निर्यात क्षम द्राक्ष उत्पादनामध्ये संजीवकांचे महत्त्व, वापरतांना घ्यावयाची काळजी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


रीजचे प्रमाण वाढते.

५) जी. ए. च्या द्रावणात सी. पी. पी. यू. व्यतिरिक्त इतर कोणतेही संजीवक किंवा रसायन मिसळू नये.

६) घडावर केवडा किंवा त्यासारखे इतर रोग असल्यास जी. ए. ची बुडवणी टाळावी.

वेगवेगळ्या पीपीएमचे द्रावण तयार करण्याची पद्धत:

वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण करावयाचे झाल्यास १ ग्रॅम जी. ए. १० ते ७५ मिली अॅसिटोनमध्ये विरघळून त्यात स्वच्छ व क्षार विरहीत पाणी मिसळून ते १ लि. कर्वे म्हणजे ते १००० पी. पी. एम. एवढ्या तीव्रतेचे मूळ द्रावण (Stock Solution) तयार होते.

१) १० पी.पी.एम. = १ ग्रॅम जी. ए. + ( १ लि. मूळ द्रावण + ९९ लिटर पाणी) १०० लिटर पाणी.

२) २५ पी.पी.एम. = १ ग्रॅम जी.ए. + ( १ लि. मूळ द्रावण + ३९ लिटर पाणी) ४० लिटर पाणी.

३ ) ४० पी.पी.एम. = १ ग्रॅम जी.ए. + ( १ लि. मूळ द्रावण + २४ लिटर पाणी) २५ लिटर पाणी.

या संजीवकाचा परिणाम प्रामुख्याने वातावरणाचे तापमान, जमिनीतील ओलावा, फुलोऱ्याच्या विविध अवस्था, द्राक्षाची जात, रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि वेलीवरील घडांची संख्या इ. गोष्टीवर अवलंबून असतो.

२) सायकोसील (सी. सी. सी. ) हे वाढ निरोधक संजीवक असून त्याचा वापर खरड तसेच ऑक्टोबर छाटणीनंतर केला जातो. या संजीवकास क्लोरमक्वॅट क्लोराईड (सी. सी. सी. ) असेही म्हणतात. याचे रासायनिक नाव टू - क्लोराईड डायमिथाईल अमोनियम क्लोराईड असे असून बाजारात ते ५० % तीव्रतेच्या द्रावणामध्ये लिहोसिन या नावाने उपलब्ध आहे.

कार्य:

१) खरड छाटणीनंतर वेलीवर आलेली नवीन फुट सहा ते सात पानाची असताना सायकोसीलच्या ५०० ते ७५० पी.पी.एम.तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी घेतल्यास वेलीमधील जी. ए. ची सायटोकायनीन्स व जी. ए. यांच्या गुणोत्तरात वाढ होऊन काडीवर सुक्ष्म घड निर्मीती होण्यास मदत होते.

२) या संजीवकच्या वापरामुळे वेलीची पाने जाड होतात व पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण वाढते. यामुळे पानांच्या हरितद्रव्याचे प्रमाण वाढते. यामुळे पानांच्या प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात वाढ होते. तसेच याचा वापर केल्याने पानातून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाच्या क्रियेचा वेग कमी केला जात असल्याने वेळी पाणी टंचाईच्या काळात तग घरून राहतात.

३) द्राक्षवेलीवर ऑक्टोबर छाटणीनंतर फूट फार जोमाने वाढते. त्यावेळी खोडातील अन्नरसाचा ओघ हा शेंड्याकडे जास्त असतो. त्यामुळे घडाचे पोषण योग्य होत नाही व घडाची प्रत खालावते. त्याकरिता शेंडा वाढ थांबवून अन्नाचा ओघ घडाच्या वाढीसाठी वळवून घडाचे पोषण योग्य होण्यासाठी घड पोपटी रंगाचे असताना या संजीवकाचा ५०० पी.पी.एम. एवढ्या तीव्रतेचा एक फवारा घ्यावा. त्यामुळे या अवस्थेत फुलांची गळ कमी होऊन फलधारणा वाढेल.

वापरताना घ्यावयाची काळजी :

१) ही फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.

