निर्यातक्षम उत्पादनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

पपयाचा उत्तम अनुभव गाठीशी म्हणून सर्व प्रकारची द्राक्षे दुबईस निर्यात

श्री. महिपती भास्कर कुलकर्णी, मु. पो. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली,
मो.९४२१२२३८९१


आम्ही ८ ते १० वर्षापुर्वी तास - ए- गणेश माणिकचमण , सोनाकारी द्राक्षबाग लावलेली आहे. त्यापुर्वी आम्ही तैवान ७८६ ची पपई लावत होतो. 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' आम्ही १५ - १६ वर्षापासून वापरत आहे. सुरुवातीला पपईला हे तंत्रज्ञान वापरले. पपई ८' x ६' वर असायची. जमीन मध्यम प्रतीची होती. तर या पपईला बीजप्रक्रियेपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत असे. जर्मिनेटर मुळे कोणत्याही हंगामात आम्हाला पपईची उगवण अतिशय चांगल्याप्रकारे मिळत असे. लागवडीच्या वेळी शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करत होतो. लागवडीनंतर शेणखतावर व गांडूळ खतावरच भर असायची. रासायनिक खते अत्यंत कमी प्रमाणात वापरात असे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित शिफारशीनुसार १५ ते २१ दिवसाच्या अंतराने फवारण्या घेत होतो. तर व्हायरस वगैरे प्रकारच नव्हता. ४॥- ५ महिन्यात फुलकळी लागून ७॥ ते ८ महिन्यात पपई तोडायला यायची. झाडाला ५ व्या महिन्यात बुंध्याला शेणखत देऊन मातीची भर लावली तर जमिनीपासून १ फुटावरून लागलेली फळे पोसल्यावर अक्षरश: बुंध्याला भर लावलेल्या मातीला टेकत होती. एका झाडावरून १५० ते २०० फळे दीड वर्षाच्या कालावधीत मिळत होती. पपई २ वर्षे चालत असे. मात्र दीड वर्षानंतर झाडे उंच वाढल्याने शेंड्याकडील फळांची काढणी करणे अवघड जात होते. शिडी लावून काढणी केली तरी झाडे कमकुवत झाल्याने मोडण्याची शक्यता (भिती) असायची. तसेच फळांचा दर्जाही खालावतो. म्हणून दीड वर्षापर्यंत पपईचे अतिशय यशस्वीरित्या उत्पादन डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घेता येत होते. नंतर झाडे काढून टाकत. फळे साधारण १ ते १॥ किलो वजनाची, आकर्षक चमक असलेली, टोकाकडे निमुळती लांबत अशी- असल्याने ४ - ५ रू. किलो भाव त्याकाळी मिळत असे. सरासरी ३ ते ४ रू. भाव सतत मिळयचा.

त्यानंतर अधिक उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने व्यापारी पीक म्हणून द्राक्ष बागेकडे वळालो. २००१ ते २००३ या कालावधीत तास ए - गणेश, माणिक चमण, सोनाका या बागांची लागवड टप्प्या- टप्प्याने केली. पपईच्या अनुभवावरून द्राक्ष बागेलाही हे तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरू लागलो.

सव्वा ते दीड वर्षात बहार धरण्यास सुरुवात केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या शिफारशीनुसार (द्राक्ष पुस्तक व माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे) सप्तामृत औषधांचे स्प्रे नियमित घेत असे.

