प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा सदुपयोग व संभाव्य उत्पादन, उत्पन्नात भरीव वाढ

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


दुष्काळ हा मानवनिर्मित असो वा निसर्गाच्या अवकृपेने असो, दोन्ही ठिकाणी माणुस चुकल्याशिवाय निसर्ग कधीच कोपत नाही. परिस्थितीच्या परिणामावर उणे - दुणे काढणे, दोषारोप करणे, विनाकारण त्याचे राजकारण करून भांडवल करणे हे मानवतेला धरून नाही. प्रतिकुल परिस्थितीमध्ये काळ निभावून नेणे किंवा 'असेच चालत राहायचे' असे म्हणण्यापेक्षा आपल्या ऐहिक गरजा कमफर्ट (Comfort) न बघता अत्यावश्यक (Necessary) ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी संकटातून उपाय शोधणे व संकटाला संधी मानून मार्ग काढणे हेच माणसाच्या स्वभावाला शोभनीय ठरते.

आता आपण गेल्या ४ वर्षाच्या पाण्याच्या त्रुटीतून काय साध्य करता यईल ते बघुया -मूळ म्हणजे या सर्व परिस्थितीला उसाला आडमाप दिलेले मोकाट पाणी यावर खालील उपाय करता येण्यासारखे आहेत.

सरकारने, साखर कारखान्यांनी व शेतकऱ्यांनी जेवढे अत्यावश्यक क्षेत्र आहे तेवढेच लावणे. या करिता सरकारने निर्बंध घालणे. हल्ली १० - २० वर्षापासून मजूर मिळत नाही व पाणी आणि खत दिले की, ऊस येतो या भ्रामक कल्पनेला निसर्गाने तडा दिला आहे. यासाठी पट्टा पद्धत आणून एक डोळा पद्धतीने कोकोपीटमध्ये जर्मिनेट व कल्पतरूचा वापर करून १ ते २ महिन्याची रोपे केली तर सुरूवातीचे २५% पाणी वाचते. पुढील उसाच्या वाढीच्या काळात जेवढे शक्य तेवढे तृषार व ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ७५% पाण्याची बचत होते. पण म्हणून हे वाचलेले पाणी उसाकडे न वळवता डाळवर्गीय पिके व तेलबिया यासाठी ठिबक किंवा तृषार सिंचनातूनच वापरावे. जेणे करून यातून पाण्याचा अपव्यय टळेल हाच दूरगामी विचार आहे. ठिबक सिंचन सरकारने सत्त्कीचे करावेच. परंतु साखर कारखान्यांनी विशेष करून लक्ष देऊन कृषी अधिकाऱ्यांमार्फत त्या त्या भागातील शेतकऱ्यांसाठी जसे इतर शेती निविष्ठांचा पुरवठा केला जातो त्याचे पैसे उसातून वळते केले जातात, त्याच पद्धतीने तृषार व ठिबक सिंचन १० ते २० वर्षे टिकेल अशी पुरवठा त्याचे पैसे उसातून वळते करून घ्यावे. म्हणजे शेतकऱ्यांवर बोजा पडणार नाही व साखर कारखान्यांवर हे पैसे बुडाले असे म्हणण्याची वेळ येणार नाही. या व्यवहारात १००% पारदर्शकता हवी आहे. जेणे करून कमीशन व भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. याची सर्व स्थरावर नुसती दखल न घेता दक्षता घ्यावी. म्हणजे अपकृत्य होणार नाही.

पट्टा पद्धतीतील आंतरपिके

उसात पट्टा पद्धतीचा अवलंब केला म्हणजे निविष्ठांची बचत होते. मग मधल्या ६ फुटाच्या पट्ट्यात कांदा, भुईमूग, हंगामानुसार सर्व प्रकारचा भाजीपाला, विविध गळीत व फुल पिके तसेच मूग, तूर, उडीद, हरभरा, चवळी, मटकी, वाटाणा अशी उपयुक्त कडधान्य घेऊन यापासून डाळी, जनावरांसाठी उन्हाळ्यात कडधान्याचे काड, भूसा, चुणी ही सहजगत्या शेतकऱ्याला पिकवता येऊन चारा छावण्या व सरकारला दोष न देता खऱ्या अर्थाने शेतकरी ही व्यवस्था करून आपल्या जित्राबाला जीव लावून, प्रेम व माया देऊन जित्राबाने केलेल्या सेवेचा परत वेळीच मोबदला दिल्याने जनावरांची तब्येत सुधारून त्याप्सून निर्माण होणाऱ्या दुधाचा दर्जा सुधारेल आणि अशा रितीने शेतीचा दुहेरी उद्देश साध्य होऊन सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो तो पडणार नाही आणि डाळी आणि तेलबियांचे उत्पादन बऱ्यापैकी होऊन त्यामध्ये पुरवठा व मागणी समसमान राहिल्याने सटोडीयांना स्वत:पुरती दर वाढ करण्याचे व स्वत:चे उखळ पांढरे करण्याची संधी मिळणार नाही. या सर्वांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (आधुनिक तंत्रज्ञाना) चा वापर केल्याने प्रतिकूल परिस्थितीतही खात्रीशीर उत्पादन मिळेल, दर्जेदार माल मिळाल्याने भाव जादा मिळेल, कुपोषण कमी होईल अशा ४ - ५ गोष्टी सहजरित्या साध्य होतील.

