हार्मोनी मुळे द्राक्षावरील डाऊनी व भुरी पुर्णता आटोक्यात

फलावरींगमध्ये असताना डाऊनी व भूरी येवू नये म्हणून हार्मोनीचे दोन स्प्रे घेतले, तर डाऊनी, भुरी पुर्णता आटोक्यात राहिला. प्रत्येक डीपींगच्या आदल्या दिवशी म्हणजे दोन दिवस अगोदर जर्मिनेटर पांढरी मुळीसाठी ड्रीपद्वारे दिले. एकरी दीड लिटरचा डोस दिला. घडाची लांबी व मण्यांची साईज चांगली झाली. नंतर ९० दिवसांचा प्लॉट असताना कलरसाठी व गोडीसाठी राईपनर + ०: ० : ५० फवारले. नंतर १५ दिवसांचा प्लॉट असताना दोन दिवस जोराचा पाऊस झाला. तरीही बागेत क्रॅकींग दिसत नव्हती. नंतर १०५ दिवसांचा प्लॉट असतना माल चालू केला व व्यापाऱ्याने ७१ रू. भावाने सर्व माल नेला.

Related Articles
more...