'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी माझे मार्गदर्शक

श्री. विजय कैलास जठार,
मु.पो. मुंगुसगाव , ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९७६७८०३०७१


मी मार्च २०१४ मध्ये २ एकर हलक्या प्रतीच्या जमिनीत ५ x ६ वर टिश्युकल्चर जी - ९ केळीची लागवड केली. पहिल्यांदा बेड तयार करताना बेडमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. लागवड केल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव होत होता. त्यसाठी जर्मिनेटर सोडले, त्यामुळे मर रोग आटोक्यात आला. त्यानंतर केळी एकसारखी निघण्यासाठी सप्तामृताची फवारणी केली. त्याने केळी एकसारखी निघाली व करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला. घड निघाल्यानंतर त्यांची फुगवण होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनरसोबत राईपनर व न्युट्राटोनच्या दोन फवारण्या केल्यामुळे घडांचे वजन वाढण्यास मदत झाली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरल्याने ए-१ दर्जेची केळी मिळाली. मी. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून मासिक चालू केले असून ते दर महिन्याला घरपोहच येते. त्यामुळे मला त्याचा शेतीत जास्त प्रमाणात फायदा होतो.