मातीवीन शेती (Hydroponics)

दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक तज्ञ व जगभराचे शास्त्रज्ञ हे 'माती विना शेती' याची शिफारस करतात, परंतु माती जर असेल व पाणी बऱ्यापैकी असेल तर उत्पादनात हमखास वाढ करता येऊन ती परवडते. 'माती विना शेती' ही व्यापारी शेती होऊ शकत नाही. संकट काळी काहीच उपाय नसताना हा सांत्वनात्मक उपाय आहे. कारण ज्याठिकाणी वीज, पाणी स्वस्त आहे अशा जगाच्या पाठीवर मोजक्या देशात हिरवा चारा १ ते २ रू. किलो (Cost of Production) पडतो. परंतु भारत, आफ्रिका, केनिया, इथोपिया, टांझानिया अशा राष्ट्रात कृत्रिम साधनसामुग्री जोडून या तंत्राचा वापर करून १ किलो चारा हा ५ ते ११ रू. ला पडतो आणि तो फक्त अतिप्रगत (५ ते ७ रू./ किलो) राष्ट्रांमध्येच पडतो. हॉलंड, चीन, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग यासारखी व्यवहारी पुढारलेली राष्ट्र अशा तंत्राच्या मागे न लागता जेथे अंगापेक्षा बोंगा मोठा असतो आणि एखादा जनकल्याणाचा प्रकल्प व्यवहार्य होत नसेल तर त्याच्या मागे लागत नाही. मात्र अमेरिकेसारखे राष्ट्र आम्ही तंत्रज्ञानात अती ? प्रगत आहोत हे दाखविण्यासाठी आज चंद्रावर, उद्या मंगळावर, परवा नेपच्युनवर जाण्यासाठी अब्जावधी रुपये पुरासारखे खर्चुन आपण प्रगत असल्याचे भासवून शेखी मिरवतात आणि आपली मंगळावरची मोहिम फसली व भारताने ती पहिल्याच प्रयोगात यशस्वी केली तर स्वार्थापोटी स्वाभिमान खुंटीला टांगून भारताची मदत मागतात व ती आपण मान्यही करतो.

आडवे पृष्ठभागावरील शेतीचे काटेकोर नियोजन (Horizontal Surface Farming -HSF)

प्रचलित भारतीय शेतीमध्ये फळबागामधील काही प्रयोग जे आम्ही केले ते आम शेतकरी वर्गाला कसे उपयुक्त आहे ते पुढीलप्रमाणे -शेवग्याच्या बाबतीत वसंतराव काळे (हडपसर, पुणे) या सुशिक्षीत (B.A) ८० वर्षाच्या शेतकऱ्याने १५ गुंठ्यात सिद्धीविनायक शेवगा लावून गेल्या १५ वर्षात लाखभर रू. दरवर्षी घेत आहेत व मधल्या पट्ट्यात शेपू, पालक, कोथिंबीर, मेथी, पुदीना अशी कमी पाण्याची पिके घेऊन ६० ते ७० हजार रू. आंतरपिकाचे दरवर्षी कमवीत आहेत. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा शेवग्यावर वापर करताना फांद्यांच्या जाळीमधून खाली पडलेले औषध आंतरपिकांवर पडले जाते. त्यामुळे वेगळी फवारणी न करता आंतरपिकही उत्तम येते. त्याकरीता स्वतंत्र खर्च येत नाही व आंतरपिकाला पाणी दिल्यावर शेवग्याला वेगळे द्यावे लागत नाही. त्यामुळे पाण्यात बचत होते. यातील दररोज १ ते १।। हजार रू. चा माल जागेवरून हातविक्री कारखाने व हडपसर मार्केटला करतात.

