डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे भुरी, डावण्या आटोक्यात, घड अधिक असूनही फुगवण चांगली

श्री. अमोल एकनाथ वाध, मु. पो. मातोरी, ता. जि. नाशिक.
मोबा. ९८२२०७६६०


माझ्याकडे असलेल्या १२ एकर द्राक्ष बागेसाठी मागील ६ वर्षापासून सरांच्या सप्तामृत औषधांचा फवारणी व डिपींग मध्ये वापर करीत आलेलो आहे.

मला सेंद्रिय शेती करण्याची पहिल्यापासून आवड असल्याने मी इतर सेंद्रिय व जैविक उत्पादने मागील तीन वर्षापासून वापरीत आहे.

या वर्षी डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. जुन्या साडेसहा एकर बागेची छाटणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली असून वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या केल्या. एकंदरीत चार फवारण्या फ्लॉवरींग स्टेजमध्ये द्राक्ष बाग असतानापासून केल्या. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी केल्या. सप्तामृतात हार्मोनी च्या वापरामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव कमीच होता. आज रोजी ५० % पाणी मण्यात उतरले आहे. १८ ते २० एम. एम. साईज आहे. सोनाका साडेतीन एकर बागेत सनबर्न, सुकवा व मणीगळ अजिबात नाही. डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. शेंडा भरपूर सापडला.

सोनाकासाठी एकंदरीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्या केल्या. पाणी १० % उतरले. थ्राईवर व क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली. राईपनर व न्युट्राटोनमुळे फुगावन अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली. या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत बागेत घडसंख्या जास्त असूनसुद्धा फुगवण व शेंडा मिळून पाने रुंद, निरोगी आहेत. गावातील व जवळपासच्या गावात बागांवर रोगाचे प्रमाण जास्त असताना त्यांच्या तुलनेत डाऊनी, भुरी रोगांचे प्रमाण आमच्या बागेत फारच कमी आहे.