अडीच एकर क्षेत्रात झेंडुचे १० टन उत्पादन, खर्च वजा जाता २ लाख ७० हजार रू. निव्वळ नफा !

श्री. सत्यवान पोपट गोपाळे, मु. कोल्हारवाडी (गणेशनगर), पो. थुगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे
मो. ९८२२८५९४१९, ९९७०९०३४६८


मी ११ सप्टेंबर रोजी मे. थोरात कृषी भांडार मंचर येथून 'अॅरो गोल्ड' (ईस्ट वेस्ट कं.) चे १६ पॅकेट झेंडूचे बी खरेदी केले. रोपे स्वत: तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी १०० मिली जर्मिनेटर एक लिटर पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये सर्व बियाणे ४ तास भिजवले व नंतर हे बियाणे सावलीत सुकवुन त्याची ट्रे मध्ये लागवड केली. त्यानंतर त्यात जर्मिनेटरच्या द्रावणाचे ड्रेंचींग केले. पुन्हा चौथ्या दिवशी बाविस्टीन + जर्मिनेटर याचे ड्रेंचींग केले. यामुळे ५ व्या दिवशी बुरशीविरहीत बियाण्याची १०० % उगवण झाली. रोपे उगवणीनंतर पाचव्या दिवशी जर्मिनेटर ४० मिली + थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + प्रोटेक्टंट पी १५ ग्रॅम यांची फवारणी केली. त्यानंतर पुन्हा ६ दिवसांनी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + इमिडा ७ मिली याची फवारणी केली. यामुळे बुरशीविरहीत, सशक्त, भरपुर जारवा असणारी रोपे २१ दिवसात परिपुर्ण तयार झाली.

शेती मशागत - सुरुवातीस ट्रॅक्टरद्वारे ऊभी - आडवी फणणी केली. त्यानंतर ४ ट्रॅक्टर शेणखत पसरवुन रोटरणी केली. दोन बेड मधील अंतर ४ फुट ठेवुन पाऊण फुट उंचीचे, २ फुट रुंदीचे बेड तयार केले. त्यावर कल्पतरू हे खत १० गोणी + १८:४६ - २०० किलो एकत्रितपणे बेडवर पसरवुन खुरण्याने मातीमिश्रीत केले व त्यानंतर ड्रीप पद्धतीचा वापर केला.

लागवड व उत्पादन - रोपांची बेडवर लागवड केली. दोन्ही बाजुने दोन झाडांतील अंतर २ फुट ठेवून लागवड केली. पहिली फवारणी तिसऱ्या दिवशी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली यांची घेतली. लागवडीनंतर दहाव्या दिवशी कॉपर + जर्मिनेटर यांचे ड्रेंचींग घेतले. पुन्हा लागवडीनंतर २० दिवसांनी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + प्रिझम ५० मिली + बुमफ्लॉवर ३० मिली + रोगट २० मिली याची फवारणी घेतली. यामुळे भरपुर फुटवा होऊन फुलकळी ही मोठ्या प्रमाणात लागली.

लागवडीनंतर ३७ व्या दिवशी पहिला तोडा केला त्यास १०५० किलो मालाचे उत्पादन मिळाले. त्यास ४० रू. प्रति किलो भाव मिळाला. त्यानंतर कॅब्रीओ टॉंप ३० ग्रॅम + थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + प्रिझम ५० मिली + कॅब्रीओ टॉंप ३० ग्रॅम + बुमफ्लॉवर ५० मिली याची फवारणी केली. यामुळे फुलांचे संख्येत प्रचंड वाढ झाली. दुसऱ्या तोड्यास १५६० किलो उत्पादन निघाले. त्यानंतर प्रत्येक १० ते १२ दिवसांचे फरकाने थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + बुमफ्लॉवर ५० मिली + प्रिझम ५० मिली यांची फवारणी चालू ठेवली. यामुळे फुलांचे उत्पादन हे प्रत्येक तोड्यास १८०० किलोपर्यंत पोहचले. प्रत्येक तोड्यास ३० रू. प्रति किलो ते ४० रू. प्रति किलो एवढा नं. - १ चा बाजारभाव मिळाला. आजपर्यंत १० टन मालाचे उत्पादन निघाले आहे. त्यापासून ३,५३,०००/ - उत्पन्न मिळाले असून ७२ हजार खर्च वजा जाता २ लाख ७० हजार निव्वळ नफा मिळाला आहे. यासाठी थोरात कृषी भांडार मंचर यांचे मालक अॅड. सुधाकरशेठ थोरात तसेच दुकानचे प्रतिनिधी जयसिंग वाळुंज आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. दिलीप अरगडे (९९२२३४५५९४) यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. येथुन पुढे ढोबळी मिरची, टोमॅटो या पिकांसाठी या औषधांचा मी वापर करणार आहे.