खराब वातावरण ५० ते ५५ % डावण्यासाठी हार्मोनी रामबाण

श्री. बाळासाहेब महालिंग जोतराव, मु. पो. तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली


क्षेत्र - २ एकर, जाता- सोनाका.

छाटणी तारीख - १५ सप्टेंबर २०१०

क्षेत्र - १ एकर, जात - सोनाका,

छाटणी तारीख - २५ सप्टेंबर २०१०.

ज्यावेळी हार्मोनी माझ्या बागे वापरले, त्यावेळी डावणीचे घडावरती प्रमाण ५० ते ५५ % होते. त्यावेळी वातावरण सुद्धा खरब होते. तरी सुद्धा हार्मोनी हे औषध २ मिलीने व त्यात स्टिकर वापरून स्प्रे केला, तर चांगला रिझल्ट दिसून आला. डावणी परत फुलला नाही.

जेवढा घडावरती डावणी होता. तो मणी तांबुस पडला व जळल्यागत दिसू लागला. शिवाय राहिलेला मणी व घड सुखरूप पोसत आहे. याच्या फुगवण व लांबीवरती अजिबात परिणाम झालेला नाही. उलट मणी व पानावरती चांगल्या प्रकारची काळोखी दिसून येत आहे.

हार्मोनी या औषधामुळे डावणी या रोगावरती वापरावयाच्या औषधात १०% तरी बचत झाली आहे. दुसऱ्या कोणत्याच कंपनीच्या औषधात ही क्षमता नाही, असे मला वाटते.