कोरडवाहू भागात सर्व प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी मार्गदर्शन मॉडेल

प्रा. प्रकाश लहासे हे पहूर येथील शेतकरी जळगाव जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागात कडक उन्हाळा असलेल्या ठिकाणी काळ्या कसदार ? जमिनीत सिद्धीविनायक शेवगा लावून त्यामध्ये कापूस, वांगी, मिरची अशी आंतरपिके घेऊन १० मिनिटे ठिबक शेवग्यासाठी रोज चालवून २७ क्विंटल कापूस घेऊन वांग्यात १ लाख, मिरचीत ५० हजार रू. कमवून सिद्धीविनायक शेवगा ३ एकरातून ४ लाख रू. चा बोनस देतो. (पान नं. ३८) असे सिद्ध करून तेथे जिल्ह्यातील शेती खात्याचे कर्मचारी वृंद व अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पहिले आहे व रोज तेथे ५ ते १० शेतकरी भेट देऊन माहिती घेतात. तसेच आपल्या भागात शेतकऱ्यांना या पिकाकडे वळवून त्यांच्या प्रयत्नाला हातभार लावून यशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात. असे आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करून ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे दूत म्हणून जोडले आहेत व त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. जळगाव जिल्ह्यात सिद्धीविनायक शेवगा अधिक लोकांनी यशस्वी केला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बोंबटक यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सिद्धीविनायक शेवगा १० x ६ फुटावर ठिबकवर लावला असून २ ओळींच्या मध्ये ५ फुटावर तुरीचे आंतरपीक आणि चवळीचे आंतर - आंतरपीक या शेवग्यामध्ये घेतले आहे. ही जमीन एकदम हलकी आहे. येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तुरीचा बोनस मिळून हिरव्या चवळीच्या शेंगा त्यांनी स्वत: हातगाडीवर विकून ज्यादा भाव मिळविण्याचा मानस केला.

अमरावतीचे अरविंद पांडे हे गेल्या १५ वर्षात खंडाने जमिनी घेऊन भेंडी, ढेमसे (टिंडा) व वांगी याची यशस्वी शेती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करत आहेत. या शेतकऱ्याचे अतिउष्णतेने ढेमसे पीक गेले तेव्हा आम्ही सांगितले आता ढेमस्याची नवीन लागवड करताना पश्चिम बाजुस आळ्याच्या वरंब्यावर मध्यभागी मका टोका म्हणजे उष्णतेच्या झळा मक्यावर पडून मक्याच्या सावलीत व गारव्यात ढेमसे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगले येऊन उन्हाळ्यात ढेमस्याचे पैसे होतील तर मका जनावरांना हिरवा चारा तर कणसे विकून किंवा त्याचा भरडा कुकुट उद्योगास मुख्य खाद्य ठरेल. इतर गावठी कोंबड्या पाळून ज्यांना उकीरड्यावर चरण्याची सवय असते. त्यांच्यासाठी स्पेशल खाद्यावर खर्च करण्याची गरज नसते. त्यांची अंडी व मांस चविष्ट असल्याने त्यांना मागणी असते. अशा कुटीर उद्योगाचा संसारास फार मोठा आधार दुष्काळात होईल.

राठोड या विदर्भातील हैड्रालिक इंजिनीअर शेतकऱ्यांनी कापूस व संत्र्याचे उत्पादन चांगले आल्याने डाळींबामध्ये सुत्रकृमी येऊ नये म्हणून आळ्यात झेंडू लावाला आहे. त्याला पाणी, खत याचा वेगळा खर्च न येता सुत्रकृमी आटोक्यात राहून गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, लग्नसराई, गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया या हंगामात फुलांना भाव मिळून ते पैसे डाळींब पिकाच्या उत्पादन खर्चासाठी वापरत येतील आणि डाळींबाचे उत्पादन चांगले मिळेल.

