रोगमुक्त द्राक्षबागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदान कल्पतरूने पांढरी मुळी वाढली

श्री. रामराव साहेबराव चिणे, मु. पो. पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक


मी द्राक्षलागवडीचे आधुनिक तंत्रज्ञानानुसार २० गुंठे सिडलेस बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरचा डॉंरमॅक्स बरोबर १ लि. पाण्यात ५ मिली वापर केला. नंतर १८ ऑगस्ट रोजी छाटणी झाली. प्रथम पहिली फवारणी जर्मिनेटर व किटकनाशक यांची केई त्याने एकसारखी जोमदार फुट झाली. घड अजिबात जिरले नाही. छाटणी आगोदर कल्पतरू सेंद्रिय खत २० गुंठ्यासाठी ५० किलो वापरले. त्यामुळे पांढरी मुळी जोमदार वाढून पानांना कलर चांगला मिळाला. दुसर्‍या फवारणी अगोदर पहिल्या डिपींगमध्ये जर्मिनेटर ५ मिलीचा जीए २५ पिपिएम बरोबर वापर केला असता घडांची लांबी चांगली मिळून बंच चांगले मिळाले. घडांचा पिसारा चांगला मिळाला. पहिली डिपींग २५ व्या दिवशी झाली. डिपींगनंतर ५ व्या दिवशी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी अशा रितीने फवारणी केली. पाने रुंद होऊन पानांना रफपणा येऊन शाईनिंग मिळाली. डाऊनी व करपा अजिबात आला नाही, तसेच झान्थोमोनसचा अटॅक आला नाही. दुसर्‍या डिपींगसाठी थ्राईवर व क्रॉंपशाईनर घेऊन जात आहे व पुढील फवारण्या शेड्युलप्रमाणे करीत आहे.