द्राक्षालाडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थॉम्पसनचे दर्जेदार दुप्पट उत्पादन

श्री. शिवाजी निवृत्ती देशमुख, मु. पो. कुरोली, ता. खटाव, जि. सातारा


द्राक्ष थॉम्पसन एप्रिल छाटणीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत वापरत होतो. ठिबक केली आहे. जुन्या मांडव पद्धतीची बाग आहे. गेल्या वर्षी प्रथमच ही औषधे वापरली. न वापरता ४- ५ टन माल निघायचा. गेल्यावर्षी ८ टन माल निघाला. वॉटरबेरीज, शॉटरबेरीज, पिंकबेरीज कुठे तरी असे शेवटपर्यंत माल चांगला होता. माल १७ - १८ रू. किलोने पुणे - मुंबईस गेला. चांगला माल असल्याने किरकोळ स्थानिक पाटीवाल्यांना विकला. खर्च वजा जात ९५ हजार रू. झाले.