२०१३ - २०१४ या काळातील पिकांची परिस्थिती

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


२०११ आणि २०१२ या दोन वर्षामध्ये कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेती ही होरपळून निघाली. परंतु २०१३ च्या मान्सून ने या २ वर्षांची कसर भरून काढून सबंध देशात पाऊस चांगला झाला व महाराष्ट्रात उत्तम झाला. विदर्भासारख्या भागात तर जवळ - जवळ अतिवृष्टीच झाली. त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले. तरीपण सुक्या दुष्काळपेक्षा ओला दुष्काळ हा कधीही परवडला. खरीपातील पावसाने नुकसान झाले असले तरी जमिनीमध्ये ओल आणि विहीरी, नद्या, नाले यांना बऱ्यापैकी पाणी असल्याने रब्बी गहू, हरबरा, जवस ही पिके विक्रमी यावीत ही अपेक्षा आहे. मधे कुठे गारपिटीचा दुष्परिणामा होऊ नये एवढेच. या रब्बी पिकांना जर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तर गेल्या २ वर्षातील उत्पादनातील घट भरून निघेल. यंदा पाऊस चांगला झाल्याने थंडी अधिक काळ टिकणार आहे. त्यामुळे हरभरा हा नुसत्या दवावरही येऊ शकतो व गव्हाला थंडी पोषकच ठरते. त्यामुळे गहू - हरभऱ्याचे उत्पादनात हमखास वाढ होईल.

ऑक्टोबर हंगामातील उसाची लागवड व जानेवारीतील सुरू लागवड यंदा अधिक होणार आहे. अनेक वर्षाच्या अनुभवातून उसाची पट्टा पद्धत फायदेशीर ठरत आहे आणि मधल्या पट्ट्यात बटाटा, कांदा, लसूण, काकडी, टोमॅटो, वांगी, मिरची कोबीवर्गीय पिके असे विविध प्रयोग करून नुसतेच ऊस पीक न घेता हा जो गरजू पिकांचा पट्टा पद्धतीत शेतकऱ्यांनी पायंडा पडला ते ऊस शेती मधील आशादायी पाऊल ठरले. म्हणजे एका बाजूला ऊस हे ५० ते ९० टन ते आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने जर्मिनेटर चा बेणे प्रक्रियेस वापर करून आणि थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंटचा फवारणीत वापर करून एकरी ८० ते १०० टनापर्यंत उत्पादन घेतल्याच्या अनेक यशोगाथेच्या मुलाखती कृषी विज्ञानमध्ये आम्ही प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधून मुला - बाळांचे शिक्षण, लग्न खर्च भागविले आहेत, जमिनी घेत आहेत. यावर्षी हे चित्र अधिक व आशादायक स्पष्ट ऊर्जा देणारे असेल. खानदेश मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात या वर्षाच्या मान्सूनचे परिणाम हे अधिक होकारार्थी असतील.

द्राक्ष पिकाचे उत्पन्न हवामान हे बऱ्यापैकी अनुकूल असल्याने कमी फवारण्यात द्राक्ष व बेदाण्याचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन होईल. बेदाण्यासाठी द्राक्ष निर्मिती करणाऱ्या भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाण्यात क्रांती करून गावेच्या गावे बेदाणामय झाली आहेत. द्राक्ष उत्पादन व बेदाणा उत्पादन हे अतिशय चांगले होणारे असल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीस काढण्याची घाई न करता तो योग्यवेळी सणासुदीच्या काळात रमजान, दिवाळी, नाताळ या मोसमात विक्रीस काढावा. तोही टप्प्या - टप्प्याने आणावा, म्हणजे भाव १२० ते १५० रू. हमखास सापडतील.

कॅनॉल व धरणांना भरपूर पाणी असल्याने उसाचा उतारा (टनेज व शुगर रिकव्हरी) हे चांगल्याप्रकारे राहणार असल्याने गुळ व साखरेचे उत्पादन वाढेत. ज्याप्रमाणे इतर पिकांचे भाव ढासळतात तसे साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. एकून साखरेच्या उत्पादनात थोडी घट येण्याची शक्यता आहे. तरीपण गेल्या २ वर्षातील साखरेच्या उत्पादनापेक्षा वाढच होईल.

सरकारने साखर ही त्या - त्या राज्यातच विक्रीची परवानगी दिली गेल्यास वाहतूक खर्च वाचून आमजनतेला कमी भावात साखर मिळून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. सुरू व खोडव्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्पादनात व रिकव्हरीत निश्चित वाढ होते.

