रोगट भेंडी दुरुस्त, ३० गुंठ्यात ९० हजार

श्री. विलास सुखदेव मोरे,
मु.पो. देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर.
मोबा. ९६५७५९०९९५


माझ्याकडे १२ -१३ एकर जमीन आहे. मात्र पाणी कमी असल्यामुळे अर्धोलीने शेजाऱ्याची शेती (३० गुंठे) करण्यास घेतली आहे. ती जमीन माळरान आहे. त्यांना पाणी विहीरीचे पुरेसे आहे.

या जमिनीत २७ सप्टेंबर २०१३ ला भेंडी दीड फुटाच्या सरीवर दोन्ही बाजूला ६ - ६ इंचावर लावली. भेंडी सव्वा महिन्याची असताना १८:४६ च्या २ बॅगा, पोटॅशची १ बॅग आणि युरीया १ बॅग असे खत दिले. पाणी आठवड्यातून २ वेळा देतो. ही भेंडी १३ नोव्हेंबरला चालू झाली. सुरुवातीला २ तोड्याला ८० - ९० किलो प्रत्येकवेळी निघाली. त्यानंतर व्हायरस जाणवू लागला व भेंडी फळावर फोड येऊन पांढरे टिपके आले. त्यामुळे अशी भेंडी बदल भावात जात असे. चांगल्या मालाला ४० - ४५ रू. भाव असताना अशा मालाला २० - २५ रू. भाव मिळत होता. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार व्हायरस नियंत्रणासाठी न्युट्राटोन घेऊन गेलो व त्याची फवारणी केली. तर एकाच फवारणीत व्हायरस ७० % आटोक्यात आला. त्या अनुभवातून भेंडीवरील स्पॉटवर (फळांवरीन खरबरीत फोड) थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी घेतली. तर मेंडीवरील स्पॉट (फोड आल्यासारखे उंचवटे) नाहीशे झाले.

यानंतर न्युट्राटोनची दुसऱ्यांदा व्हायरस नियंत्रणासाठी फवारणी केली. याने व्हायरस पुर्णपणे गेला व उत्पादनातही वाढ झाली. फळांचा दर्जाही सुधारला, मालाला काळोखी आली.

प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी माल तोडतो. बुधवारचा माल गुरुवारी पुणे मार्केटला येतो. तर शनिवारच्या तोड्याचा माल रविवारी पुणे मार्केटला आणतो. बुधवारच्या तोड्याला एक दिवस उशीर होत असल्याने ३२५ किलो निघतो. तर शनिवारच्या तोड्याला २२५ ते २३५ किलो माल निघतो. खरे तर तिसऱ्या दिवशी तोडा हा झालाच पाहिजे, मात्र गावातून गाडी लोड माल आठवड्यातून या दोनच दिवशी होत असल्याने आठवड्यातून दोनच वेळा माल तोडावा लागतो. आतापर्यंत १५ तोडे झाले आहेत. सुरुवातीला ४० -४५ रू. किलोच्या ५ पट्ट्या झाल्या. त्यानंतर ४ पट्ट्या ३० - ३५ रू./किलो व परत ४० - ४५ रू. ने ५ तोड्याचा माल गेला. आजचा तोडा पुन्हा भाव रिव्हर्स आले आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्याशिवाय सल्फर (६०% गंधक) ची फवारणी अधूनमधून घेतो. आठवड्याला किटकनाशक फवारत आहे. त्यामुळे भुरी व कोळी रोग येत नाही. आतापर्यंत ९० हजार रू. झाले आहेत. अजून महिनाभर तरी माल चालेल.

स्वत:च्या रानात अर्धाएकर टोमॅटो (नैना) फुलकळी अवस्थेत आहे. तर माऊली वांगी १० गुंठे आठवड्यात चालू होतील. या दोन्ही पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे.