वाईन द्राक्ष लागवडीसाठी तंत्रज्ञान वापर

श्री. केशव बाजीराव मोरे (पिंगळ) , मु. पो. अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
फोने :(०२५५७) २२१४५७, मो. ९९२२५५५९९९


मी वाईन द्राक्ष लागवड करण्याचे ठरविले, कॅबरनेट सोव्हिनिओची ४ एकर मध्ये ९' x ५' फुटावर २५/ ०४ / ०६ रोजी लागवड केली.

उमराळे येथील सुला वाईनरीची २०० एकरवर लागवड असलेल्या नर्सरीतून कलमे आणली. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात डोळे भरले. डोळे भरल्यानंतर (ग्राफ्टिंग) जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात ड्रेंचिंग केले. सरांची औषधे माझ्याकडे असलेल्या खाण्याच्या द्राक्ष बागेसाठी (table Grapes) गेली ५ वर्षापासून फवारणीमधून वापरून अप्रतिम रिझल्ट घेतले आहेत. वाईन द्राक्षासाठी फवारणीतून जर्मिनेटर चा वापर (१ लि. + २०० लि. पाणी) या प्रमाणत केला. वाढ जोमदार झाली, शेंडे वाढले. नंतर दर १५ दिवसांनी वरीलप्रमाणे फवारणी केली. ३ वेळेस फवारणी एक वेळेस ड्रेंचिंग यामुळे पाने टिकून राहिली. काही झाडे पंजावर होती. तर काही झाडे निम्म्यावरच होती. अर्ध्यावरची झाडे एका लेव्हलमध्ये आली. पाने रुंद झाली. शेंडा स्टॉंप झालेला असताना तो चालायला लागला. आजपर्यंत पाने टिकून आहेत. बोर्डोच्या फवारण्या झाल्या. काड्या तयार झाल्या जवळच असलेल्या सीग्राम कंपनीशी ३० रू. किलो ने करार झालेला आहे. माझ्याबरोबरच वलखेड, ता. दिंडोरी येथे कॅबरनेट सोव्हिनिओ द्राक्ष वाईन जातीची लागवड करणारे द्राक्ष बागायदार आहेत. मी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात ऑक्टोबर छाटणी करणार आहे.

जगातील वाईनची परिस्थिती :

जगामध्ये फ्रान्स, इटली, अमेरिका, जर्मनी, स्पेन, अर्जेटिना, ब्रिटन, रशिया हे देश वाईन खपात अग्रस्थानी आहेत. आज जगामध्ये इटली, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, चिली, अमेरिका, जर्मनी, दक्षिण आफ्रिका हे देश वाईन निर्यातीत तर जर्मनी, युनायटेड किंगडम, अमेरिका, फ्रान्स, निर्यातीत तर जर्मनी, युनायटेड किंगडम, अमेरिका, फ्रान्स , रशिया, बेल्जियम, कॅनडा, इटली, डेन्मार्क, स्वीत्झलँड व जपान हे देश वाईन आयात करण्यात अग्रस्थानी आहेत. जगात जेवढी वाईन प्याली जाते त्यापैकी १० -११% वाईन ही जपान, बेल्जियम उत्पादन करणार्‍या देशातच सेवन केली जाते.

वाईन उत्पादकांना वाईन विक्रीसाठी पाश्चात्य देशांचा बाजारपेठेसाठी विचार करावा लागणार आहे. जगात वाईन सेवन करणार्‍यांचे प्रमाण १२ ते १५ % ने वाढत आहे.

