'हार्मोनी' डावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना परवडणारे औषध

श्री. निरंजन संभाजी यादव, मु. पो. गव्हाण, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा . ९८२२६५१२९२


क्षेत्र - १ एकर, छाटणी तारीख - १८ सप्टेंबर २०१०

माझ्या द्राक्षबागेवर बदलत्या हवामानात कोवळ्या व जून पानावर आलेल्या डावणी रोगावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. पुणे यांचे हार्मोनी हे औषध हॅन्ड पंपाने पाऊस चालू असताना फवारले. एकाच दिवसात चांगला रिझल्ट जाणवून आला. सुरूवातीस डावणी तांबूसकलर येऊन नंतर हळूहळू तो पानावरून निघून जातो. पान न फाटता निरोगी व तजेलदार बनते.

हे औषध वापरण्यास सोईस्कर, खर्च कमी व पुर्णपणे रिझल्ट देणारे हे एकमात्र औषध आहे, या औषधाने माझ्या बागेत डावणी औषधाचे प्रमाण कमी झाले आहे.