पारंपारिक विदर्भाची पिके सोडून डाळिंबाचा धाडसी प्रयोग यशस्वी !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


विंग कमांडर विश्वजीत आकरे (रिटायर्ड), रानवाडी, ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा.

मोबा. ९७६६०४९३२२/९३७२४५५९६१

मी निवृत्तीनंतर विदर्भातील कापूस, संत्र्याच्या आगारात २१ एकरमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगवा डाळींबाची लागवड ऑक्टोबर २०१३ मध्ये केली आहे. रोपे कॅडीला फार्मा, बडोदा (गुजरात) यांच्याकडून ३० रू. प्रमाणे जागेवर पोहोच मिळाली. जमीन टेकडीच्या उताराची हलकी मुरमाड प्रतीची आहे. या जमिनीत भगवा रोपाची १५' x १०' वर लागवड आहे. डाळिंबाचा त्याभागातील हा पहिलाच प्रयोग असल्याने सुरुवातीला तेथील शेतकरी अक्षरश: वेड्यात काढत होते. मात्र जिद्द व डॉ.बावसकर सरांचे मार्गदर्शनातून शाश्वत तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण हे यश गाठू याची खात्री होती.

अगदी वेळापत्रकाप्रमाणे व सरांच्या मार्गदर्शनाप्रमाण तंत्रज्ञानाचा (सप्तामृत, हार्मोनी, स्प्लेंडर ह्या औषधांचा व कल्पतरू सेंद्रिय खताचा) तंतोतंत अवलंब केला. अनुभव नसल्याने प्रयोगिक तत्वावर या २१ एकरमधील १० एकर बागेतील झाडे १ वर्षाची २।। - ३ फूट उंचीची झाली असताना पहिला बहार धरला. ऑक्टोबर (२०१४) च्या पहिल्या आठवड्यात बागेची छाटणी करून फक्त १५ दिवसांचा ताण दिला. खरेतर ताण दिल्यानंतर बागेची छाटणी केली जाते. आम्हाला हस्त बहार धरण्यास उशीर झाड होता, त्यामुळे तो लेट हस्त बहार होता. मात्र तंत्रज्ञानामुळे काडीत अन्नसाठा अगोदर तयार होऊन काडी पक्व झाल्याची खात्री झाल्यामुळे छाटणीनंतर फक्त १५ दिवसांचा ताणही बहार फुटीस पुरेसा ठरला. एरवी तो ताण किमान १ - १।। महिन्याचा द्यावा लागतो.

ऑक्टोबरचा ताण पूर्ण झाल्यावर पानगळीनंतर बेसल डोसमध्ये कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम, युरिया १०० ग्रॅम , म्युरिट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम आणि गांडूळ खत २ किलो/झाड याप्रमाणे खतांचा डोस दिला.

बागेला पाणी दिल्यानंतर जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपरऑक्सिक्लोराईड १ किलोची २०० लि. पाण्यातून प्रति एकरी ड्रेंचिंग (आळवणी) केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिझम १ लि. + जर्मिनेटर १ लि. + थाईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी बहार फुटण्यासाठी केली. त्यानंतर नवीन पालवी पिवळसर, तांबूस रंगाची असतान दुसरी फवारणी प्रिझम, थाईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम, स्प्लेंडर ३०० मिली, हार्मोनी ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून केली. या फवारणीमुळे पानांची कॅनॉपी वाढली. चौकी तयार झाली. चौकी तयार झाल्यानंतर पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम, हार्मोनी ४०० मिली, स्प्लेंडर ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून तिसरी फवारणी केली, एवढ्यावर (बहार धरल्यापासून ३५ ते ४० दिवसाचा प्लॉट असताना) कळी निघाली.

तंत्रज्ञानाने प्रत्येक झाडांवर ५० - ६० कळी निघाली. झाडे लहान होती. तरी कळी टपोरी होती. या अवस्थेत तिची गळ होऊ नये. गाठ सेटिंग व्हावी, याकरिता चौथी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम, हार्मोनी ५०० मिली, स्प्लेंडर ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून केली आणि जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिलीचे २०० लि. पाण्यातून/एकरी ड्रेंचिंग केली. त्यामुळे पांढऱ्या मुळीची कार्यक्षमता वाढली. तसेच सुत्रकृमीचा प्रादुर्भाव झाला नाही.

सरांनी सांगितले. "हा लेट हस्त असल्याने कॅनॉपीचे पोषण, फांद्यांचे पोषण, खोडाची जाडी हवी तेवढी भरू शकली नाही. त्यामुळे ४० - ५० फळेच प्रत्येक झाडावर धरली गेली." मात्र अशाही अवस्थेत तंत्रज्ञानाने संपूर्ण साथ दिले. कळी चांगली निघाली, फळांचे पोषण चांगल झाले. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. त्यानंतर जानेवारी (२०१५) महिन्यात फळे लिंबू आकाराची असतान त्याचे पोषण होयासाठी थाईवर १ लि. क्रॉपशाईनर १ लि. न्युट्राटोन १ लि. आणि हार्मोनी ५०० मिली २०० लि. पाणी याप्रमाणे फवारले. त्याने फळांचे पोषण १५० ते २५० ग्रॅम पर्यंत झाले. मार्च - एप्रिलमध्ये फळांच्या पोषणासाठी व कलरसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि राईपनर ७५० मिली २०० लि. पाण्यातून याप्रमाणे २ वेळा फवारले.