केळी पिकाचे २ - ३ वर्षामध्ये कमी पावसाने उत्पादन घटले आहे आणि केळी उत्पादन करणारा खानदेशचा जो भाग आहे हा वादळ, पाऊस आणि गारपीट याने केळी पिकाचे दरवर्षी फार मोठे नुकसान होते. ते नुकसान यावर्षी वातावणातील तापमान, आर्द्रता व पाण्याची पातळी अनुकूल राहिल्याने केळीचे पिकही विक्रमी येण्याची शक्यता आहे आणि योग्य नियोजन केले तर १० ते १४ रू./ किलो भाव उत्तर प्रदेश व दिल्ली मार्केटला मिळू शकतो. याकरीता पणन मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.

केळीच्या खोडव्यास कल्पतरूचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारून भौतिक व जैविक सुपीकता वाढून उत्पादनात सतत वाढ झाली आहे. याच्या मुलाखती आम्ही वेळोवेळी कृषी विज्ञानमधून प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचा आपण संदर्भासाठी वापर करावा.

डाळींबाचा हस्त बहार धरण्यासाठी परिस्थिती आता अनुकूलच आहे. पण गेल्या २ वर्षात ज्या बागायत दारांनी टॅंकरने पाणी आणून बाग वाचवल्या त्यांना पाऊस चांगला झाल्याने बहार धरण्यास परिस्थिती अनुकूल राहील आणि हस्त बहाराचे उत्पादन, दर्जा वाढेल. झाडावर वयोमानानुसार ५० पासून १०० फळे धरता येतील. डाळींबाला अमेरिका, जपान, चीन, इजिप्त, हॉलंड, आखाती राष्ट्रांत निर्यातीस परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे भाव पडणार नाहीत. त्याहीपेक्षा उत्तरेकडील राज्य ही डाळींब विक्रीस अनुकूल ठरतील.

यावर्षी हस्त नक्षत्रामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडल्याने लिंबाचा हस्त बहार चांगला निघून फेब्रुवारी ते जुनमध्ये लिंबाचे उत्पादन वाढेल. त्यामुळे लिंबाचे दर हे आमआदमीच्या अवाक्यात राहतील.

विदर्भामध्ये संत्रा या पिकामध्ये मृग बहारात पाऊस जादा झाल्याने उत्पादन घटेल. ते २०१३ - २०१४ मध्ये अधिक येईल. पाऊस विस्तृत झाल्याने लिंबूवर्गीय पिकांचा आंबे बहारही धरता येईल.

जून ते सप्टेंबर या काळात प्रचंड पावसाने नुकसान झाल्याने खरीप कांदा पाहिजे त्याप्रमाणात मिळाला नाही आणि उन्हाळी व खरीप टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे कांदा व टोमॅटो चे दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले. महागाई वाढली. मात्र शेतकऱ्यांना ह्या दर वाढीचा फायदा पाहिजे तसा झाला नाही.

यंदा तुरीचे पीक सबंध देशात चांगले येईल. बाजरी, उडीद व मूग पिकाचे अधिक पावसाने नुकसान झाले. खरीप तिळाचेही नुकसान झाले. त्यामुळे संक्रांतीच्या तोंडावर तिळाचे भाव होलसेल २०० रू./किलोप्रर्यंत वाढले. मात्र रब्बी तिळाचे उत्पादन चांगले मिळेल. उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन चांगले येईल. लसूण पिकास सध्याचे हवामान अनुकूल आहे. त्यामुळे लसणाचे उत्पादन प्रचंड येईल. कापूस पिकणाऱ्या अनेक भागात मध्यप्रदेश, विदर्भ, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या भागात जो प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला तेथे लाल्या रोगाने व किडीने अधिक नुकसान झाले. त्यामुळे खरीप कापसाचा उतारा हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने जो १२ ते १६ क्विंटल येतो तो आता ८ ते १२ क्विंटल येईल. परंतु फरदडचे पीक हे नेहमीपेक्षा चांगले येऊन खरीपातील तुटीचे उत्पादन सावरण्यास मदत होईल. पाकिस्तान, चीन या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे तेथे कापसास मागणी राहील. सरकार व कापूस गिरणी मालकांनी जर साथ दिली तर कापसाचे भाव हे शेतकऱ्यांसाठी अनुकूल राहतील ते ५।। ते ६ हजार रू./क्विंटल असतील अशी अपेक्षा आहे.

आंबा, काजू हे थंडी चांगली असल्याने मोहोर वेळेवर येऊन आंब्याचे विक्रमी व काजूचे चांगले उत्पादन येऊन दर्जा सुधारेल.

देशाच्या अनेक भागामध्ये विस्तृत पाऊस अधिक काळ झाल्याने उन्हाळी भाजीपाला पिकांची २०१४ च्या उन्हाळ्यात रेलचेल राहील. तरीपण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे राहतील आणि आमआदमीचे पाकिट हे खाली न होता त्याचे आरोग्य सुखकर राहील. यावर्षी निसर्गाने जे आपणास भरभरून दिले त्याबद्दल परमेश्वराचे मानावे तेवढे आभार तोडेच आहेत. तू असाच बरसत राहावा आणि उत्पन्नाची खैरात आणि धान्याची रास लागावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !