नवीन द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

सौ. अहिल्याबाई कांडेकर, मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक


मी गेल्यावर्षी ओनरूटवर ९ x ९ फुटावर १ एकर सोनाका आणि एक एकर काळी सोनाका लावली.

डॉ.बावसकर सरांची औषधे नवीन द्राक्षबागेसाठी हुंडी लावल्यापासून वापरली. सुरुवातीस जर्मिनेटर ६० मिली आणि थ्राईवर ६० मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी व ड्रीपमधून १ लि. जर्मिनेटर २०० लिटर पाण्यातून सोडले. त्यामुळे बागेची वाढ कमी काळात चांगली झाली. शेंडा जोमाने वाढला. खोड जाड बनले. काही प्रमाणात लिक्कीड खताचा व रासायनिक खताचा देखील वापर केला. दर १५ दिवसांनी सरांची औषधे फवारत होते. त्यामुळे ओलांडे काड्या बनल्या. नंतर ऑक्टोबर छाटणी केल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केला. पहिल्या वर्षीचा बाग असल्याने माल साधारणच निघाला. खोड जाड बनण्यासाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर आता. करणार आहे. थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या फवारण्यामुळे पाने रुंद व आकाराने मोठी मिळाली. तसेच ती एप्रिल छाटणीपर्यंत टिकली. इतरांच्या बागेची पाने गळून गेली होती. आता एप्रिल छाटणीनंतर वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करणार आहे.