निवृत्तीनंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केलेली शेतीच माझी प्रकृती सुधारेल !

श्री. गणेश मच्छिंद्र हाटावकर (बी.एस्सी.अॅग्री), मु.पो. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, मोबा. ९७३०३५७३०३

मे २०१४ महिन्यात जंगली या वाणाच्या कढीपत्त्याची ४ एकर क्षेत्रामध्ये ४ फुटाच्या पट्ट्यात १।। - १।। फुटावर लागवड केली आहे. कढीपत्त्याचे बियाणे विजयवाडा येथून आणले होते. हैद्राबादपासून ३०० किलोमिटरवर व विशाखापट्टणम पासून १०० किमी अंतरावरती हे गाव आहे. कढीपत्त्याचे बी बेड केल्यानंतर थेट जमिनीत लावले. बेड तयार करताना बेसल डोसमध्ये शेणखत, कोंबडखत, निंबोळी पेंड तसेच १०:२६:२६, १८:४६:० दिले होते. <

कढीपत्ता पिकाची लागवड केल्यानंतर ७ महिन्यात त्याची शाखीय वाढ जोमाने होऊन पहिली काढणी केली. काढणीपुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे क्रॉपशाईनर हे औषध आम्ही मे. कोळाई कृषी सेवा केंद्र, कोळगाव येथून आणून फवारले होते. त्यामुळे पानांची चकाकी वाढली होती. पानांचा स्वाद व टिकाऊपणा वाढला होता. त्यामुळे काढणीनंतर दूरच्या (पुणे/वाशी) मार्केटमध्ये कढीपत्ता नेण्यासाठी त्याचा चांगला फायदा झाला. शिवाय बाजारात कढीपत्त्याचा दर्जा उच्च प्रतिचा असल्याने इतरांपेक्षा जागेवरच व्यापारी २ रू./किलो मागे जादा भाव देवू लागले. या कढीपत्त्याची दर ४ महिन्याला काढणी करीत आहे. व्यापारी जागेवरून स्वत: कढीपत्ता घेवून जातात.

कढीपत्त्यास एकरी १० - १५ हजार रू. खर्च झाला असून पहिल्यावर्षी ७ व्या महिन्यातील पहिल्या काढणीपासून ५ टन माल निघाला. त्याचे ८० हाजार रू झाले, तर नंतर ४ महिन्यांनी ८ टन एवढे कढीपत्ता उत्पादन मिळत आहे. सरासरी १५ रू. किलो भाव मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे क्रॉपशाईनर वापरल्याने आम्हाला १७ रू./किलो असा भाव मिळाला. सध्या प्लॉट १ वर्षाचा असून पुर्णत: बहारात आहे. या प्लॉटची पाहणी व मार्गदर्शन करण्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. अमोल अभाळे आले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या क्रॉपशाईनरमुळे पाने तेजदार, हिरवीगार झाली आहेत.

Related New Articles
more...