रूट स्टॉंकवर द्राक्ष लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


द्राक्ष लागवड करताना विविध भागामध्ये द्राक्ष उत्पादनामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. प्रामुख्याने त्यामध्ये क्षारयुक्त जमिनी, काही भागात पाऊस कमी पडल्यास पाण्याची कमतरता, तर काही जमिनीमध्ये सुत्रकृमीचा प्रादुर्भाव यामुळे द्राक्ष वेलीच्या वाढीवर उत्पादनावर, गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यावर मात करण्यासाठी योग्य त्या खुंटाची लागवड करावी.

१) क्षार प्रतिकारक्षम रूटस्टॉंक - अलिकडे सर्वेक्षणातून परिक्षणामध्ये आढळून आले आहे की, बहुतेक जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण वाढले असून जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त आहे. खारांचे प्रमाण ६ ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा जमिनीतील द्राक्षवेलीच्या वाढीवर जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढल्याने विपरीत परिणाम होतो. पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतता दिसून येते. जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण ०.३ मिली म्होज प्रतिसेमी विधुतवाहक शक्तीपेक्षा जास्त असल्यास त्याचा अन्नद्रव्य शोषणावर बराच परिणाम होतो. मुळांची अन्नद्रव्य शोषनाची क्षमता, सूक्ष्मजीवाणूची कार्यक्षमता कमी होते. . जमिनीत अतिक्षारांमुळे जुन्या पानांच्या कडा करपतात. करपलेली पाने वाळतात. नंतर ती गळून पडतात आणि वेलींची वाढ खुंटते. अशा क्षारयुक्त जमिनीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे फारसे सोपे नाही. त्याकरीता या जमिनीमध्ये क्षार प्रतिकारक्षम खुंटाच्या द्राक्षाची लागवड करावी. यासाठी डॉग्रीज, रामसे (सॉल्ट क्रिक), एस ओ - -४, १६१३ व १६१६ या क्षार प्रतिकारक्षम खुंटाची लागवड करून त्यावर योग्य वाणाचा (उत्पादनाच्या दृष्टीने) डोळा भरावा.

२) अवर्षण प्रतिबंधक रूटस्टॉंक - अलिकडे पाऊसमान वाढले असले तरी काही भागात अजूनही अवर्षण क्षेत्र आहे. अशा जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करून समाधानकारक उत्पादन पाण्याच्या कमतरतेमुळे घेऊ शकत नाही.

उन्हाळ्यामध्ये एप्रिल छाटणीनंतरच्या काळात जर द्राक्षवेलीत आवश्यक तेवढे पाणी नसेल तर उत्पादनावर फार परिमाण होतो. कारण वेलीच्या काड्यातील डोळ्यामध्ये खरड छाटणीनंतर सुक्ष्म घडांची वाढ होत नाही किंवा जोमदार सुक्ष्म घड तयार होत नाहीत.

अशावेळी पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी अवर्षण प्रतिबंधक खुंटाची लागवड करावी. त्यासाठी डॉंग्रीज, रामसे, एस. ओ - ४ या खुंटाचा करावा. आणि त्यावर डोळे भरून किंवा कलम करून बागेचे व्यवस्थापन करावे.

३) सुत्रकृमी प्रतिबंधक रूटस्टॉंक - वेगवेगळ्या जमिनीमध्ये सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी - अधिक प्रमाणात जाणवतो. या सूत्रकृमीमुळे द्राक्ष वेलीची मुळे वेडीवाकडी होतात. अन्न शोषण करणारी मुळे कुजतात, त्याचा अन्नद्रव्य शोषणाच्या क्रियेक अडथळा निर्माण होतो. परिणामी वेलीची वाढ खुंटते, वेळ सुकते, कोमजते, नवीन फुटीची वाढ समाधानकारक होत नाही. याकरीता सुत्रकृमीस प्रतिकारक्षम खुंटांची लागवड करून त्यावर योग्य त्या जातीचा डोळा भरावा किंवा कलम करावे.