एप्रिलमध्ये तापमान ४० डी. सेल्सिअसच्या वर जाऊ लागले की, सनबर्नमुळे फळांवर लालसर - तपकिरी - काळपट चट्टे (स्कॉर्चिंग) येऊ लागले. सनबर्नमुळे चट्टा पडला की, चट्ट्यालगतचे फळाच्या आतील दाणे (Aril) पांढरे पडतात. ते गोड असतात, मात्र ते रिजेक्ट होऊन बाजारभाव कमी होते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर दक्षिणेकडील फळांभोवती वर्तमान पेपर स्टेपलर पीन मारून फळांवर संरक्षक म्हणून लावले.

याचा परिणाम सुरूवातीला संरक्षक म्हणून झाला. मात्र एप्रिलमधील अवकाळी वादळी जोराचा पाऊस झाल्याने ते पेपर फाटले. वाऱ्याने उडून इकडून - तिकडे झाडांवर अडकले. काही पेपरचे तुकडे फळांवर जाम चिकटले. नंतर हे पेपर काढणे अवघड गेले. पहिल्या २ दिवसात जेवढे पेपर काढू शकलो तेवढी फळे बचावली. मात्र जे पेपर फळांवर तसेच राहिले आणि नंतर जसे तापमान वाढायला लागले की, चिकटलेल्या पेपरचे विघटन होऊन त्या ठिकाणी काळी व पांढरी बुरशी आली. मग फळांच्या सालीवरही बुरशी वाढू लागली. त्याने फळे खराब झाली. फांद्यावर जेथे पेपर अडकले होते ते ओले पेपर जाम चिकटल्याने फांद्यावरही बुरशी वाढू लागली. त्यामुळे बाकीच्या बागेत हा प्रयोग टाळला.

सर, मला असा एक अनुभव आला की, फळे पोषणासाठी ४ - ४ तास जरी ड्रीप चालवले तरी फळांचे अपेक्षित पोषण होत नाही. मात्र याकाळात वरचेवर ३ - ४ पाऊस झाले तर अप्रतिम पोषण होते, तेव्हा याला या अवस्थेत नैसर्गिक पाऊस फार उपयुक्त ठरतो. याचे कारण सरांनी सांगितले, "झाडाला अन्नरस व पाणी गुरूत्वाकर्षणाच्या विरोधात घ्यावे लागते. त्यामुळे पोषण मनासारखे होत नाही. परंतु वरून जो निसर्गाचा पाऊस पडतो. त्याचा फळबागांना 'निसर्गोपचार' (नॅचरोपॅथी) प्रभावी झाल्याने फळांचे पोषण हे अफलातून उत्तम होते." १ महिन्याच्या ड्रिपमुळे जी पोषकता येत नाही तेवढी पाऊस झाल्यावर ४ दिवस पोषकता आल्याचे सर मी पाहिले.

या प्रयोगातून, अनुभवातून असे लक्षात आले की विदर्भातील ४० डी. सेल्सिअस तापमानात गोडी, आकार व दाण्याला रंग चांगला येतो. राजस्थानसारख्या प्रतिकुल ठिकाणीसुद्धा डॉ.बावसकर सरांच्या शाश्वत तंत्रज्ञानाने डाळींब पीक साध्य होते. त्यावरून मला हे यशस्वी करण्याची उमेद मिळाली व ती प्रत्यक्षात उतरलीही. फळांचे पोषण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ६०० ग्रॅम पर्यंत झाले. फळांना चमकही आकर्षक आली.

१० एकरातून २० टन डाळींब ११० रू. दराने ३ टन निर्यात

१५ एप्रिल २०१५ ला काढणी सुरू झाली. आय.एन.आय. फार्मस, मुंबई यांनी जागेवरून माल नेला. एकूण २० टन माल १० एकरमधून निघाला. २०० ते ६०० ग्रॅम वजनाची ३ टन फळे ११० रू. प्रमाणे निर्यात झाली. बाकीचा माल नाशिक, पुणे येथे गेला. सुरुवातीला ८० रू. किलो भाव मिळाला. जसजसे ऊन वाढले, तसा भाव कमी कमी होत शेवटी ६५ रू. पर्यंत भाव मिळाला. हा माल १०० ग्रॅमपासून २०० ग्रॅम अशा साईजमध्ये होता.

आमचा २१ एकर डाळींबाचा प्लॉट शेती खात्यामध्ये २५ वर्षे नोकरी केलेल्या सिनिअर कृषी अधिकाऱ्यांनी पहिल्यानंतर असे प्रोजेक्ट आम्ही ३५ वर्षात कधी पहिले नाही, असे गौरवोद्गार काढले.

