आले मानव जातीचे आरोग्य सुदृढ करणारे हुकमी पीक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पितृपक्षात, श्राध्द, उत्तरकार्यात भारतात नैवद्यात काही कमी पडल्यास ताटास 'आले' लावतात. म्हणजे काही लावायचे राहिल्यास (उदा. भाजी, फळे) तर 'आले' लावले म्हणजे सर्व 'आले' असे म्हटले जाते. मसाला पिकांमध्ये आले आणि हळद हे मिरचीच्या खालोखाल भारतातील अग्रगण्य पीक आहे. ४००० वर्षापुर्वी नं. १ उत्पादन म्हणून मसाले हे भारतातून आखाती राष्ट्रांमध्ये निर्यात होत असत. तेव्हा अमेरिकेचा शोध लागला नव्हता. आखाती राष्ट्रात मासांहार अधिक होत असल्याने तेथे मसाल्याला मागणी जास्त होती. तसेच डच आणि पोतुर्गाल देशात मसाल्याच्या पदार्थांची मागणी वाढू लागली. यावेळी मिरी, लवंग, दालचिनी , वेलदोडा, जायफळ याबरोबर जिरे व सुंठ याची निर्यात होत असे.

आल्याचे आयुर्वेदातील महत्त्व साधारण २००० वर्षापुर्वी भारतीय ऋषीमुनींना कळले असावे. सर्दी, भूक, अपचन, डोकेदुखी, ज्वर या विविध विकारांवर आल्याचा वापर हा मध, गूळ अथवा शर्कराबरोबर आल्याचे चाटण, आल्याचा पाक यास्वरूपात तसेच आल्याची प्रक्रिया करून सुंठेचा वापर केला जाऊ लागला. त्यापासून अपेक्षित परिणामही मिळू लागले. तसे पाहिले तर आले हे 'आम आदमीचे' त्यातले त्यात स्वस्त औषधे मसाला पीक आहे. जसे कोथिंबीरीबरोबर कढीपत्ता, तसे कांदा - लसणाबरोबर 'आले' हे समीकरण फार घट्ट झाले आहे. भारतामध्ये १८ व्या व १९ व्या शतकापर्यंत बहुतांशी माणसे ही शाकाहारी होती. तेव्हा आहारात आल्याचा वापर होत असे, परंतु जसजसे १९ व्या शतकाच्या मध्यापासून धर्म, जात यांना झुगारून आधुनिक शास्त्रातून व अॅलोपॅथिक डॉक्टरांनी शरीराच्या पोषणमुल्य प्रथिनांसाठी शाकाहारापेक्षा मांसाहार उजवा ठरविला, त्यामुळे विविध धर्म, जातीच्या माणसांनी मांसाहार रूढ केला, त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये गावोगाव पाहुण्यांच्या जेवणांमध्ये तसेच राजमार्गावरील ढाब्यावर मांसाहाराचे प्रमाण वाढले आणि मांसाहाराबरोबर वाममार्गाने मद्यावे प्रमाण वाढून त्याचा दुष्परिणाम भारतीय माणसांच्या व साऱ्या मानवाच्या आरोग्यावर होऊ लागला.

अल्पसुखी, मीतआहारी, जास्त न धावणारा भारतीय हा सामान्य प्रगतीवर सुखी असे, परंतु जसजशी आधुनिकता वाढत गेली, विशेषत: इलेक्ट्रोनिक माध्यमांचा वापर जगभर वाढत गेला, तसे मानवाला सुखाच्या साधनांचे स्वरूप व प्रकार हवेहवेसे वाटू लागले. त्यानुसार माणसांची धावाधाव 'दो बिघा जमीन' मधील माणसापेक्षा अधिक गतीमान झाली. प्रगतीचा वेग पकडण्यासाठी मानवाला गती वाढवावी लागली. त्यामुळे ताणतणाव वाढू लागले. त्याची कमविण्याची क्रयशक्ती, उत्पन्नाचे स्वरूप, सुखाचे विविध प्रकार माणसाला मोहिनी घालू लागले. त्यामुळे तणाव वाढून त्याचा दुष्परिणाम मानवाच्या आरोग्यावर प्रकर्षाने होऊ लागला. यामध्ये मधुमेह, कॅन्सर, बल्ड प्रेशर, हृदयविकारे हे जगभर रूढ झाले.

आल्याचे औषधी महत्त्व

खरे पाहिले तर आल्याचा वापर आहारात केला गेला तर रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण १३० ते १४० -१५० पर्यंत वयाच्या ५० वर्षापर्यंत राहू शकते. वयाची साठी ओलांडल्यानंतर १७५ ते २०० पर्यंत राहू शकते. याला साधा उपाय दालचिनीचा वापर हा वैधांच्या सल्ल्याने आहारात रोज करणे हा आहेच. त्याचप्रमाणे अर्धा इंच आल्याचा तुकड्याबरोबर लसणाच्या दोन - तीन पाकळ्या चहा किंवा जेवणाबरोबर समाविष्ठ केल्या तर कोलेस्ट्रॉल व ब्लडप्रेशर कमी होते. परंतु ह्या साध्या गोष्टींकडे शिकलेली व अज्ञानी माणसे दुर्लक्ष करतात. मांसाहाराचे वाढते प्रमाण व त्याचबरोबर मेदयुक्त पदार्थ आहारात वाढल्याने हृदय आणि रक्तवाहिन्या आतून जाड होऊन रक्तवाहिन्यात गिठुळ्या होऊन रक्ताभिसरणावर विपरित परिणाम होऊ लागला. त्याचप्रमाणे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामधील रक्तात गाठी होऊन ब्रेन ट्युमरचे रूपांतर Brain Haemorrhage मध्ये होऊन अचानक मृत्यू येण्याचे प्रमाण वाढले.

वरील सर्व विकृतींवर नियमित आहारात आल्याचा वापर हे एक रामबाण व अत्यावश्यक आहे. तसे म्हटले तर 'आले' हे आयुर्वेदाने ७५% आरोग्य देणारे होय.

जगातील २००९ सालातील आल्याचे क्षेत्र हे ४,२७,४२३ हजार हेक्टर असून त्यापासून १६,१८,६२७ मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. भारतातील आल्याचे क्षेत्र (२००८ - २००९ मधील) १३८.४७ हजार हेक्टर असून त्यापासून ७९५.०२ हजार टन उत्पादन झाले आहे. सरासरी उत्पादकता ही ५,७६० किलो/हेक्टर अशी राहिली आहे. भारतातून २००९ - २०१० मधील आकडेवारीनुसार १२,१७५ टन आल्याची निर्यात झाली आहे. त्याची किंमत ६,९०८ लाख रुपये अशी आहे.

आले व्यापारी पीक झाले

पारंपारिक पिके भरडधान्य, तृणधान्य, व्यापारी पिके (कापूस, ऊस, तंबाखू, कांदा, बटाटा) यांचे उत्पादन व मागणी यांचा मेळ न बसल्याने उत्पन्न व भावाचे कायमच व्यस्त प्रमाण असते. त्यामुळे भाव व उत्पादनाचा गेल्या ४० ते ५० वर्षाच्या काळात मेळ बसला नाही. तेव्हा शेतकरी या पिकांना पर्यायी पीक शोधण्याचे प्रयत्न करू लागले, यामध्ये आले हे पीक परवडू शकते असे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. याला सरासरी ३० ते ३५ रुपये किलो भाव मिळत आहेत. परंतु जसजशा लागवडी जास्त होत गेल्या तसे पाण्याचे नियोजन, खतांचे नियोजन, लागवडीचे नियोजन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सातारा, सांगली, पुणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड तसेच भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, उडीसा, मेघालय, पश्चिम बंगाल, उरूणाचलप्रदेश या भागात जाऊन महाराष्ट्रातील शेतकरी प्लॉट पाहून माहिती घेवू लागले, परंतु जेव्हा लागवडीचे क्षेत्र वाढू लागले तेव्हा बेण्याची गरज भागविण्यासाठी अनेक लोकांनी पाण्याची उपलब्धता आहे तेथे सरी वरंबा व पाण्याची उपलब्धता कमी आहे तेथे गादीवाफ्यावर ठिबक सिंचनावर पाण्याची गरज भागवून लागवडी करू लागला. आल्याची लागवड एप्रिल मध्यापासून ते मे अखेरपर्यंत केली असता त्यापासून बेणे १३ ते १४ महिन्यात काढणीस येऊन बेण्याचा भाव हा ३० ते ४० रू. किलो राहिला आहे. त्यामुळे १ एकर क्षेत्रातून ४ ते ६ लाख एवढ्या रुपयाचे उत्पन्न मिळते. अजून पाच वर्ष तरी बेण्याचे पैसे शेतकऱ्यांना चांगले मिळतील. याचे दर्जेदार उत्पादनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूचे योगदान फार मोठे, मौल्यवान व रामबाण ठरत आहे.

आल्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रामबाण

ज्याठिकाणी पाणी साठते किंवा अगोदरचे पीक कांदा, बटाटा, कोबी, फ्लावर, कपाशी यावर्गातील असते त्याठिकाणी बुरशी व विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव अगोदरच्या वातावरणाने आढळतो. तेथे आले लागणे व सडणे ही समस्या येते. तेव्हा शक्यतो फेरपालट म्हणून वरील पिकाची लागवड करू नये. एवढे करूनही आले लागत असल्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सप्तामृत फवारणी, आळवणी, रासायनिक खतांचा वापर मर्यादित व सेंद्रिय खते तसेच कल्पतरूचा वापर करून प्रत्यक्ष पिकाचे नमुने दाखवून, केस पेपर तयार करून आले लागण्याच्या प्रथम अवस्थेत दाखविले असता त्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून पाण्याचे नियोजन केले असता या रोगावर मात करता येते असे आल्याचे अनेक शेतकऱ्यांना अनुभव आम्ही आले पुस्तकात दिलेले आहेत. तेव्हा सर्वांनी याचा वापर करावा म्हणजे उत्पादनाबरोबरच दर्जाही उत्तम मिळाल्याने भाव अधिक मिळतात. लागवड बऱ्यापैकी होत असताना बेणे, खत, पाणी, फवारण्या ३० ते ६० दिवसांमध्ये येणाऱ्या हिरवळीच्या खतांची पिके (धैंच्या, ताग, मेथी, मटकी, चवळी, मूग) लागवडी अगोदर घेऊन ती जमिनीत गाडावीत म्हणजे उत्पन्न व दर्जात भरघोस वाढ होते असल्याचे आढळून आले आहे.

हे पीक सर्वसामान्यांमध्ये का प्रसिद्ध होते ?

आले हे बेणे म्हणून काढले तरी १३ ते १५ महिन्यात ४ ते ६ लाख रुपये एकरी होऊन खर्च वजा जाता ३ ते ४ लाख रुपये होतात. दुसरी गोष्ट हे आले जर खुल्या बाजारात विकले तर थोडे कमी परंतु इतर पिकाच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगले पैसे होतात. तिसरी गोष्ट निर्यातीसाठी याचे उत्पान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेतले तर ५ - ७ लाख रू. निव्वळ नफा मिळू शकतो.

जगाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि एका टप्प्यावर जरी शुद्ध शाकाहारीचा प्रसार जरी वाढत असला तरी मांसाहाराचे प्रमाण तरूण पिढीमध्ये अधिक असल्याने सर्वसाधारणपणे धावत्या जगाच्या पार्श्वभूमीवर मधुमेह, हृदयविकार, विविध प्रकारचे रोग आणि एकूण बाधीत लोकसंख्या वाढत असल्याने जगभर या पिकाला मोठी मागणी येत्या ५० वर्षात राहणार आहे. तेव्हा ज्या पद्धतीने एखाद्या पिकाची आम्ही शिफारस करतो, त्यावेळी ५० वर्षाचा त्यावर अभ्यास केलेला असतो. बेण्याचा पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी, आल्याचा सामान्यांना पुरवठा, तिसरी गोष्ट मसाला पिकासाठी, चौथी बाब निर्यात करता येते. निर्यातीमध्ये मात्र हे पीक नाशवंत असल्याने या पिकाबद्दल धरसोड वृत्तीचे निर्यातीचे धोरणे पेलवणार नाही. तेव्हा तंत्रज्ञ, अभियंते विकास अधिकारी, शेतकरी वर्ग,विद्यार्थी यांनी आले पिकाचे प्रक्रिया उद्योगामध्ये संशोधन करून मानव जातीच्या कल्याणासाठी मूल्यवर्धीत (Value Addition) निर्माण करून जगभर त्याचा प्रसार, पुरवठा, मार्केटिंग करण्यामध्ये उभारी घ्यावी. यासाठी आले पुस्तक आपणास निश्चितच मार्गदर्शन ठरेल अशी आशा आहे.