डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी द्राक्षासाठी वरदान

श्री. किसनराव गणपतराव जाधव, मु. पो. कवठे एकंद, ता. तासगांव, जि. सांगली


द्राक्ष - सोनाका, थॉम्पसन, क्षेत्र - प्रत्येकी १ एकर.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची २ वर्षापासून औषधे वापरत आहे. यावर्षी मागील वर्षाप्रमाणेच लवकर द्राक्षाची गोड छाटणी घेतली. यावर्षी सर्व पिकास औषधे वापरली. पेस्टमध्ये जर्मिनेटर वापरले. त्यामुळे बाग अतिशय चांगली व लवकर फुटली. महितीपत्रकाप्रमाणे पुर्ण फवारणी घेतली तर

१) बागेचा शेंडा अतिशय चांगला चालला, त्यामुळे सनबर्न नाही.

२) डिपींगमध्ये जर्मिनेटर, राईपनर घेतले त्यामुळे पाकळ्या चांगल्या निघालाय. द्राक्षाची साईज चांगली झाली. मण्यांची फुगवण चांगली २० ते २१ एम. एम. झाली.

३) पानाची लांबी, रुंदी मोठी मिळाली व काळोखी भरपूर होती.

४ ) बागेस पाऊसापासून १०० % संरक्षण मिळाले.

५) मालाला चकाकी भरपूर होती, त्यामुळे दुसर्‍या शेतकर्‍यांच्या मालास जो दर होता त्यापेक्षा पेटीस ११ रू. जादा दर मिळाला.

६) सुट्टे मणी किंवा घाण अजिबात नसल्याने मालाची तोडणी केली की पेटीत भरत होतो.

७) साखर भरपूर होती.

८) झाडावर ६० ते ८० घड होते, तरीही झाडे अतिशय चांगली होती.

९) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे शेतकर्‍यास वरदान आहेत ही सर्वांनी वापरली पाहिजे असे मला वाटते.