शेवग्याच्या फुलगळवर व सेटिंगसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी त्यामुळे दरही चांगला


श्री. गौतम गणपती सुतार, (प्राथमिक शिक्षक, जि. प. सोलापूर) मु. पो. कळमण , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, मो.९५५२१०८१७२

मी २१ मे २०१२ ला १ एकर १० गुंठ्यामध्ये शेवग्याची लागवड केली होती. त्यानंतर झाडे २॥ फुटाची झाल्यानंतर छाटणी केली. त्यानंतर फुलकळी लागेपर्यंत २ ते ३ वेळा छाटणी चालू ठेवली. फुलकळी लागल्यानंतर ड्रीपद्वारे १९: १९:१९ आणि १२: ३२: १६ प्रत्येकी ५ किलो खत आलटून पालटून २ वेळेस दिले. त्यामुळे फुलकळी भरपूर निघाली. परंतु सेटिंग न होता फुलगळ होऊ लागले. त्यानंतर श्री. शहाजी गायकवाड यांना फोन करून वरील समस्या सांगितला असता त्यांनी प्लॉटवर येवून शेवगा पिकाची पाहणी पाहणी केली. त्यांनी शेवग्याला प्रथम पाणी कमी करण्यास सांगितले व थ्राईवर १ लि. आणि प्रोटेक्टंट पावडर ५०० ग्रॅम यांची फवारणी २०० लि.पाण्यातून करण्यास सांगितले. त्याने फुलगळ थांबल्याचे जाणवू लागले. म्हणून लगेच ८ दिवसांनी थ्राईवर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रां + बेनोमाईल २५० ग्रॅम + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. त्याने कळीगळ पुर्णत: थांबून कळीचे शेंगांत रूपांतर होऊ लागले. सध्या भरपूर माल लागलेला असून तोडेही चालू झाले आहेत. पहिला तोडा केला त्यावेळेस २७ किलो शेंगा मिळाल्या. त्या लातूर मार्केटला पाठविल्या, तेथे ८०० रू/ १० किलो भावाने विकल्या. नंतर दुसर्‍या तोड्यास ४७ किलो माल निघाला. तो ७५० रू. भावाने गेला. तिसरा तोडा ५२ किलोचा निघाला, त्याला ७०० रू. भाव मिळाला. आता चौथा तोडा करायचा आहे.

त्याचबरोबर १२ ऑगस्ट २०१२ ला अर्धा एकर शेवग्याची लागण केली आहे. त्याला देखील फुलकळी अवस्थेत फुलगळ होऊ नये म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थ्राईवर, प्रोटेक्टंटची फवारणी केली आहे. तर सध्या झाडे लहान असूनही झाडाची कुवत पाहता शेंगाचे वजन जास्त होत आहे असे सर्वांना वाटते.

Related New Articles
more...