२) खरड छाटणीनंतर आलेल्या नवीन फुटी ६ ते ७ पानांवर असताना व ऑक्टोबर छाटणीनंतर आलेल्या फुटीवरील घड पोपटी रंगाचे असताना या संजीवकाचा वापर करावा.

३) या संजीवकाचा वापर योग्य वेळी केल्यास ५०० ते ७५० पी.पी.एम. तीव्रतेच चांगला परिणाम आढळून आला आहे. फवारणीस थोडा उशीर झाल्यास ७५० पी.पी.एम.एवढ्या तीव्रतेचे द्रावण वापरावे.

४) घडाच्या फुलोऱ्यानंतर ८ ते १० दिवसांच्या कालावधीमध्ये या संजीवकाचा वापर करू नये, कारण याच काळात मण्यामध्ये पेशी विभाजनाची क्रिया फार वेगाने होत असते, तेव्हा त्याचा पेशी विभाजन क्रियेवर विपरीत परिणाम होतो. म्हणून या काळात या संजीवकाचा वापर करू नये.

द्रावण तयार करण्याची पद्धत :

हे संजीवक लिहोसीन या नावाने ५० % तीव्रतेच्या द्रावणामध्ये बाजारात मिळते. ते पाण्यात पूर्णपणे मिसळते. या संजीवकाचे वेगवेगळ्या पी.पी.एम.चे द्रावण पुढीलप्रमाणे तयार करावे.

५०० पी.पी.एम.= १०० मिली लिहोसीन + १०० लि. पाणी

२५० पी.पी.एम.= ५० मिली लिहोसीन + १०० लि. पाणी

३७५ पी.पी.एम.= ७५ मिली लिहोसीन + १०० लि. पाणी

४५० पी.पी.एम.= ९० मिली लिहोसीन + १०० लि. पाणी

३) सिक्स बिए (बेंझाईल अॅडीनाईन ) : हे संजीवक सायटोकायनीन्स या गटात मोडते. याचे कार्य पेशींचे विभाजन करणे हे होय. सायटो सायटोकायनीन्स मुख्यत्वे वेलींच्या मुळांमध्ये तयार होतात. एप्रिल छाटणीनंतर दोन वेळेस सिक्स बी. ए.चा वापर केला जातो.

वापरण्याचा उद्देश

१) एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटीचा शेंडा थांबविल्यानंतर सुक्ष्म घड निर्मितीच्या वेळी या संजीवकाचा १० पी.पी. एम. एवढ्या तीव्रतेची एक फवारणी घेतल्यास वेळींची पांढरी मुळे अधिक जोमाने चालते व जास्त कार्यक्षम बनते. पानांचे व पांढऱ्या मुळीचे कार्य यांचा समन्वय योग्यरित्या साधला जाऊन सुक्ष्म घडनिर्मीती जोमाने व शास्वत होते.

२) ऑक्टोबर छाटणीनंतर घडांमध्ये फलधारणा झाल्यानंतर घडांवर तेच घडांच्या पुढील पानांवर १० पी. पी. एम. तीव्रतेच्या सिक्स बी. ए. ची. एक फवारणी घेतल्यास मण्यांची फुगावन चांगली होते. गर्डलिंग करण्यास उशीर झाल्यास सिक्स बी. ए. च्या १० पी.पी. एम. च्या द्रावणाची फवारणी घेतल्यास गर्डलिंगमुळे मण्यांची फुगवण होते ती फुगवण याच्या वापरामुळे मिळविता येते.

या संजीवकाचा वापर जास्त प्रमाणात केल्यास पानांची गळ होते. महणून याचा काळजीपुर्वक वापर करावा. सिक्स बिएच्या जास्तीत जास्त दोन फवारण्य घ्याव्यात. द्रावण कसे तयार करावे: सिक्स बी. ए. विरघळविण्यासाठी आयसो प्रोपाईल अल्कोहोलचा वापर करतात. एक ग्रॅम सिक्स बी. ए. सुरुवातीस आयसो प्रोपाईल अल्कोहोलमध्ये विरघळून घेऊन नंतर लागणारे पाणी घेऊन पुढीलप्रमाणे वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करावे.

५ पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बिए + २०० लि. पाणी

१० पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बिए + १०० लि. पाणी

२० पीपीएम = १ ग्रॅम सिक्स बिए + ५० लि. पाणी

४) इथ्रेल (इथेपॉन)

हे संजीवक ग्रोथ इनहिबीटर्स (इथीलन) या गटात मोडते. बाजारात हे इथ्रेल, इथेपॉन, सेफा या नावाने मिळते. याचे रासायनिक नाव टू क्लोरा इथाईल फॉस्फोनिक अॅसिड असे आहे.

वापरण्याचा उद्देश :

१) ऑक्टोबर छाटणीपुर्वी १५ दिवस १००० ते २५०० पी.पी. एम. एवढ्या तीव्रतेच्या इथ्रेलची फवारणी केल्यास वेळींची पानगळ होण्यास मदत होते. यामुळे नेमक्या डोळ्यावर काड्यांची छाटणी करणे सुलभ जाते. तसेच छाटणी नंतर काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होते.

२) द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरू लागल्यावर ५०० पीपीएम एवढ्या तीव्रतेच्या इथ्रेलची फवारणी घडावर करावी. यामुळे रंगीत जातींच्या द्राक्षांमध्ये सर्व मणी लवकर व एकसारखे रंगीत जातींच्या द्राक्षांमध्ये सर्व मणी लवकर व एकसारखे पिकतात. तसेच, मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या संजीवकच्या वापरामुळे वेलीतील इथीलीनचा साठा वाढविला जात असल्याने पांढऱ्या जातीच्या द्राक्षामध्ये पिंक बेरीज वाढण्याची शक्यता असते. तर रंगीत द्राक्षामध्ये जास्त गर्द रंग येण्यास मदत होते.

द्रावण कसे तयार करावे ?

इथ्रेल हे संजीवक पाण्यात पूर्णपणे मिसळते याची तीव्रता ४०% असते. वेगवेगळ्या तीव्रतेचे इथ्रेलचे द्रावण पुढीलप्रमाणे करावे.

१००० पीपीएम = २५० ग्रॅम / मिली इथ्रेल + १०० लि. पाणी

२५०० पीपीएम = ६२५ ग्रॅम / मिली इथ्रेल + १०० लि. पाणी

२००० पीपीएम = ५०० ग्रॅम / मिली इथ्रेल + १०० लि. पाणी

५) सीपीयू (फोरक्लोरफेन्यूरॉन) : या संजीवकचे मुख्य कार्य पेशी विभाजन करून मण्यांचा आकार वाढविणे. निर्यातक्षम द्राक्षासाठी याच्या वापराने द्राक्षमण्यांचे वजन, लांबी व जाडी चांगली मिळते. जगभर या संजीवकाचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो.

१) सी.पी.पी. यू. चा वापर जीए बरोबर केल्यास मण्यांच्या वजनात वाढ होते. मणी जास्त गोलाकार व टपोरे बनतात. तसेच त्यांच्या लांबी रुंदीचा गुणक वाढविण्यास मदत होते. जी. ए. च्या सतत वापरामुळे घडमध्ये शॉर्टबेरीज तयार होणे, मणी तडकणे व काढणीनंतर होणारी मण्यांची कुज इत्यादी दुष्परिणाम होत असल्याने जीए चा वापर कमी करून मण्यांची चांगली फुगवण मिळण्यासाठी याचा वापरा करतात.

२) मर्यादीत तीव्रता व मात्रेचा वापर.

३) सीपीपीयूच्या वापरामुळे काढणीनंतर वाहतुकीच्या दरम्यान होणारी मण्यांची वाढ तसेच घडाचा देठ मजबूत होतो. घडांचे देठ शेवटपर्यंत हिरवेगार राहतात व माल ताजा राहून सारखा दिसतो.