रूटस्टॉंकच्या जाती:

१) बेंगलोर व अमेरिकन डॉंग्रीज - (विटीस चॅपिली) : जोमदार वाढ, निमॅटोड (सुत्रकृमी) प्रतिकारक शक्ती उत्तम, फायलोक्झोरायस मध्यम, चुनखडीस संवेदनशीलता मध्यम, हलक्या जमिनीतही चांगली येणारी जात असून यावर कलमे जोमदार वाढतात. चुनखडीची जमीन, कमी सुपीक जमीन तसेच पाणी पुरवठा कमी असणार्‍या जमिनीत या जातीच्या खुंटाची लागवड करून त्यावर योग्य त्या जातीचा डोळा भरावा.

२) रॅमसे - ही जात सुत्रकृमींना प्रतिकारक्षम असून वेलीची वाढ जोमदार होते. अवर्षण भागात लागवडीस योग्य असून यावर भरलेले डोळे / कळमे लवकर यशस्वी होतात. मध्यम व हलक्या जमिनीत चांगला प्रतिसाद मिळतो. क्षारयुक्त जमिनीत मात्र मध्यम प्रतिसाद मिळतो. तसेच या खुंटावर कलमे केलेल्या बागावर मॅग्नेशियमची कमतरता भासते.

३) सॉल्ट क्रिक : सॉल्ट क्रिक ही जात रॅमसे नावाने ओळखली जाते. व्हिटीस चॅम्पीनी या रानटी जातीच्या बियापासून निवड पद्धती ने विकसीत केली आहे. हलक्या व रेताड जमिनीत वाढ चांगली होते. सुरुवातीला वाढ सावकाश होत असून नंतर जोमाने होते. जास्त सामू असणार्‍या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. जोमदार वाढीमुळे जस्ताची कमतरता भासते. अवर्षण भागात या जातीच्या खुंटाचा वापर अधिक फायदेशीर आहे.

४) सेंट जॉर्ज : या जातीच्या खुंटाची वाढ जोमदार होते, ही जात कमी पाण्याच्या तसेच हलक्या आणि चुनखडीच्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते. कलमे केल्यास त्यांची वाढ लवकर होते. फायलोक्झोरायस प्रतिकारक असून वाढ जोमदार होते.

५) व्हीटीस चेम्पीनि क्लोन : या जातीच्या क्लोनमुळे कलमाचा भाग लवकर जुळून वाढ जोमाने होते. ही जात हलक्या ते मध्यम जमिनीत होणे अधिक फायदेशीर ठरते. या जातीमध्ये जमिनीपासून निघणार्‍या फुटीचे प्रमाण जास्त असल्याने वेळोवेळी फुटी काढणे गरजेचे आहे.

६) १६१६ : सोलोनिस रिपारीका यांचे संकरापासून तयार केलेला हा निमॅटोडसाठी मध्यम प्रतिकारक वाण असून याची वाढ मध्यम आहे. चांगल्या प्रतीच्या, चिकण मातीच्या जमिनीत लागवडीस योग्य आहे.

७) १६१३ : व्हिटीस सोलोनिस आणि व्हिटीस ओयेला यांच्या संकरातून हा वाण विकसीत केला असून हा वाण सुत्रकृमीस प्रतिबंधक आहे. खुंट रेताड जमिनीत तसेच मध्यम सुपीक आणि चुनखडी युक्त जमिनीत जोमदार वाढणारे असून यावर केलेल्या कलमाचे उत्पादन भरपूर मिळते.

याशिवाय गुलाबी, १६१, ११० आर, १४० आययू, ४१ बी, ३३३ ईएम, एस ओ - ४, ९९ आर, ५ बीबी, हार्मनी, १०१ - १४ हेही रूट स्टॉंक आहेत.

रूटस्टॉंक लागवडीसाठी काडीची निवड :

द्राक्षाप्रमाणेच रूटस्टॉंकची लागवड छाटापासून केलीजाते. छाट वजनदार निरोगी, पूर्ण पिकलेला, डोळे भरदार घ्यावा. काडी पोकळ नसावी. हे ओळखताना (निवडताना) चांगले छाट हे वजनदर असून त्यावरील साल रसरशीत दिसते. छाट ४ ते ५ डोळ्यांचे घ्यावेत. खालचा काप खालच्या डोळ्याजवळ सरळ घ्यावा. वरचा काप तिरपा पण डोळ्यांच्या विरुद्ध बाजूला उतरत जाणारा घ्यावा. छाट घेण्याचे काम सावलीत करावे. जास्त तापमानात छाट किंवा काड्या बाहेर राहिल्यास त्यातील ओलावा कमी होतो. रस आटतो. रसाचा प्रवाह खंडीत होतो. छाट घेतल्यानंतर सर्व छाट थंड जागेत ओल्या गोणपाटाखाली ठेवावेत. काड्यांचे श्वसन कमी झाल्याने अन्नसाठा खर्च न होता साठला जातो.

छाट कलमांची लागवड : ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये काड्या काढून त्या १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटर + १० ग्रॅम बुरशीनाशक घेऊन त्या द्रावणात काड्या १० ते १५ मिनीट भिजत ठेवून त्यांची हुंडी तयार करावी.

हुंडीचा लागवड जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून फेब्रुवारी अखेरपर्यंत करावी. लागवडीपुर्वी पुढे खुंटावर आपण कोणत्या वाणाचे डोळे भरणार / कलम करणार आहे, त्याचप्रमाणे लागवडीचे अंतर ठरवून चर पाडून खड्डे तयार करावेत. साधरणपणे लागवडीची दिशा दक्षिणोत्तर राहील, अशा पद्धतीने आखणी करून १०' x ५' किंवा १०' x ६' अंतरावर लागवड करण्यासाठी आखणी करावी. आखणी केल्यानंतर १० फूट अंतरावर २' x ६' रूंदीचे चर काढून घेऊन १ फूट माती एका बासूस व त्याखालची माती दुसऱ्या बाजूला ठेवावी आणि खड्डयामध्ये चांगले कुजलेले शेणखत १० किलो, गांडूळ खत ५०० ग्रॅम , कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम, सुक्ष्म अन्नघटक १०० ग्रॅम आणि फॉलीडॉंल पावडर ५० ग्रॅम टाकून खड्डे भरून घ्यावेत आणि पाणी देऊन खड्डे/ चार ओलावून घेऊन नंतर २- ३ दिवसांनी वाफश्यावर हुंडीची लागवड करावी. अन्नशोषणांची किर्या वाढण्यासाठी तसेच पांढर्‍या मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी जर्मिनेटर ५ मिली. प्रती लि. पाणी या प्रमाणात घेऊन लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी १०० मिली द्रावण सर्व (हुंडीवरून) मुळापर्यंत जाईल अशा पद्धतीने द्रेंचिंग (आळवणी) करावे. म्हंजे रूटस्टॉंकची रोपे ३- ४ फुटापर्यंत जुलै - ऑगस्टपर्यंत चांगली वाढतील. कारण जुलै ते सप्टेंबरपर्यंत चे हवामान काडी फुटण्यास अनुकूल असते. या काळात बांधावयास लागणारी काडीही उत्तम प्रकारची मिळते.

थेट जमिनीत काड्यांची लागवड केली असता सरळ लागवड करावी. तर रोपवाटीकेमध्ये (पिशवीत थोडीशी तिरपी लावावी. पाणी ५ ते ७ दिवसांनी द्यावे. जुलै - ऑगस्ट महिन्यातील लागवडीस फेबुवारी महिन्यापर्यंत मुळ्यांचा विस्तार होईल आणि खुंटावरती कलमांसाठी काडीची वाढ समाधानकारक होण्यासाठी खुंट लागवड ते कलम करण्याचा कालावधी ६ ते ७ महिन्याचा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीत मुळांचा विस्तार चांगला होईल व कलम केल्यानंतर काडीला जोम राहील. म्हणून खुंटाची लागवड लवकर करावी.

खुंटाची वाढ व निगा : १) खुंटाची लागवड केल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांनी नवीन फुटवा येण्यास सुरुवात होते.

२) पाण्याचा ताण बसण्यापूर्वीच पाणी नियमित द्यावे. वेलीची कार्य क्षम मुळे वरील थरातच असतात . भारी जमिनीत एक दिवसाआड तर मुरमाड जमिनीत दरदिवशी १ तास (६ लि.) ड्रिपद्वारे पाणी द्यावे.

३) मुळ्यांची वाढ जोमाने होण्यासाठी जर्मिनेटरवापर २०० लि. पाणी व १ लिटर जर्मिनेटर या प्रमाणात (ड्रिपद्वारे) करावा.

