प्रतिकुल परिस्थितीत कमी पाण्यावर आलेल्या द्राक्षबाग

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे पाण्याचा ताण सहन करूनही उत्कृष्ट द्राक्षे मिळाली

श्री. संतोष रामभाऊ खैरे, मु. पो. पालखेड (मिरचीचे) ता. निफाड, जि. नाशिक


आमच्या गावातील श्री. भिकाजी गोपाला चौधरी यांच्या द्राक्ष मालाला मार्केटमध्ये इतर मालापेक्षा दर जास्तच मिळायचा. त्यावेळी आम्ही त्यांना त्याबद्दल विचारले असता त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे वापरतो, असे सांगितले. तेव्हापासून मी सुद्धा ही औषधे वापरण्याचे ठरविले. माझे द्राक्षबागेचे चार प्लॉट आहेत. सुरुवातीला पहिला प्लॉट थॉमसन जातीचा ११ सप्टेंबरला छाटणी करण्याचे ठरविले. पेस्टमध्ये जर्मिनेटर (३५ मिली / लि) वापरले. काडीची फुट एकसारखी व जोमदार झाली. नंतर फ्लॉवरींग स्टेजला धुई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि पाण्याचा ताण बदल्यामुळे जवळजवळ ६० त ७० % मणी गळ झाली. त्यामुळे मी खूप नाराज झालो. त्याचवेळी आपले प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे थ्राईवर व क्रॉंपशाईनर (३ मिली / लि) ची फवारणी केली असता गळ थांबून माझी बाग नुकसानीपासून वाचली. ३० ते ४० % मणी घडावर राहिले. नेमका त्याचवेळी डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव इतर शेतकर्‍यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात झालेला होता. परंतु माझ्या प्लॉटवर फक्त ५ % डाऊनी रोगाचा अटॅक आला होता. केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी च्या औषधामुळेच माझी द्राक्षबाग डाऊनी रोगापासून वाचू शकली. नंतर दुसर्‍या व तिसर्‍या डिपींगसाठी जर्मिनेटर, क्रॉंपशाईनर व राईपनर ही औषधे वापरली. घडांना थिनींगची गरज भासली नाही. घड एकदम मोकळा सुटसुटीत असल्यामुले तिसर्‍या डिपींगनंतर १५ दिवसातच मण्यांची फुगवण १८ ते २० एम. एम. झाली. अगदी एक्स्पोर्ट क्वालिटीची फुगवण झाली. क्रॉंपशाईनरमुले मण्यांवर चमक व कडकपणा तसेच राईपनर मुळे मण्यांना सोनेरी कलर येऊन वजन चांगले मिळाले. छाटणीपासून चार महिन्यातच माल तयार झाला १० जानेवारीला माल काढला. मार्केटमध्ये इतर द्राक्षाचे दर १६०० ते १७०० रू. क्विंटल असताना माझ्या मालाला १९०० रू. क्विं. दर मिळाला. ४० क्विंटल माल नेहमीच्या व्यापार्‍याल माल दिला. सौदा झाल्यानंतर २- ३ व्यापारी आले. माल पाहून बागेतून निघायलाच तयार नव्हते. एवढा सुपर क्वालीटीचा माल होता. एकूण मालाचे ८०,००० रू. झाले.