वेळापत्रकाप्रमाणे फवारणी म्हणजे हमखास फायदा<

ऑक्टोबर छाटणीनंतर १० लि पेस्टमध्ये ३०० ते ३५० मिली जर्मिनेटर चा वापर केल्याने लांब व जाड काड्या एकसारख्या फुटतात. सबकेन डोळा १००% फुटतो. नंतर पहिली फवारणी पोंग्यात असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केली असता वेळीचा शेंडा जोमाने चालतो. पोंग्यातून फुट एकसारखी व जोमदार निघते. नंतर दुसरी फवारणी ४ ते ५ पाने आल्यानंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३०० मिलीची १०० लि. पाण्यातून केली असता घड एकसारखे व लवकर बाहेर निघतात. घडाला पाकळ्या जोमदार निघतात, साईज मोठी मिळते. तिसरी फवारणी विरलाप्रमाणेच १५ दिवसानंतर केली असता पाने जाड व रुंद, रफ होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. चौथी फवारणी बाग फुलोर्‍यात येत असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३५० मिलीची १०० लि. पान्यातोन घेतो. पाचवी फवारणी द्राक्षमणी ज्वारीच्या आकाराचे झाल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनरसह राईपनरचा वापर प्रति लिटरला ३ मिलीप्रमाणे करतो. सहावी फवारणी मणी शेंगदाण्याच्या आकाराचे झाल्यावर आणि सातवी फवारणी द्राक्ष मण्यात पाणी उतरण्याच्या वेळेस थ्राईवर ५०० मिली, क्रॉंपशाईनर ५०० मिली, राईपनर ५०० मिली ची १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी घेतली असता द्राक्ष मण्याची गोडी (टी.एस. एस. ) वाढते. मण्यांना आकर्षक गडद रंग येतो. द्राक्ष मण्यास चकाकी येते. थंडीमध्येही मण्यांची फुगवण चांगली होते मणी गळ, मणी सड होत नाही.

सोनाकाचे मणी दीड इंचापर्यंत लांब, दुबईस विक्री

सोनाकाचे मणी दीड इंचापर्यंत लांब मिळतात. वेलीवर माल कमी धरतो.एकरी १२ ते १३ च टन उत्पादन घेतो. मात्र त्यातील ८०% माल एक्सपोर्ट करतो. चॉन्द फ्रुट शफीभाई (मिरजेचे व्यापारी) यांच्यामार्फत मालाची विक्री दुबईला होते. ४ किलोला १५० ते २०० रू. भाव मिळतो. डिसेंबरमध्ये माल विकून बाग मोकळी होते. २० % माल लोकल मार्केटला २० ते २५ रू. किलो दराने विकतो. माणिक चमणला लांबी, गोडी, रंग चांगल्याप्रकारे प्राप्त होतो.

एप्रिल छाटणीच्या फावाराण्यांचा व इतर खर्च ३० ते ४० हजार तर फळ (ऑक्टोबर) छाटणीचा व फवारण्यांचा खर्च ७० ते ८० हजार रू. येतो. एकून खर्च जाऊन एकरी दीड ते २ लाख रू. मिळतात.

हार्मोनीमुळे डावण्या व पावडरी मिल्ड्यू पुर्ण आटोक्यात

आमच्या भागात द्राक्षावर अलिकडे डाऊणीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. बर्‍याच बागांचे नुकसान होत आहे. आमच्याही बागांवर त्याचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. तेव्हा एवढे खात्रीशीर उत्पादन आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेत असतानाच डावण्यावर सरांनी संशोधन औषध निर्माण करावे असे आदल्या दिवशी मनात आले. सरांना त्याबद्दल कळवावे, असे वाटत असतानाच दुसर्‍या दिवशी आमच्या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे श्री. विलास पाटील आमच्या प्लॉटवर येऊन म्हणाले, "काका, आमच्या कंपनीने डाऊनी मिल्ड्यू व पावडरी मिल्ड्यूवर हार्मोनी नावाचे नवीन औषध निर्माण असून त्याचे सांगली जिल्ह्यातील बर्‍याच बागांवर डेमो घेत असताना अतिशय प्रभावी रिझल्ट मिळाले आहेत. तेव्हा ते तुम्ही वापरून आपला अनुभव (रिझल्ट) कळवावा," आणि त्यांनी हार्मोनी औषध आम्हाला डेमोसाठी दिले. त्याची फवारणी लगेच त्याच दिवशी हार्मोनी १.५ मिली/ लि. पाणी याप्रमाणे १३ जुलै २०१० ला केली. दुसर्‍याच दिवशी आम्हाला कोवळ्या फुटीच्या पानांवरील डाऊनी काळा पडून जागेवर थांबलेला आढळला. हर्मोनीच्या रोपाने आम्हाला डाऊनीवर अतिशय प्रभावी औषध मिळाल्याने मी केव्हा सरांना भेटून हा अनुभव सांगतो, असे झाले. १५ जुलैला ताबडतोब पुण्याला येउन सरांना सर्व अनुभव सांगितला.

गर्डलिंग न करताही उत्कृष्ट द्राक्षे

आम्ही द्राक्ष बागेला गर्डलिंग न करताही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृतामुळे अतिशय चांगल्या प्रतिचा निर्यातक्षम माल उत्पादन करत असतो. त्यामुळे गर्डलिंगवर होणारा खर्च वाचतो.