आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर विषमुक्त शेतीमालासाठी व मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यावश्यक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतामध्ये शेतीचे तीन हंगामा असतात. पहिला खरीप हंगामा (जून ते सप्टेंबर), दुसरा रब्बी हंगाम (सप्टेंबर ते जानेवारी) आणि तिसरा उन्हाळी हंगाम (जानेवारी ते मे) हे होत. प्रगतीशिल शेतकरी या तिन्ही हंगामात विविध पिके घेतात. जेव्हापासून संकरित बियाणे आले, तेव्हा त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला आणी एरवी जे भारतीय देशी वाण होते ते रोग व किडीला काटक असत. त्यामुळे ते रोगकिडीस बळी पडत नसत. मात्र त्यांचे उत्पादन कमी येत असे. त्याची चव व दर्जा अधिक असे. लोकसंख्येत झालेल्या वाढीच्या अपरिहार्य कारणाने सरकारला व शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी या संकरित वाणांकडे वळावे लागले. या संकरित जाती रासायनिक खतांना प्रतिसाद देतात व उत्पन्न चांगले येते म्हणून पाणी व रासायनिक खतांचा वापर अधिक होत असल्याने रोगराई व कीड अधिक येते. पारंपारिक विषारी किटकनाशके जसे मेलॅथिऑन, रोगर, एन्डोसल्फान यांना वरील किडी दाद देत नसत. त्यामुळे सायापरमेथ्रीन क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, थायमेट, फोरेट अशा अति विषारी किटकनाशकांची फवारणी व वापर सुरू झाला. याने पहिल्या फवारणीत किडीचा नाश झाला की, शेतकरी पुन्हा हीच औषधे राहिलेल्या किडींवर किंवा नवीन येणाऱ्या किडीवर वापरू लागल्याने हे औषध पचविण्याची किडीची ताकद वाढू लागली. काही वेळेस तर असे शेतकऱ्यांना अनुभवयास आले की, बाटलीतील औषध थेट किडीवर ओतले तरी कीड मेली नाही. याचे कारण त्या किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होवून किडीने हे विषारी औषध पचविले. या नैराश्यातून शेतकऱ्यांनी उरलेले औषध स्वत: प्राशन करून आत्महत्या केल्या. २५ वर्षापुर्वी ज्यावेळी आंध्रप्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी कापसावरील बोंड अळीवर सावकारी कर्ज काढून किटकनाशके आणून मारली, परंतु त्याने बोंड अळी गेली नाही. त्यामुळे शेतकरी अधिक नैराश्याने खचला व जवळपास ७० ते ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर लोकसभेत मोठ्या प्रमाणात वादळी चर्चा झाली.

भाजीपाला, फळभाज्या, फळपिके यावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य, विषाणूजन्य रोगावर विषारी बुरशीनाशके फवारली व ती देखील कुचकामी ठरली. अशा रितीने किडनाशक व बुरशीनाशकांना कुठल्याच किडीने व जीवणुंनी दाद दिली नाही. यातून सेंद्रिय, जैविक किटकनाशक व बुरशीनाशके वापरण्यास गेल्या १५ वर्षापासून सुरुवात केली. जसजसा सेंद्रिय खताचा वापर सुरू झाला व रास्यानिक खताचे भाव वाढल्याने. जे सेंद्रिय शेतीचे खंदे पुरस्कतें होते अशा ५० ते ६० % शेतकऱ्यांनी सर्रास अधिक रासायनिक शेतीला पुर्णविराम दिला. ईशान्य राज्यांत सेंद्रिय शेतीचा प्रधात पुर्वीपासून चालत आला. तरी उन्नत शेतीत पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस (Intensive Agriculture) याला जागतिक बेंक, परदेशातील लोकांनी हे तंत्रज्ञान जेव्हा भारत देशात आणले तेव्हा नियंत्रीत वातावरणामध्ये नवीन - नवीन रोगकिडी येवू लागल्याने पुन्हा रासायनिक विषारी बुरशीनाशक व किटकनाशकाचा वापर फोफावला. तो अपरिहार्य ठरला. याप्रकारामुळे भाजीपाला, फळपिके, अन्नधान्य यामध्ये विषारी अंश (Residue)काही प्रमाणात वाढते. या दर्जेदार परंतु विषारी औषधांचे अंश काही प्रमाणात भाजीपाला, फळे, अन्नधान्य यांच्या निर्यातीला दुबई, बहारीन, कुवेत, ओमन, शारजा, सौदेअरेबिया, सिरीया, लिबीया अशा राष्ट्रांमध्ये अनेक आशियन मंडळी असल्याने या भारतीय शेतीमालाला तेथे प्रचंड मागणी निर्माण झाली. तेथे २० वर्षापुर्वी क्वॉरनटाईन नियम (विषारी औषधांचे शेतीमालातील प्रमाण) कायदे एवढे कडक नव्हते. युरोपियन देशांमध्ये आंबा, द्राक्ष, डाळींब, लिंबू या फळपिकांबरोबर दुधी, वसई वांगी, भेंडी, मिरची, दोडका, कारली, आळू, परवळ अशा भाज्यांसाठी मागणी वाढू लागली. कारण युरोपियन राष्ट्रांत भारतीय लोक अधिक आहेत व भारतीय लोकांबरोबर या मालाची चव युरोपियन लोकांनाही आवडू लागली.

आंब्यासाठी कल्टारचा वापर आरोग्यास धोकादायक !

विशेषकरून भारतीय आंब्याच्या ज्या जुन्या बाग दुर्लक्षित पारंपारिक होत्या, त्यांना वर्षाआड फळे लागत व त्यातून देशांतर्गतच गरज भागत नसे. आंबा हे फळ मार्च ते मे या काळात येत असल्याने या आंब्याला सुरूवातीचे दोन महिने चांगले भाव मिळत व शेवट्च्या मे महिन्यात भाव कमी होत. गेल्या १० - १५ वर्षापासून थोड्या प्रमाणात हापूस निर्यात होऊ लागला. जेव्हा हापूस कमी पडू लागला तेव्हा मराठवाड्यातील केशर या टिकावू, रसदार, गोड आंबा फळाची लागवड होऊ लागल्यावर केशर आंब्याची हापूसबरोबर युरोपियन, आखाती राष्ट्रांत निर्यात होऊ लागली. परंतु काही कंपन्यांनी आंबा दरवर्षी येण्यासाठी कल्टारसारखी महागडी विषारी औषधे वापरण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त केले. सुरुवातीचे काही वर्ष (४ ते ५ वर्ष) उत्पादन मिळाले. मात्र नंतर उत्पादन घटले. निर्माण होऊ लागलेल्या फळांत विषारी अंश निर्माण होऊ लागले व झाडांचे आयुष्यही घटले. कीड जेव्हा मोहोरात शिरते तेव्हा ती मोठ्या फळात आत राहते. तिच्या नियंत्रणासाठी अत्यंत विषारी किटकनाशकांचा वापर करूनही ती गेली नाही व युरोपियन राष्ट्रांत अशा आंब्यात विषारी अंश आढळले.