पिकाचे मुल्यवर्धन

उन्हाळी घेवडा, मिरची, वांगी, टोमॅटो अशा वेळेस उन्हाळाच्या झळापासून पीक वाचावे यासाठी दर १० ते १५ झाडांमध्ये मका टोचला म्हणजे मुख्य पिकाबरोबर तेवढ्याच पाण्यावर हे पीक सहज येते व उन्हाची झळ या मका पिकावर आदळते, त्यामुळे मुख्य पिकाचा बचाव होऊन ते चांगले येते. तसेच मका दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा आणि मक्याची कणसे भाजून स्टॅण्ड किंवा हायवेला उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी सहजरित्या विकून त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग होऊन स्वत: कमविल्याचे मुल्य व त्यांना योग्यरितीने खर्च करण्याची सवय लागते आणि मक्याचे मुल्यवर्धन होते. हुरड्याच्या दिवसामध्ये नुसती ज्वारी पिकवून ती २० ते ३० रू. ने न विकता हुरडा करून तो १५० ते २०० रू. किलोने विकता येतो. हे सुद्धा मुल्यवर्धनच होय. यातून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळून अशा बालपणीच मिळालेल्या बाळकडूचे पुढे संशोधक वृत्ती जोपासून उद्योजकता जोपासली जाते. नोकरीच्या मागे लागून जागा गरजू गरीब तरुणास उपलब्ध होते पण त्यातील भ्रष्टाचाराने पदवीधर व पदव्युत्तर हे शेतमजुर झाले. शिक्षकाच्या व इतर नोकऱ्या मिळाव्या म्हणून ५ - १० लाख रू. भरून लग्न करून नोकऱ्याही नाहीत व पैसे ही परत नाही म्हणजे 'तेलही गेले आणि तुपही गेले, हाती धुपाटणे आले' अशी आजची अवस्था आहे. म्हणजे आई - वडिलांकडील मिळणारा पैसा नुसता खर्च करून ज्यांना उनाडकी फावते ती फावणार नाही व व्यवहारी प्रवृत्तीने अधिक व्यवहार साधला जाईल आणि मग हा आदर्श साऱ्या जगासमोर ठेवला जातो.

दुष्काळी भागातील डाळींब निर्यात

डाळींबात आंतरपीक घेऊ नये असे चोरूची येथील कासार सांगतात, ते कवठे महांकाळच्या दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १५० टन डाळींबाचे उत्पादन घेतात व त्यातील ८०% (१२० टन) माल दुबईला एक्सपोर्ट करतात. यांचे म्हणजे असे आहे की, १० x १२ किंवा १० x १० अंतरावरील लागवडीमध्ये डाळींबाचे आंतरपीक घेऊ नये. आंतरपीक जर घेतले तर सुर्यप्रकाश व हवा खेळती न राहिल्यास आर्द्रता वाढून तेल्या रोग येतो. त्यासाठी पुर्वीपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १४ x १२ ची शिफारस केली आहे व तेथे तेल्यास बऱ्यापैकी अटकाव झाल्याचेही शेतकऱ्यांनी कळविले.

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील नामदेव माळी यांची दुष्काळाने द्राक्षवेली गेल्या तर त्या जागी मांडवावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सिद्धीविनायक शेवगा, दुधी भोपळा ही पिके यशस्वीरित्या घेऊन दुष्काळावर मात केली.

नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या दुष्काळी पट्ट्यात केदा सोनावणे यांनी डाळींबातील गेलेल्या झाडात सिद्धीविनायक शेवगा लावला व तो यशस्वी झाल्यावर २।। एकर शेवगा लावून लंडनला निर्यात केला. त्यांना ५।। लाख रू. झाले.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वैशाली गवंडी यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेमार्फत सिद्धिविनायक शेवगा व आस्वाद आळू कंद वाटले. त्यांनी ते आपल्या परसात लावले. या शेवग्याच्या शेंगा आहारात आल्याने त्यांचे कुपोषण कमी झाले. तसेच आस्वाद आळू पानांच्या वड्या करून त्या पर्यटकांना विकल्या तर यातून मुल्यवर्धन होऊन रोजगार उपलब्ध झाल्याचे वैशाली गवंडी यांनी आम्हास कळविले.

राजस्थानच्या वाळवंटात डाळींब यशस्वी

राजस्थानच्या वाळवंटात घनश्याम गौड (B. E.) या सुशिक्षित तरूणाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब पीक यशस्वी करून नवा आदर्श निर्माण केला. राजस्थानसारखा वाळवंटी राज्यात फळ लागवडीच्या अशा पल्लवीत झाल्या, तसेच विदर्भाच्या पारंपारिक पिकांना फाटा देऊन विंग कमांडर विश्वजीत आकरे (निवृत्त) यांनी २१ एकर डाळींब यशस्वी करून पहिल्याच बहाराचे १० लाखाचे डाळींब दुबईला निर्यात केले. अशी अनेक मार्गप्रदीप उदाहरणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इस्त्राईलहून अधिक उजळ उदाहरणे जगाला प्रेरणा देतील. म्हणजे

केल्याने होते आहे रे । आधी केलेची पाहिजे ।।

आणि सतत नन्नाचा पाढा रडगाणे गाणे थांबवले पाहिजे .

म्हणजे देशाला कायमचे सुगीचे दिवस येतीलजे

आणि इस्राईलचे उदाहरण देणे मागे पडशीलजे

जग म्हणेल भारताचा आदर्श

आम्हाला समजलाजे व भावलाजे !