींगमध्ये १.५ मिली/ १ लि. प्रमाणे वापरले. त्यामुळे घडावर देखील कोठेही डावणी मिळाला नाही. तसेच मान्यांवर व पानांवरती एक विशिष्ट प्रकारची काळोखी दिसून आली. इतर रासायनिक औषधांच्या खर्चातही बर्‍याच प्रमाणात बचत झाली. पेस्टमध्ये १५ मिली हार्मोनी + एम ४५, १५ ग्रॅम + सल्फेक्स १५ ग्रॅम +जर्मिनेटर ३०० मिलीचा वापर केला होता.