उडद्या किडीने खाल्लेल्या गावच्या बागा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुटल्या

श्री. संजय खाशेराव पवार, मु. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली,
फोन: (०२३४६) २२११७३


द्राक्ष: तास - ए - गणेश, थॉम्पसन, सोनाका

गेले २० -२२ वर्षापासून द्राक्ष करीत आहे. ८ - १० - वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करीत आहे. अगोदर रासायनिक औषधे वापरित होतो. तर त्यावेळेस १२ ते १४ टन उत्पादन मिळत होते. तेच आता १६ ते १८ टनापर्यंत गेले आहे. तसेच रासायनिक औषधांच्या फवारणीपेक्षा १० ते १५ हजार रुपये खर्च कमी येतो. तसेच एप्रिल छाटणीला उडद्या किडीने आलेले कोंब खाल्ले त्यामुळे बागा मुक्या राहिल्या. परत फुटल्या नाहीत. आम्ही त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली, तर आमचा पुर्ण प्लॉट परत फुटला. गावातील सर्व शेतकर्‍यांनी ही बाग पाहिल्यावर गावाच्या सर्व द्राक्षबागायतदारांनी या औषधांचा वापर केला. जवळच्या दुकानातील औषधे संपल्यावर लांबून औषधे आणून फवारली. तेव्हा त्यांच्या सर्व बागा फुटल्या.