कृषी उत्पादनांसाठी लागणारे श्रोत कमी होत असताना करावयाचे नियोजन व पीकपद्धती!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


संयुक्त राष्ट्र संघटना (युनो), एक.ए.ओ. आणि भारत सरकार यांच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या २०५० साली ९ अब्ज होईल आणि भारताची लोकसंख्या २०३० पर्यंत १५० कोटी होईल अशी संभाव्य आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जमीन मात्र विविध कारणांनी जसे शहरीकरण ४० % पासून ५४% पर्यंत आता पोहचले आहे. तेच आता चालू दशकात ६४ ते ६८% पर्यंत जाईल तसेच उद्योग धंदे, औद्योगिकीकरण, रोजगाराच्या विविध उपलब्ध संधी या कारणाकरिता साधारणत: १० ते १५% जमीन ही वसाहतीसाठी (Residential Zone) वापरली जाईल. आताच टेकड्या डोंगर फोडून ग्रीन झोनचा (शेती) यलो झोन (वसाहती योग्य) करून पर्यावरणाला लाल दिवा दाखविला आहे. त्यामुळे जमिनीच्या पर्यावरणापेक्षा मानवाने केलेले जमिनीवरील अतिक्रमण व अत्याचारामुळे वातावरणाचे विविध पैलू - नद्या, नाले, वृक्ष, वने, वातावरण (ऑक्सिजन, कार्बन व ओझोनचा समतोलपणा), विविध कारखान्यांमुळे झालेले जलप्रदूषण व वायूप्रदूषण यामुळे हवामानाचे होणारे बदल हे माणसाच्या कल्पना शक्तीच्या बाहेर जावून काही दशकामध्ये अक्राळ -विक्राळ स्वरूप धारण करतील व तो संशोधनासाठी महत्त्वाचा (Top priority) टप्पा ठरेल. हवामानातील जे मापदंड (Standards) याचे होणारे कमी जास्त प्रमाण प्रत्यक्षात गेल्या ४ ते ५ वर्षापासून ते मागील २ महिन्यात भारत व जगभर विविध अनपेक्षित गोष्टी अनुभवत आहेत.

नुकतेच संगणक क्षेत्रातील जगातील द्रोणाचार्य आणि गरीब लोकांचे दारिद्रय आणि दु:खाच्या जखमा यांच्यावर अनुदानाचा हुंकार देऊन त्यांना जीवन जगण्याची जिद्द, तळमळ, आशावाद निर्माण करून मानवतेला गवसणी घालणारे बिल गेटस नुकतेच म्हणाले की, जे ३५ देश दारिद्र्याखाली आहेत ते सुद्धा २०३५ साली गरीब राहणार नाहीत, हा त्यांचा आशावाद आहे. कुशल तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण आणि मानवतेच्या जीवनावर विपरीत परिणाम करणार नाही. तसेच मानवता आणि माणूसकीला जपेल, अशा प्रकारचा बिल गेटस यांचा मोठा आशावाद आहे.

आता आपण विविध कारणात्सव शेतीयुक्त जमीन कमी झाली आहे. तेव्हा या कमी जमिनीतून अधिक दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी काही पर्याय पाहूया -

यामध्ये पहिला पर्याय म्हणजे पडीक जमीन ही वहीतीखाली आपणे. देशात ६ कोटी ३० लाख ८५ हजार हेक्टर जमीन पडीक आहे. (Source - NRSA and MoRD.2000) ही विविध कोरडवाहू फळपिके आणि कमी पाण्यावर येणारी जंगले आणि मोसमी पावसावरील येणारी कडधान्य जसे खरीप मूग, मटकी, हुलगा व रब्बीतील हरभरा व जवस. जवस हे जगातील ३०० राष्ट्राचे कल्पवृक्ष पीक ठरेल. खरीप, रब्बी व उन्हाळ्यातील तीळ नंतर मानवतेचे आरोग्य संभाळण्यासाठी विविध अत्यावश्यक २५ प्रकारची आयुर्वेदिक दर्जेदार औषध निर्माण करण्यासाठी वनस्पतींचे बिजोरोपण व्युत्पत्ती (Propagation) करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची शेती हा फार महत्त्वाचा भाग आहे. जसे नोबेल पारितोषिक मिळालेले प्रा. डॉ. व्यंकटरमण रामकृष्णन हे एका कार्यक्रमात म्हणाले की, चीन ज्याप्रमाणे आयुर्वेद शिक्षणात प्रथम क्रमांकावर आहे. तसे भारत त्या दृष्टीने आयुर्वेद शिक्षणात प्रथम क्रमांकावर येणे गरजेचे आहे. म्हणजे पडीक जमिनीचा वापर मानव कल्याणासाठी करण्याकरिता विविध संशोधनाचे, तंत्रज्ञानाचे, मानव जातीच्या कल्याण व विकासाचे आर्थिक (Fiscal) व उत्पन्नाची श्रोत निर्माण करण्यासाठी देश पातळीवर व राज्य, युनायटेड नेशनने स्वतंत्र खाते निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या डोंबाला दारिद्याच्या आकाशाला हे नियोजन ठिगळ लागण्याचे काम करेल अशी आशा आहे. याला एक जमिनीचे पर्यावरण वाचविण्यासाठी सजक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी गरीब लोकांचे पैसे खर्च करून मंगळावर यान पाठवून तेथील जमिनीचा पर्याय शोधण्याचे पर्याय जगात पहिल्या पाच मध्ये येण्यासाठी करतो त्यापेक्षा मानवतेचे हे तत्वज्ञान सॉक्रेटिक, समारिटन, अल्फ्रेड नोबेल, कार्ल मार्कस, लेनीन, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मदर टेरेसा, बेट्रॉन्ड रसेल या सर्वांनी सांगितले आहे.