४) खतांचा वापर : लागवडीनंतर ३० दिवसांनी युरिया ३० किलो व डी. ए. पी. १० किलो सोबत कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो एकरी या प्रमाणात दोन वेळेस खताची मात्रा द्यावी. १- १ महिन्याने ठीबकद्वारे १९ : १९ : १९ व युरिया १ किली द्यावे. नंतर१ ५ दिवसांनी पुन्हा प्रत्येकी ५०० ग्रॅम द्यावे याशिवाय जर्मिनेटर १ लि. / २०० लि. पाणी ठिबकद्वारे दर १५ ते २० दिवसांनी दोन वेळेस द्यावे.

रूटस्टॉंकवर ग्राफ्टिंग (डोळे भरणे) : द्राक्षावर प्रामुख्याने डोळे भरणे, साईड ग्राफ्टिंग करणे, पाचाल कलम सॉफ्टवून ग्राफ्टिंग, हाईवूड ग्राफ्टिंग या प्रकार अभिवृद्धी केली जाते.

जुलै ते सप्टेंबर या काळात रूटस्टॉंकमध्ये व भरणार्‍या काड्यांमध्येही रसरशीतपणा असतो. म्हणून अशा काळात कलम केलेली बाग पुढील हंगामात चांगले उत्पादन देते.

याशिवाय १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंतही रूटस्टॉंकवर कलमे केल्यास कलमांची चांगली वाढ होऊन उत्पादन अधिक मिळते. यासाठी रूटस्टॉंकची लागवड जूनमध्ये केलेली असावी. म्हणजे जानेवारीपर्यंत रूटस्टॉंकच्या वेली कलम करण्यायोग्य तयार होतील. म्हणजेच रूटस्टॉंक हुंडी लागवडीनंतर ६ ते ७ महिन्यात मुळात व खोडात भरपूर अन्नद्रव्यांचे प्रमाण साठलेले असेल. त्या अन्नाचा कलमाच्या वाढीस चांगला फायदा होतो.

कलमासाठी जातीची निवड : बहुतांशी थॉमसन सिडलेस या जातीची कलमासाठी निवड केली जाते. तसेच याशिवाय थॉमसन सिडलेसची उपजात तास - ए- गणेशच्या जातीचेही निर्यातक्षम उत्पादन घेता येत असल्याने या वाणाच्या काड्यांची कलमांसाठी निवड केली जाते. याखेरीज सुपेरिअर हा इस्राईलचा वाण, एच- ५ बी ह्या ऑस्ट्रेलियान संकरीत वाणाचीही कलमासाठी निवड केली जाते. मात्र या वाणांचे उत्पादन फारसे मिळतनसल्याचे आढळले आहे.

छाटची निवड : यशस्वी द्रक्षबागेसाठी छाट अत्यंत चांगले निवडणे फार महत्त्वाचे असते. छाट निवडताना त्यावरील पेरे आखुड असावेत दोन डोळ्यांचेच छाट घ्यावेत. जादा डोळ्यांचे छाट घेतल्यास फूट व्यवस्थित येत नाही. एका काडीवरील मधील भागातील पेरे मोठे व रसरशीत डोळे फुटलेले असावेत. रोगग्रस्त (विशेषत : डावणी, करपा, मिलीबिग्ज ) काड्या घेऊ नयेत. काडीवरील पाने १ सेमी देठे ठेवून कापावीत. म्हणजे कडीतील पाणी उत्सर्जन होणार नाही.

काड्या लांबून आणावयाच्या असल्यास त्यामध्ये ४- ५ दिवस जाणार असल्यास त्या काडया पोत्यात बांधून वेळोवेळी पाण्यात (जर्मिनेटर द्रावणात) भिजवावीत.