४) द्राक्ष मण्यांच्या सालीत तयार होणारे अॅन्थोसायनीन्स नावाच्या रंगद्रव्याच्या निर्मीतीस प्रतिकारकता आणणे हे संजीवक द्राक्षमण्यात रंगद्रव्य तयार होऊ देत नसल्याने पिंक बेरीज या समस्येवर काही प्रमाणात मात करता येते. मात्र रंगीत जातींच्या द्राक्षामध्ये याच्या वापरामुळे मण्यातील रंगद्रव्य कमी होऊन त्यांचा रंग फिक्कट होण्याची शक्यता असते. त्याकरीता रंगीत जातींच्या द्राक्षांमध्ये याचा वापर मर्यादीत करावा.

५) सीपीपीयूच्या वापरामुळे नंतरच्या घडनिर्मीतीवर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही.

या संजीवकाच्या वापरामुळे घडाची पक्वता १५ - १६ दिवस उशिरा येते. याच्या जास्त तीव्रतेच्या मात्रेमुळे मण्यांची साल जड होण्याची शक्यता असते व मण्यांना भेगाही पडू शकतात म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करावा. घडतील मण्यांची साईज ३ ते ४ मिमी असताना २५ पीपीएम जीए बरोबर १.५ ते २ पीपीएम सीपीपीयू मिसळून पहिला डीप द्यावा व मणी ६ मिमी साईजचे असताना फक्त २५ पीपीएम जीएचा दुसरा डीप द्यावा. यामुळे मण्यांची फुगवण चांगली होते व उत्पादनात वाढ होते.

द्रावण खालीलप्रमाणे तयार करावे - बाजारात सीपीपीयू हे १००० पीपीएम या तीव्रतेच्या मूळ द्रावणात २५० मिली, ५०० मिल्ली किंवा १ लि. अशा पॅकिंगमध्ये मिळते. १५ मिली सीपीपीयू १ लि. पाण्यात मिसळल्यास ते १.५ पीपीएम चे द्रावण तयार होते. थोडक्यात आपणास जेवढ्या पीपीएमचे द्रावण तयार करावयाचे आहे. तेवढे मिली सीपीपीयू घेऊन एकूण १ लि. चे द्रावण तयार करावे.

६) ब्रॅसीनोस्टीरॉईडस : 'ब्रॅसकीनेप्स' या वनस्पती च्या परागकणामधून १९७९ साली या संजीवकाचा शोध लागला. त्यानंतर बऱ्याच लहान मोठ्या वनस्पतींमध्ये ब्रॅसीनोस्टीरॉईडस असल्याचे निदर्शनास आले. द्राक्षामणी वाढीच्या अवस्थेमध्ये ब्रॅसीनोस्टीरॉईडसचा उपयोग होतो.

पेशींची लांबी, घेर व पेशीचे विभाजन होते. शर्करा कर्बोदके आणि न्युक्लीक अॅसीडच्या निर्मीतीसाठी ब्रॅसीनोस्टीरॉईडसचा उपयोग होतो. हे जीए बरोबर डिपींगमध्ये वापरल्यास मण्याचे वजन वाढते. हे जीए बरोबर थांबते. २० ते २५ पीपीएम जीएममध्ये १ ते १.५ मिली ब्रॅसीनोस्टीरॉईडस प्रति लिटर द्रवाणात ३ ते एम. एम. मण्याच्या व्यासाच्या अवस्थेत वापरावे.

७) एन. ए. ए. (नॅप्थॅलिन अॅसिटीक अॅसिड) : हे संजीवक ऑक्झीन्स या गटात मोडते. वेलींवर घडांची संख्या मर्यादित असल्यास व इतर संजीवकच्या मात्रा दिल्यास याची गरज भासत नाही. मात्र घड फुलोऱ्यातून वाहेर पडल्यापासून ते मणी तांदळाच्या आकाराचे होईपर्यंतच्या काळात होणारी मणीगळ कमी करण्यासाठी २० पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. तसेच मणी पिकण्यास सुरुवात होताना २० पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास मण्यावर लव चांगली येते. द्राक्ष काढणीच्या १० - १५ दिवस अगोदर २० - २५ पीपीएमच्या एनएएची फवारणी केल्यास काढणीनंतरच्या हाताळणीची मणीगळ थांबविली जाते.

वरील सर्व संजीवकांचा वापर द्राक्षाची योग्य अवस्था, योग्य तीव्रता व अनुकुल हवामान असताना करावा. अधिक माहितीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.