आता आपण वहीती खालील जमिनीमध्ये घेण्याचे काही पथदर्शक प्रकल्पाविषयी पाहूया - पारंपारिक पद्धतीने घेतली जाणारी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, फळपिके ही सलग पीक पद्धती मानवाच्या गरज त्या - त्या वेळेत भावविण्यासाठी कमी पडतात. जसा मानवा हा सुशिक्षित व सहक होत गेला तशा मानवाच्या विविध आणि उपयुक्ततेच्या दृष्टी ने गरजा वाढत जाऊ लागल्या आणि निसर्गाच्या लहरीमुळे एकाच पिकाचे उत्पन्न हे मार खावू लागले म्हणून मानवास आवश्यक असणारे प्रथिने, स्निग्ध पदार्थ - पामतेल, गहू ज्वारी हे विविध देशातून आयात करावे लागले व या व्यापाराचे संतुलन जमेना असे झाले. म्हणून याल पर्याय म्हणून मिश्रपीक किंवा आंतरपीक ही पद्धीत अस्तिवात आली.

जसे अन्न, वस्त्र, निवारा (घर), शिक्षण व आरोग्य हा मानव विकासाचा एक पंजा आहे. यामध्ये भर घालण्यासाठी मानवी आरोग्याची जपणूक मानवाला दिर्धायुष्य निर्माण करण्याकरिता जीवनसत्व, संजिवके यांची गरज भासू लागली. याकरिता मानवांनी भाजीपाल्याबारोबर फळपिकांना साद घालण्यात आली आणि देशामध्ये जी चळवळ झाली, त्यामध्ये त्याकाळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. शरद पवार यांच्या दूरदृष्टीने हे सारे हेरले आणि महाराष्ट्र हे फलोत्पादनमय झाले. पहिली दोन दशके ही संकल्पना रूजविण्यामध्ये व त्याचा विस्तार करण्यामध्ये गेली व जेव्हा महाराष्ट्राच्या किवा देशाच्या शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन बहरू लागले. तेव्हाच त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली. म्हणून फलोत्पादन या विषयाला आर्थिक जोड शेतकरी, सरकार व विकास - सेवाभावी संस्था यांनी जाणिवपुर्वक कार्यवाही करणे अतिशय निकडीचे आहे.

मिश्र व अंतरपीक पद्धती

आता फळपिकांतील अंतर हे पारंपारिक ३० फुटावरून २५ ते २० फुटावर आलेली आहे आणि या अंतरावर जगभर विविध प्रकारच्या फळपिकांच्या लागवडी होत आहेत. यामध्ये पिकांच्या गरजेनुसार पोषक हवामानाचा विचार करून पर्जन्यमानाचा विचार करून विविध पिकांचे मिश्र पीक व आंतरपीक म्हणून शेतकरी प्रयोग करू लागला आहे. त्यामुळे मर्यादित जमिनीमध्ये एकाहून अधिक पिकांचे तृणधान्य, कडधान्य, तेलबिया अशी चौफेर एकाच जमिनीवर थोड्याशा पाण्याच्या उपलब्धतेवर करू लागला आहे.