खुंटावर कलम करणे: - फेब्रीवारी - मार्च महिन्यात लागण केलेली रोपे सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत कलम करण्यास योग्य होतात काड्यांची जाडी ८ ते १० मी. मी. होते. तसेच त्यात पुरेसा अन्नसाठा निर्माण होतो. अशा पद्धतीने तयार केलेली खुंटाची फूट बांबूपासून वेगळी करून त्याचा दीड फूट उंचीवरील भाग कापून टाकणे. खुंट (Stock) काडीवरील सर्व पाने व बगलफुटी काढाव्यात. पाने व बगलफूटी कमी केल्यामुळे मुख्य काड्यामध्ये अन्नसाठा टिकून राहतो. एका वेळेस दोन काडांवर कलम करावे. खुंटावरील बाजूस ४ ते ५ सेंमी. पर्यंत उभी खाच पाडावी. पाचर कलम करताना कलम काडीस (सायन) चाकूने पाचारीसारखा आकार व्यवस्थित बसवून ते प्लॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने बांधावे. कलम काडी व खुंटाची जाडी एकसारखी असावी. दीड फुटावर कलम करावे. कलम काड्या बाविस्टीन १ ग्रॅम / लि/ + ३० मिली. जर्मिनेटर या द्रावणात बुडवून लावाव्यात.

सध्याच्या प्रचलित वाय पद्धतीने अंतरावरील रूटस्टॉंक वरील बागेत उत्पादन चांगल्या पद्धती घेता येत.

कलमांची वाढ व निरोगी होण्यासाठी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० ते २५० लि. पाणी या प्रमाणात फवारणी दर १५ दिवसांनी केल्यास रूटस्टॉंकवरील बाग निर्यातक्षम व अधिक उत्पादन देऊ शकते. इतर फुटी वेळच्या वेळेस काढाव्यात. निफाड, दिंडोरी,नाशिक या भागातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी रूट स्टॉंकसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्षबागा वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उत्पादकताही वाढविली आहे.

आपण द्राक्ष बागेत एकाचवेळी कलम केले तरी कलम फुटण्यास वेगवेगळा कालावधी लागतो. बागेत एकसारखी वाढ दिसून येत नाही. अशावेळेस फेब्रुवारी - मार्च मध्ये ३ ते ४ डोळे ठेवून छाटणी करावी. विविध समस्येवर मात करण्यासाठी द्राक्षाची खुंटावरील लागवड ही अधिक फायदेशीर आहे, हे निश्चितच.

बहुतेक द्राक्ष बागायतदार पाचर कलमांचा वापर करीत आहेत. परंतु या पद्धतीमध्ये कलमाचा जोड केव्हांही निघू शकतो. प्लॅस्टिकची पट्टी घट्ट झाल्यास ढिल्ली करून बांधावी. तसेच सुतळीने कलमाचा जोड बांधावा.

रिकटनंतर डोळ्यांवर हायड्रोजन सायनासाईड समवेत जर्मिनेटरच्या वापराने फूट लवकर व एक सारखी मिळते. रूटवरील नवीन बागेला पहिले ३ वर्षे हायड्रोजन सायनामाईडची पेस्ट २ वेळेस करावी लागते. कारण काड्या जाड बनलेल्या असतात आणि त्या चांगल्या तर्‍हेने फुटण्यासाठी हा वापर गरजेचा असतो. वेलीच्या वाढीच्या काळात बुरशीनाशक व किटकनाशकांच्या फवारणीमुळे रोग व किडींना अटकाव करता येतो. त्याचप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढून निरोगी वाढ होते. पाणी व खते यांची आवश्यकता गरजेची असून जोमदार वाढीसाठी ठिबकमधून १९ : १९: १९ तारखेपर्यंत वाढीची अवस्था असेपर्यंत व ०:५२ : ३४ ओलांड्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत एकरी ५०० ग्रॅम त्याचबरोबर जर्मिनेटर व प्रिझम दर १५ दिवसांनी शेंडावाढीसाठी एकरी १ लि प्रमाणे द्यावे. शेवटचे सबकेन पिंचींग काळात ०:० :५० एक किलो एकरी व फवारणीद्वारे थ्राईवर व क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात द्यावे.

जमिनीतून द्यावयाची मात्रा (Soil Application)

रासायनिक खताची मात्रा २३ : २३ : ० - २५ ग्रॅम प्रति वेल व त्यानंतर युरिया २५ ग्रॅम/ वेल. त्याचप्रमाणे सेंद्रिय खताचा वापरकल्पतरू ५० ग्रॅम प्रति वेल सुरूवातीच्या वाढीच्या काळात दिल्यास वाढ चांगली होईल. जर्मिनेटर ड्रिपमधून एकरी एक लि. २०० लि. पाण्यातून आठ दिवसांनी दोन वेळा द्यावे.