इंग्लंडमध्ये भारतातून दरवर्षी सुमारे ४० लाख अब्ज डॉलरचा निर्यातीचा व्यापार होतो. भारतीय शेतीमालात विषारी अंश या फळांमध्ये व भाज्यांमध्ये आढळल्याने इंग्लंडने १ मे २०१४ पासून भारतीय शेतीमालावर बंदी घातली. खरे म्हणजे भारत सरकारने पुरेशी दक्षता घेवून प्रमाणित करूनच निर्यात केली पाहिजे. तेव्हा अचानक शेती मालाची निर्यात थांबविल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. शेतकऱ्यांनी अति विषारी किटकनाशकाच्या व बुरशीनाशकाच्या वापरण्यावर निर्बंध आपण स्वत: घातले पाहिजेत. ब्रिटीश सरकारचे खासदार किथ वाझ आणि डॅन रॉजरसन हे या गोष्टींची शहानिशा करून भारतीय मालाला कायदेशीर चाकोरीतून मदत करण्यासाठी सरसावले. ताज्या फळांमध्ये विषारी अंश आढळल्याने ताज्या फळांबरोबरच आंब्याच्या प्रक्रिया उद्योगातील आईस्क्रिम पल्प, रस आणि फोडी या प्रक्रिया उद्योगातील उपपदार्थांवरही बंदी आली. सन २०१३ मध्ये इंगलंडने एकूण ५५ - ६० हजार मे. टन आंबा आयात केला होता. त्यातील भारतातील आयात ही ४८०० मे. टन होती.

युरोपमध्ये आंब्याबरोबर पडवळ, आळू म भेंडी, कारली यावर बंदी घातली आणि ही अचानक बंदी आल्याने उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. निर्यातीचे मार्केट बंद झाल्याने स्थानिक मार्केटमध्ये हा माल अचानक आल्याने भाव पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागले. युरोप व भारतातील पत्रव्यवहारात १५ - २० दिवस निघून गेले. तेथील खासदारांनी भारताची बाजू मांडली. निर्यातीची परत सुरुवात व्हायला हवी होती ती झाली नाही. जसे १० वर्षापुर्वी युरोपला पाठविलेली १८ हजार मे. टन द्राक्ष ही आवश्यकतेपेक्षा विषारी अंश ज्यादा आढळल्याने ६ महिन्यानंतर पुन्हा भारतात परत पाठविली व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांनी कर्ज झाल्याने आत्महत्या केल्या, तीच अवस्था आता झाली. तेव्हा अशी वेळ येवू नये म्हणून अपेडासारख्या संस्थांनी वर्षानुवर्षे अगोदरच याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

विषारी अंश शेतीमालात येवू नये म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू वरदान !

यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा उपाय अभिनव आहे. या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर शेती मालात विषारी अंश येत नाहीत व देशातील ज्या - ज्या उत्पादकांनी, शेतकऱ्यांनी जगभर माल निर्यात केला त्यांच्या मालाला प्रचंड मागणी वाढली. त्यांच्या मालत कोणतेही विषारी अंश सापडले नाही. सांगली भागातील द्राक्षबागायतदरांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेले बेदाणे स्थानिक मार्केटमध्ये पारंपारिक बेदाण्यांना १०० - १५० रू. भाव असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेले बेदाणे २०० - २५० रू, किलोने विकले गेले. तसेच निर्यातीत मालास २० - २५ % भाव ज्यादा मिळाले. हे प्रयोग आम्ही अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, फळभाज्या, फळपिके या सर्वांवर केले. तो माल पश्चिमात्य, पौरवात्य, युरोप व आखाती राष्ट्रात गेला. तेथे चांगल्याप्रकारे परतावा मिळाला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अपरिहार्य कारणास्तव पहिल्या दोन फवारण्यात रासायनिक औषधांचा वापर केला व त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सेंद्रिय, आयुर्वेदिक किटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर केला. त्यांच्या तेलबिया, धनधान्य, फळपिके, पालेभाज्या, फळभाज्या विषारी अंशातून पुर्ण मुक्त झाल्याचे आढळले. त्यांनी तो बिनधोकपणे निर्यात केला व चांगला भाव व नफाही मिळविला, असे अनेक शेतकऱ्यांनी आम्हास सांगितले. तेव्हा सर्व प्रगतीशिल शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा वापर टाळून सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर मानवाचे आरोग्य व आयुष्यमान सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांना निर्यातीतून अधिक परकिय चलन मिळून त्यांचे कल्याण करण्यासाठी करावा हीच एक आशा !