परदेशा वाईनची प्रसंगानुरूप निवड करून जरी सेवन केली जात असली, तरी पारंपारिकहि भोजनाबरोबर वाईन सेवनाची पद्धत आहे. त्यामुळे तेथे ते अभिजात दर्जाचे पेय मानले जाते. परदेशामध्ये विशेषत: लक्झबमर्गमध्ये वाईन सेवनाचे प्रमाण दरवर्षी दरडोई ६३ लिटर, तर फ्रांसमध्ये दरडोई ५३ लिटर, इटलीमध्ये ४८ लिटर, क्रोअॅशियामध्ये ४८ लिटर, पोर्तुगालमध्ये६ ४६ लिटर, स्पेनमध्ये ३४ लिटर, अर्जेंटिनामध्ये २८ लिटर, अमेरिकेमध्ये २५ लिटर, युनायटेड किंगडममध्ये २४ लिटर तर ऑस्ट्रेलियामध्ये २० लिटर वाईनचे सेवन केले जाते. हेच प्रमाण चीनमध्ये दरवर्षी दरडोई ४ लिटर असून, भारतात फक्त ६ ते ७ मिली आहे. विकासित देशात आता वाईन सेवन वाढण्यास फार वाव दिसत नाही. आशिया खंडात मद्य सेवनाच्या सवयी बदलत असल्याने आशिया खंडातील देशांमध्ये वाईनचे उत्पादन होत नसूनसुद्धा वाईनचे सेवन दरवर्षी वाढत आहे. अशा ठिकाणी वाईन विक्रीसाठी भविष्यकाळात फार वाव आहे.

भारतातील वाईनची परिस्थिती :

भारतातील दरवर्षी दरडोई वाईनचे सेवन बाधीतले तर इतर देशांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे फक्त एक ते सव्वा चमचा जरी असले तरीपण रॅबो आंतरराष्ट्रीय बँक या सहकारी बँकेच्या सर्वेक्षणानुसार भारतातील वाईन सेवन प्रमाण वाढत राहील असा अंदाज २००२ साली व्यक्त केला होता. परंतु २००५ साली वाईन सेवनाचे प्रमाण अचानक ३० ते ४० टक्क्यांनी वाढले होते. याचा अर्थ आपल्याकडे वाईन सेवनाचे प्रमाण हळूहळू का होईना वाढत असून भविष्यकाळात भारतीय वाईनला स्थानिक बाजारपेठत चांगले भवितव्य आहे असे दिसून येते. भारतामध्ये २००४ साली ५१ म्हणजे ७० ते १०० कोटी रूपयांची वाईन परदेशामधून आयात झाली होती. भारतामध्ये २००५ साली ७६ लाख लिटर वाईन होती. परंतु परदेशामधून वाईन आयात होण्याचे प्रमाण थोडे कमी झाले होते.

सध्या ज्या वाईन्स परदेशांतून आयात होतात अशा वाईन्सवर भारतात सी. आय. एफ. किंमत प्रति केस अथवा बल्क, लिटर, मुख्य शुल्क, विशेष अतिरिक्त शुल्क, जमिनीवरील किंमत, लेबल व पॅकिंग फी, वाहतूक फी, व्हेंड फी, जकात, आयात - निर्यात व्यापार परवाना फी, होलसेल व किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन, सेल्स टॅक्स इ. लागू होते.

आपल्याकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष वाईनला मागणी आज तरी बेताचीच राहणार असल्याने आपल्याला परदेशातील बाजारपेठ शोधावीच लागणार आहे. म्हणून आपल्याकडे जे शेतकरी अथवा उद्योजक बंधू वाईन प्रकल्प उभा करण्याच्या तयारीत किंवा त्याबाबतीत विचार करीत आहेत. त्यांच्या मनात सर्वात जास्त भीती ही वाईन विक्रीच्या बाबतीत आहे.