काडी तयार झाल्यानंतर थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केल्यास वेल ऑक्टोबर छाटणीकरीता तयार होतो. व पहिल्याच वर्षी उत्पादन येण्यास मदत होते.

ऑक्टोबर छाटणीसाठी सुरूवातीस पेस्टमधील हायड्रोजन सायनामाईडबरोबर जर्मिनेटर १ लि. वापर एकसारखी फुट व लवकर फूट होण्यास मदत होते. रूटस्टॉंक वरील काड्या नवीन बागेत सुरुवातीस जाड होतात व फुटण्यास ताण देतात. अशावेळी जर्मिनेटर चा हायड्रोजन सायनामाईडबरोबर वापर अधिक फायदेशीर ठरतो. सलग दोन ते तीन वर्ष दोन्ही छाटणीवेळी (एप्रिल व ऑक्टोबर वरीलप्रमाणे पेस्टमध्ये जर्मिनेटरचा वापर करावा.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून रूट स्टॉंक वाढ व काड्या लवकर तयार झालेल्या शेतकर्‍यांचे अनुभव :

१) कैलास पाटील, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोडी, जि. नाशिक, फोन नं. २७४२९७

रूटस्टॉंक : ६ एकर व्हिटीस चॅम्पीनी डॉंग्रीज वर थॉमसनचे ग्राफ्टिंग केले. नंतर जर्मिनेटर चे ड्रेंचिंग २ वेळेस (१ लि. / २०० लि. पाणी याप्रमाणे ) केले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ४ फवारण्या केल्या तर प्रथम वर्षी एकरात ३०० क्विंटल माल निघाला.

२) विजय पोपटराव देशमुख, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोडी, जि. नाशिक. फोन : ९९२१५९४७१४

रूटस्टॉंक -३ एकर डॉंग्रीज आहे. १॥ एकर रूटस्टॉंक मागील वर्षी रिकट घेतला. ग्राफ्टिंग १॥ एकर डॉंग्रीज हुंडी लागण २६ फेब्रुवारी २००७ रोजी केली. जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात ड्रिपद्वारे दोन वेळेस दिले. मुळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. फुटवा अतिशय चांगला मिळाला. फवारणीमधून जर्मिनेटर + थ्राईवर १ लि. / २०० लि. पाणी दर १५ दिवसांनी एकंदरीत ३ फवारण्या केल्या. तर काडीमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नसाठा निर्माण झाला. काड्या १० ते १२ एम. एम. साईजच्या मिळाल्या. थॉमसनची ग्राफ्टिंग १५ दिवसांनी करीत आहे.

३) शिवाजी मधुकर बोरस्ते, मु. पो. दिंडोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. रूटस्टॉंक - डॉंग्रीज ३ एकर.

लागण : १८ जून २०० ची आहे. जर्मिनेटरचा ड्रिपमधून २०० लि. पाणी + १ लि. जर्मिनेटरया प्रमाणात दोन वेळेस केला. नंतर जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली.

काड्या जोमदार वाढल्या, सरळ काड्यांची वाढ चांगली मिळाली. ग्राफ्टिंगसाठी बाग लवकर तयार झाली.

४) संदीप उफाडे, मु. पो. साकोरे, ता. निफाड, जि. नाशिक. मो. ९८२२३३१९९९

मी नोव्हेंबर २००५ रोजी रूट स्टॉंक डॉंग्रीज १॥ एकर लागवड केली. सुरुवातीस १५ दिवसांनी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात ठिबकमधून दिले. त्याने मुळ्यांची संख्या वाढल्यामुळे रूटस्टॉंक चांगला वाढला. नंतर दोन निरोगी सरळ वाढीच्या काड्या राखून इतर सर्व बारीक काड्या काढून टाकल्या. झाडांना बांबूचा आधार दिला. काडी १० ते १२ मीमी. साईजची झाल्यावर १९/ ०९/ ०६ रोजी ग्राफ्टिंग केली. ग्राफ्टिंगनंतर ७० व्या दिवशी जर्मिनेटरची फवारणी केली. त्याने वाढ चांगली झाली, फुटवा चांगला मिळाला. आजपर्यंत जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि./ २०० पाणी या प्रमाणात ४ फवारण्या केल्या. ओलांडे होऊन आज रोजी द्राक्ष बाग छारणीस तयार झाला. काड्या पक्व होण्यासाठी ०:५२ :३४ व राईपनरचा फवारणीत वापर १५ दिवसांपूर्वी केला. रिकट झाडांसाठी सध्या फवारणी घेत आहे.

५) पतंगराव देशमुख, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. मो.९९७५३६९०८१,

मी डॉंग्रीज हुंडी २॥ एकर लावली. जर्मिनेटचा लागवडीनंतर १५ दिवसांनी ठिबकमधून दोन वेळेस वापर केला. नंतर फवारणीतून एक वेळेस वापर ५ मी./ लि. या प्रमाणात केला. त्यामुळे रूटस्टॉंकच्या काड्या चांगल्या बनल्या. मुल्यांची वाढ झाली. थॉमसनची काडी (सायन) कलम २० दिवसांनी (सप्टें. ०७) करीत आहे.

६) रावसाहेब देशमुख, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी (नाशिक). मी ३ एकर डॉंग्रीज रूटस्टॉंकवर थॉमसन काडी (कमल) केली. सप्टेंबर २००६ मध्ये जर्मिनेटरच्या वापरामुळे शेंडा वाढला. फवारणी तसेच ड्रिपमधून वापर अधिक फायदेशीर जाणवला. १ एकर नवीन लागवडीवर सोनाका काडी (सायन) ग्राफ्टिंग करीत आहे.

७) आरून बबन शिंदे, मु. पो. शिलापूर, ता. जि. नाशिक डॉंग्रीज - १ एकर, लागण - १८-जून २००७, जर्मिनेटर ड्रिपमधून वापर एक वेळेस केला. रिझल्ट चांगला मिळाला.

८) संजय भिकाजी गोरे, मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक. फोने : ९९७५३९२३३७

आमचेकडे बर्‍याच बागायतदारांनी बेंगलोर डॉंग्रीज रूटची लागवड केली. आम्ही ही ३ ॥ एकर बेंगलोर डॉंग्रीजची ७/ ०३/ ०६ रोजी लागवड केली. जुन्या बागेसाठी औषधे वापरलेली असून जर्मिनेटरच्या अनुभव होताच. रूटसाठी जर्मिनेटरचा वापर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात ड्रिपमधून केला. फवारणीमधून २०० लि. पाण्यासाठी जर्मिनेटर, १ लि + थ्राईवर १ लि. घेतले. १५ - १५ दिवसांनी फवारणी व ड्रिपमधून जर्मिनेटर दोन वेळेस दिले. आमचा रूट स्टॉंक फारच चांगला वाढला. काड्या ८ ते १० मी.मी. साईजच्या बनल्या. जर्मिनेटरमुळे शेंडा वाढला. पाने रुंद झाली. मुळ्या वाढल्या. एकसारखी कलमे वाढली, काडी एकसारखी झाली, गोल बनली, काड्यांना, पानांना शाईनिंग अप्रतिम आली. दोन निरोगी सरळ वाढीच्या काड्या ठेवून बाकीच्या काढल्या. ६ इंचापर्यंत खुंट मोकळा केला होता. कलमाची तयारी केली. २३/ ०९ / ०६ रोजी पाचर कलम केले. जमिनीपासून दीड फुटावर कलम केले. कलमासाठी सोनाकाची काडी (सायन) भरली. जर्मिनेटर ३० मिली + १ ग्रॅम बाविस्टीनच्या द्रावणात काडी बुडवून लावली. नवीन फूट चांगली वाढली. कलमाचा जोड पक्का झाल्यानंतर प्लॅस्टिक काढले. त्यापूर्वी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी ड्रेंचिंग केले. कलम केल्यानंतर ८० व्या दिवशी जर्मिनेटर ५ मिली/ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली होती. आतापर्यंत वाढ चांगली झाली. पाने रुंद व निरोगी आहेत. जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + ३०० लि. पाणी या प्रमाणात एकंदरीत ४ फवारण्या केल्या.