डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रासायनिक बुरशीनाशक व किटकनाशकांच्या खर्चात बचत

श्री. भिकाजी लक्ष्मण गोरे, मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
मोबा. ९९७५३९२३३७


सोनाका द्राक्षबाग ८ वर्षापुर्वी दीड एकरमध्ये १०' x ५' वर लावलेली आहे. तर थॉमसन २ एकर आहे. सोनाकाची छाटणी २६ सप्टेंबर तर थॉमसन ९ ऑक्टोबर २००७ ला केली.

जर्मिनेटर १ लि. चा २८ लि. पेस्टमधील वापराने फुटी जोमदार व एकसारख्या मिळाल्या. पोंग्यातील थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि.च्या फवारणीमुळे घड टपोरे व मोठे निघाले. घड जिरले नाहीत. वरील फवारणीनंतर ८ ते १० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि पाण्यातून फवारणी केली. त्याने शेंडा जोमदार वाढला. पाने रुंद, रफ, निरोगी होऊन डाऊनी मिल्ड्यू रोगप्रतिकारक शक्ती वाढली. खराब वातावरणापासून बागेचे संरक्षण झाले. बुरशीनाशक व किटकनाशकांचा काही प्रमाणात वापर केला. रासायनिक खतांचा वापरही छाटणीच्या वेळेस व डिपींगनंतर केला.

सोनाका द्राक्षबागेस पहिल्या डिपींगमध्ये जर्मिनेटर ७ मिली प्रति लिटर + जी. ए. सायट्रीक अॅसिडचा वापर केला. मण्याला लांबी व साईडपाकळ्या मिळाल्या. फुलोरा ८०% झाल्यानंतर दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात केली. दुसऱ्या डिपींमध्ये जर्मिनेटर ५ मिली + राइपनर ५ मिली प्रति लिटरला घेऊन जी. ए. सह वापर केला. त्याने घडांना आकार मिळून पोषण झाले.

तिसरी फवारणी मणी ज्वारीच्या आकाराचे असतात थ्राईवर, क्रॉंपशाईन,राईपनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे प्रत्येक मणी व्यवस्थित पोसला. द्राक्ष मण्यात ५०% पाणी उतरतान थ्राईवर, क्रॉंपशाईन, राईपनर प्रत्येकी १ लि. ची २०० लिटर पाण्यातून फवारणी केली. सोनाकामध्ये ११८ क्विंटल माल निघाला. त्याला १८०० रू. क्विंटल दर मिळाला तर थॉमसनचा १२७ क्विंटल माल निघला. तो १३५१ रू. ने विकला.