वाईन विक्री : सध्या वाईन उद्योगात बाजार व्यवस्थेवर होणार खर्च प्रति बाटली ५५ ते ८० रुपये (अर्थातच तुम्ही वाईन विक्री कशी करता त्यावर अवलंबून आहे) येत असला तरी मार्केटिंगमध्ये एक नियम असा मानला गेला आहे की, जर आपल्याला आपल्या कोणत्याही वस्तूचे मार्केटिंग करायचे असेल, तर अशी वस्तू बनविण्यासाठी जेवढा उत्पादन खर्च आला असेल तेवढाच अथवा त्याच्या दुप्पट खर्च ती वस्तू बाजारात विकायला करावा लागतो. म्हणजे येथे वाईनच्या उत्पादन खर्चाएवढाच अथवा दुप्पट खर्च जर आपण आपली वाईन बाजारात विकण्यासाठी केला तर आपल्याला यश मिळणे लवकरच शक्य होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या संस्थेने उभारलेल्या ग्रेप वाईन पार्कमध्ये आपला वाईन प्रकल्प अभारला तर महाग असणारी मशिनरी व तांत्रिक व्यक्तिसेवा या ग्रेप वाईन पार्कमध्ये भाडेतत्वावर वाईन उत्पादकाला उपलबध होतात. त्यामुळे सुरुवातीलाचा होणारी मोठी गुंतवणूक कमी होऊन जाते. परिणामी वाईन उत्पादकावर फार मोठा आर्थिक बोजा येत नाही. त्यामुळे त्याला स्वत: कडील भांडवल, वाईनची विक्री व विपणन व्यवस्था करण्यासाठी खेळते भांडवल, म्हणून वापरता येते. त्यामध्ये जर अजून ४ ते ५ व्यक्ती भागीदारीत अथवा त्याहीपेक्षा जास्त व्यक्तींनी सहकारी तत्वावर वाईन पार्कमध्ये वाईन प्रकल्प उभारून, त्यातीलच काही व्यक्तींनी वाईन द्राक्ष बागेची लागवड केली अथवा शेतकरी बंधुबरोबर करार करून त्यांना लागवड करण्यास सांगितले तर खर्चाची विभागणी होऊन वाईन उत्पादकाकडील उरलेले मोठे भांडवल वाईनचे मार्केटिंग करण्यासाठी वापरता येईल व असा वाईन प्रकल्प थोड्या अवधीतच यशस्वी झाल्याचे दिसून येईल. वाईन द्राक्ष लागवड, वाईन उत्पादन व मार्केटिंगचा खर्च लक्षात घेत वाईन प्रकल्पाची क्षमता टप्याटप्याने वाढविणेच हितकारक ठरते.

वाईन निर्यात : जागतिक स्तरावर वाईन आयात करण्यात तसेच निर्यातीमध्ये जर्मनी, फ्रान्स व इतर युरोपियन देशांचा जगात वरचा क्रमांक आहे. या देशांमध्ये वाईनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊन स्वत: ची गरज प्रथम भागवली जाते आणि नंतर इतर देशांत वाईनची निर्यात होते. तसेच देशांतर्गत उत्पादक कमी पडेल तर इतर देशांमधूनही मोठ्या प्रमाणावर वाईनची आयात होते. आयात निर्यात हे चक्र सातत्याने फिरत असणे महत्वाचे आहे. वाईन उत्पादक देशांमध्ये वाईन निर्मिती नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून उत्पादन खर्च बराचसा कमी करण्यात आलेला आहे. दुसर्‍या बाजूला जुन्या पद्धतीने वाईन निर्मिती करणारे स्वतंत्र जग आहे. परंतु नव्या वाईनच्या तुलनेत जुन्या वाईनची मागणी घटत चाललेली आहे. परिणामी वाईन निर्मितीच्या नव्या तंत्रज्ञानाला जगभर सर्वत्र मागणी आहे व निर्यातीलासुद्धा भावी संधी आहेत.

वाईनची व्यावसायिकता: भारतातील विशेषता : महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचा काळ आहे. भारतात १९ व २० व्या शतकात वाईन निर्मिती व्यावसायिक तत्वावर सुरू झाली ती फ फक्त भारतापुरतीचा मर्यादित असून, निर्यातीसाठी खास वाईन बनविणे, अद्याप म्हणावे तितके सर्वांनाच शक्य झालेली नाही. परंतु संधी मात्र जरूर आहे. आपली भारतीय वाईन परदेशामध्ये निर्यात करणे आज जरी आपल्याला अवघड वाटत असले, तरीपण सध्या भारतीय वाईनला विदेशात मोठी मागणी आहे. कारण एकट्या युरोपीय समूहातील देशांमध्ये भारतीय अन्न पुरविणे सहा हजार भारतीय हॉटेल्स व्यवस्थित व्यवसाय करीत असून त्या भारतीय अन्नपद्रार्थबरोबरच भारतीय वाईनचा पुरवठा करायचा आहे हे विसरून चालणार नाही. हा मोठा भारतीय ग्राहक वर्ग भारतीय वाईनच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आश हॉटेल्समध्ये चांगल्या गुणवत्तेची वाईन योग्य किमतीत उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रातील वाईन उद्योगाचे भवितव्य ३ ते ४ वर्षात बदलून जगाच्या पाठीवर भारताचे नाव वाईन उद्योगाशी जोडले जाईल अशी दाट शकयता वाटत आहे. भारतात एकदा का हा वाईन उद्योग स्थिरावला तर भविष्यकाळात परदेशी बाजारपेठ मिळविणे सोपे जाईल.

