रोग व किडीवर डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने केलेली मात

करपा, बॅक्टेरियाने गेलेल्या प्लॉटपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २५०० पेटी माल

श्री. कानिफनाथ बाबासो कदम, मु. पो. हरळी (कदममळा), ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.


द्राक्ष सोनाका

सुरुवातीस मी पेस्टमध्ये जर्मिनेटर वापरले. ह्यामुळे बाग एकसारखी व लवकर फुटली. त्यानंतर माझ्या बागेत घडसंख्या मध्यम निघाली. पण त्यानंतर थोडे वातावरण खराब असल्याने माझ्या प्लॉटमध्ये करपा व बॅक्टेरिया आला. त्यावेळी येथील प्रतिनिधींनी प्लॉटची पाहणी करून मला स्प्रे लिहून दिले. त्यांनी बुरशीनाशकाचा एक स्प्रे व थ्राईवर +क्रॉंपशाईनरचा एक स्प्रे घेतल्यावर माझा प्लॉट ह्या रोगापासून ४ दिवसात पुर्ण बरा झाला. त्यानंतर मी फुलोर्‍यात, मणीसेटिंग, द्राक्षमणी स्टेजला व मऊ पडताना संपूर्ण स्प्रे व थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनरचे घेतले. आज माझी बाग गावात १ नंबरची आहे. जवळचे लोक आश्चर्य करीत होते. कारण गेलेला प्लॉट एवढा जबरदस्त आला. हे सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच घडले. माझ्या बागेत सनबर्न, क्रॅकिंग झालेच नाही. नंतर माझ्या बागेत प्रतिनिधी वारंवार येऊन भेट देत असल्याने काहीच अवघड असे झाले नाही. माझ्या बागेतील सोनेरी कलर, शाईनिंग पाहून व्यापारी खुष झाला. भाव पडलेले असतानाही मला ६५ रू. पेटीस दर मिळाला. मला माझ्या प्लॉटमध्ये पहिल्याच वर्षी १ लाख ६० हजार रू. मिळाले. त्यामुळे मी ही टेक्नॉंलॉजी कधीही विसरू शकत नाही.