जेथे डोंगर उतार आहे तेथे डोंगराच्या बाजूने उंच फळझाडे जसे पाईन वृक्ष, साग, उंच वाढणारी वनझाडे लावून त्याखालोखाल उताराला कमी उंचीची आंबा, काजू, नारळ, सिल्व्हर ओक व त्याच्या बुंध्याला मिरी, जायफळ, कोको नंतर त्याच्या खालोखाल उतारावर कवठ, चिंच नंतर त्याच्या खालोखाल केळी व बुंध्याला वेलदोडा लागवड आणि जमीन व पाण्याची धूप होऊ नये म्हणून शेंगवर्गीय सोयाबीन, घेवडा, तत्सम पिके व शेतीत काम करणाऱ्या व दुभत्या जनावरांसाठी जमिनीवर पसरणारी पिके अशी ३ ते ४ मजले (Tier) पीकपद्धती जगभर विकसीत झाली आहे. हिला गतीमानता देणे जागतिक अन्नसंघटनेने (FAO) अंमलात आणणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने डॉ. राजेंद्र पचोरी या शास्त्रज्ञाने हवामान व पर्यावरणाच्या समतोलासाठी जागतिक संघटना बांधली तशा प्रकारची संघटन बांधणे गरजेचे आहे. म्हणजे मर्यादित पाण्याचे श्रोत, निविष्ठांची मर्यादा आणि जमिनीची मर्यादा लक्षात घेऊन संशोधन करणे फारच महत्त्वाचे आहे. म्हणजे मानवाच्या गरज एकापाठोपाठ एक आगगाडीच्या डब्याच्या मालिकेच्या रूपाने वळणा - वळणाने पुरविल्या जातील.

१) मिश्रीपीक / अंतरपीक पद्धती

कापूस पिकास वेळेवर कर्ज न मिळणे, पाऊस - कमी - अधिक, रोगकिडी यामुळे उत्पादनातील घट आणि बाजारभावातील अनिश्चितता अशा एक न अनेक कारणांनी हे पीक बेभरवशाचे पीक झाले आहे. तेव्हा डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने अनेक शेतकरी कापसात 'सिद्धीविनायक' शेवग्याची मिश्रपीक / अंतरपीक घेत आहेत. मात्र कापसापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याचेच वर्षभरात ५० हजार ते १ लाख रुपये मिळत असल्याने शेवगा हे अंतरपीक न राहता मुख्यपीक झाले आहे. त्यामुळे ही पद्धत कापूस उत्पादन करणाऱ्या भागात अधिक जोर धरत आहे. (संदर्भ - "कपाशी, वांगी, मिरचीतील मिश्रपीक 'सिद्धीविनायक' शेवगा" श्री. प्रकाश पांडुरंग लहासे, मु.पो. पहुर ता. जामनेर, जि. जळगाव. मोबा. ९४२३९३७१३६, कृषी विज्ञान, जानेवारी २०१४, पान १७)

२) मुख्य पिकातील स्पॉट मिश्रपीक पद्धत

श्री. केदा सोनवणे (निवृत्त मुख्याध्यापक), सटाणा जि. नाशिक, मोबा. ८८०५७७१९७१ यांनी जे डाळींब लावले होते त्यातील तेल्याने बरीचशी झाडे मेली. त्याच ठिकाणी त्यांनी 'सिद्धीविनायक' शेवग लावून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. नंतर त्यांनी अडीच एकरमध्ये सलग 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड करून हा सर्व 'सिद्धीविनायक' शेवगा लंडनला निर्यात केला व त्यापासून त्यांना अडीच एकारात ५।। लाख रू. मिळाले/(संदर्भ - लावा शेतात 'सिद्धीविनायक' शेवगा मोरिंगा पुस्तक, पान ३९) असे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे देशभर ३० हजारहून अधिक मॉडेल आहेत.

* ऊस हे गोल्डन कॉईन पीक (याच्या टाकाऊ पदार्थांपासून औषधे, इथेनॉल निर्माण केल्यास) असून यामध्ये मात्र राजकीय व संशोधन इच्छाशक्ती कमी आहे. याला संशोधन वृत्ती अधिक तीव्र करून राजकीय शक्तीला जागे करणे फार गरजेचे आहे म्हणजे एकाच वेळेला जमिनीची मर्यादा, पाण्याची मर्यादा सांभाळून मानवाला त्याच्या अत्यावश्यक असणाऱ्या गरज भागवून धरतीमातेला न ओरबडता एकदल व द्विदल पिकांचे सुयोग्य नियोजन करून कमी कालावधीत येणारी पिके वरच्या थरातील अन्नद्रव्ये घेतील व दिर्घकालावधीतील पिके खालच्या थरातील अन्नद्रव्ये घेतील. शेंगवर्गीय पिके ही हवेतील नत्र मुळावर साठवून जैविक नत्राचे स्थिरीकरण करतील. अशा रितीने भुमातेला न ओरबडता अधिक समृद्ध करेल हीच आशा आहे आणि ज्या पद्धतीने कॅप्टन राकेश शर्मा यानातून अंतराळात गेले तेव्हा आपला भारत देश वरून कसा दिसतो असे इंदिरा गांधींनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले. "सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थाँ हमारा" याप्रमाणे वरील पद्धतींचा डोळसपणे अवलंब केल्यास यानातून अंतराळातून प्रवास करणारी व्यक्ती म्हणेल "सारे जहाँ से अच्छी वसुधंरा हमारी !"