वाहतूक व्यवस्थापन : १००० ते २४०० लिटर क्षमतेच्या बलूनमधून (फ्लेक्सी बॅग) ठराविक ठिकाणी ड्राय कंटनेरमधून केली जाते. त्यात भरपूर प्रमाणात सल्फर डाय ऑक्साईड मिसळून टँक किंवा बलून हा ऑक्सिजनविरहीत केला जातो व साठ दिवसांत वाईनचा पुरवठा जगातल्या कुठल्याही देशात करता येतो. येथे बलून एकदा वापरला की, परत त्याचा वापर करता येत नाही. बाटल्यांमध्ये भरलेल्या वाईनची आयात अथवा निर्यातदेखील सहज शक्य आहे. साधारणत: २० ते ४० फुटी कंटेनरमध्ये १२,००० ते ४०,००० बाटल्या किंवा १००० ते ३३३० बॉक्स (एक बॉक्समध्ये १२ बाटल्या) विदेशात पाठवू शकतो. भारतातील द्राक्ष वाईनला भवितव्य आहे एवढे निश्चित. परंतु वाईन सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात येईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाईनची मागणी : थोड्याच वर्षानंतर भारतातील वाईन खपाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत वाढलेले दिसेल. कारण आपली लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. पण सध्या तरी काही वर्ष आपणास वाईनच्या निर्यातीवरसुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशात दर्जेदार वाईन निर्मिती झाली तर स्वच्छ सुर्यप्रकाशाच्या देशातील वाईन जगभर व जेथे वाईन कल्चर आहे तिथेही आपली वाईन निर्यात होऊ शकेल. वाईनला अर्ध्याहून अधिक जगात मागणी असून भारतीय वाईन उत्पादकांना ते सहज शक्य आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे नफा कमवून भारतीय वाईनची जास्तीत निर्यात करणे व भरपूर परकीय चलन मिळविणे हे दिवस आता दूर राहिलेले नाहीत.

सध्या भारतामध्ये ८०% वाईनचे सेवनाचे प्रमाण फक्त मुंबई ३९ %, दिल्ली २३%, बंगलोर ९%, गोवा ९% असे असून उरलेले २०% सेवनाचे प्रमाण इतर शहरांत आहे. सध्या पुणे, कोलकत्ता, राजस्थान येथेसुद्धा वाईन सेवन प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रमधून शँपेन इंडेज लि. पुणे, सामंत वाईन्स प्रा. लि. राजाधीर वाईन प्रा. लि., फाईन. एन. सी. वाइन्स सांगली व बंगलोरमधून ग्रोव्हर व्हिनियार्ड प्रकारच्या द्राक्ष वाईन्स (परकीय चलन रू.५ .२ कोटी) फ्रान्स, इटली जर्मनी, हॉलंड, अमेरिका, न्युयॉर्क, सिंगापूर, ब्राझील या देशांमध्ये निर्यात केली असून नाशिक विंचूर येथील गोदावरी वाईन २००६ साली हॉलंड येथे निर्यात केली होती. तरी पण दरवर्षी होणार्‍या भारतीया वाईनच्या निर्यातीचा आकडा पहिला तर निर्यातीत फार सावकाशरीत्या वाढ होत असल्याचे दिसून येते. सध्या अमेरिका, जर्मनी, युनायटेड किंगडम, थायलंड, अरेबियन देशांमध्ये भारतीय वाईनची निर्यात वाढत आहे.