सर, मी अनुभवले की बागेत गेल्यानंतर झाडांकडे पाहिले असता पानांच्या हालचालीवरून समजते की, झाडाला काय हवे, ते निरोगी आहे की, त्याला पाण्याची गरज आहे. जणू काही झाडे आपणाशी बोलतात असे वाटते. यावर सरांनी सांगितले, "झाडांशी आपण जेवढे एकरूप होवू तेवढी झाडे संवेदनशिलतेने आपणाशी संवाद साधतात हे मी स्वत: अनुभवले आहे. मानवी जिवनात पर्यावरणाचे कार्य झाडे, गवत ही अधिक प्रभावीपणे करतात." यावेळी सरांनी सांगिलते की, जेव्हा संत कबीर पायवाटेने हातात विळा घेवून गवत कापायला चालले होते तेव्हा ते गवत विशिष्टप्रकारे डोलू लागले. तेव्हा कबीरांनी शब्द उच्चारले की, हे गवत माझ्या हातातील विळा पाहून मला असे सांगते की, मला कापू नका. मग कबीरांनी गवत कापणे थांबविले. हा धागा धरून मानवाने वृक्ष तोड थांबवून तुकाराम महाराजांनी जसे या वृक्षवल्लीला सोयरा असे संबोधले तसे अंमलात आणले तर जगभर जो पर्यावरणाचा जागर चालला आहे तो सार्थ होईल."

सर, मला लोक म्हणाले, "जर या झाडांना फळे लागली नसती तर तुम्ही काय केले असते ?" यावर मी त्यांना सांगितले पर्यावरणासाठी वर्षात किमान ५ झाडे लावण्याचे आव्हान केले जाते. मग मला तर १ वर्षात ६ हजार झाडे लावण्याचे समाधान लाभले आहे. यावर सरांनी सांगितले. "जेवहा थॉमस एडिसनने ७४० प्रयोग केले व ते सर्व निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांना लोक म्हणाले, तुमचे कष्ट वाया गेले. तेव्हा त्या लोकांना एडिसनने सांगितले, जगातील जे संशोधक संशोधन करतात त्यांच्यासाठी यातील ७४० प्रयोगाचे निष्कर्म मी आधीच दिले आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ व श्रम वाचलेत, हेच माझ्यासाठी फार आहे. "

सरांनी सांगितले, "अर्ली हस्त बहार धरण्यात एक धोका असतो. पाऊस जर ७ जुनला पडला तर खात्रीशीर पाऊस पडणाऱ्या विभागात (विदर्भ, मराठवाडा, खानदेश) २२ जुनपर्यंत पडला व त्याचा पडण्याचा सूर, प्रवाह, क्रम जर सातत्यपुर्ण राहिला तर विदर्भात हसत धरण्यात धोका आहे. हस्त म्हणजे हत्तीचा पाऊस. अशा अवस्थेत कॉपशाईनर पण काम करत नाही, परंतु अर्धा तास जर पाऊस पडण्यापुर्वी फवारणी केली गेली तर बचाव होतो. आता हवामानाचे अंदाज बऱ्यापैकी अचूक येऊ लागले आहेत. तेव्हा त्या आधारे जर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी पाऊस पडण्यापुर्वी केली गेली तर पिकाचा प्रतिबंधात्मक बचाव होतो. आषाढ बरसला म्हणजे नदी, नाले व विहिरीला चांगले पाणी येते. धरणे भरतात, पाझर तलाव भरतात, विहिरीचे पाण्याचे श्रोत मोकळे होतात. पाणी वाढते, त्यामुळे रब्बी चांगला जातो आणि रब्बी व लेट रब्बीच्या काळातील फळपिके चांगली बहरतात. फळे डवरतात. फळे, भाजीपाल्याचा दर्जाही सुधारतो."

सर, दुसरा अनुभव असा आला की, नागपूर विभागात ५ ते १० ऑक्टोबरला परतीचा पाऊस पडतो. त्यानंतर ऑक्टोबर हिटमध्ये फुलकळी चांगली येते. सप्टेंबरमध्ये हिट (उष्णता) कमी असल्याने कळी चांगली येत नाही. तेव्हा पुढील बहारासाठी मी ठरवले आहे की, ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये (२०१५) बागेस ताण देऊन ५ ते १० ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस होईपर्यंत पानगळ करून घेणे, कल्पतरू सेंद्रिय खत देणे, पांढरी मुळी वाढवून घेणे. यासाठी प्रत्येकी १ लि. जर्मिनेटर, प्रिझम, कॉपरऑक्सीक्लोराईडचे २०० लि. पाण्यातून/एकरी ड्रेंचिंग करणार आहे. म्हणजे त्यानंतर परतीच्या पावसाने कळी चांगली व भरपूर निघेल.

पहिल्या प्रयोगात काही चुकाही घडल्या त्या अनुभवाने यावेळी सुधारून पुढेही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा नियमीत वापर करणार आहे.