२ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५५ गुंठ्यात २८ टन बटाटा १ लाख ३७ हजार, बीट ५०

श्री. बाबु गोविंद गाडगे,
मु. पो. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा.९९६०५३३०३३


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा ऑक्टोबर २०११ पासून वापर करीत आहे. प्रथम बटाट्यावर अर्ध्यातूनच याचा प्रयोग केला. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्यात ५५ गुंठ्यात २८ टन उत्पादन मिळाले. त्यापैकी २४ टन मालाची विक्री पुणे मार्केटला केली. मालाचा दर्जा उत्तम मिळाल्याने तेथे ७० रू/ १० किलो भाव मिळाला. त्यावेळी इतरांना ६० रू. चा भाव चालू होता. २४ टन मालाचे १ लाख ३७ हजार रू. मिळाले. तर ४ तन बटाटा लोकल मार्केटला विकला. विशेष म्हणजे हा बटाटा ज्या ज्या लोकांना दिला, त्यांनी नंतर आम्हाला विचारले हा बटाटा कोणता आहे ? कारण त्याचा स्वाद उत्तम होता. तेव्हा मी त्यांना सांगितले. वाण नेहमीचाच पुखराज आहे. मात्र यावेळी त्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले आहे. लोकांनी विचारल्याने माझीही खात्री झाली की, डॉ.बावसकर तंत्रज्ञान खरोखरच सर्वोच्च तंत्रज्ञान आहे. कारण यापुर्वी अशी विचारणा झाली नव्हती.

त्यानंतर मी १५ फेब्रुवारी २०१२ ला लालीमा वाणाच्या बिटाची ५० गुंठ्यामध्ये लागवड केली. त्यालाही हे तंत्रज्ञान वापरले तर २५ टन ६६५ किलो माल निघाला. त्याची वाशी मार्केटला विक्री केली. त्याला सुरुवातीला १३१ रू/ १० किलो भाव मिळाला. नंतर भाव कमी झाल्याने ८० ते ८५ रू/ १० किलोप्रमाणे भाव मिळाले. त्यापासून २ लाख २२ हजार रू. उत्पन्न मिळाले.

वरील अनुभवावरून चालू वर्षी दीड एकर पुखराज बटाटा मध्यम प्रतीच्या जमिनीत लावला आहे. त्याला कल्पतरू खताच्या ९ गोण्या व इतर पोटॅश व पालाश खताच्या ७ बॅगा दिल्या आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्य घेत आहे. आतापर्यंत ४ फवारण्या केल्या आहेत. आमच्या भागातील हवामान खूपच खराब झाल्याने अनेकांचा बटाटा करपा रोगाला पूर्णता बळी पडला असताना आमच्या प्लॉटवरील करपा आटोक्यात आहे. १० फेब्रुवारीला ३ महिने पुर्ण होत असून ३ महिन्यात काढणीयोग्य बटाटा तयार होत असल्याने १० फेब्रुवारीला काढणी करणार आहे. तर गेल्यावारर्षीपेक्षाही यंदा उत्पादन अधिक मिळेल असे पीक परिस्थितीनुसार वाटते.