खराब हवामानात इतरांच्या केळीच्या बागा खराब - उपटल्या, माझी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग सुद्दढ व उत्तम

श्री. विशाल दत्तात्रय लगड,
मु.पो. विसापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९९२१३८०३०४


मी सरकारी कर्मचारी होतो. रिटायर्ड झाल्यावर मी शेती करायला लागलो. नेहमी प्रयोगातून शेती करीत असल्याने प्रगतशील शेतकरी म्हणून पारितोषिक मिळाले आहे. आम्ही २८ फेब्रुवारी २०१४ टिश्युकल्चर जी - ९ केळीची १ एकरमध्ये ६ x ५ फुटावर लागवड केली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून ठिबक व पाट असे दोन्ही पद्धतीने गरजेनुसार पाणी देतो. या जमिनीत अगोदर ऊस होता. फेबुवारीतील लागवड असल्यामुळे ही केळी पुर्णपणे उन्हात सापडली. पाने कोमेजत होती. या केळीवर रासायनिक औषधांच्या फवारण्या करीत होतो. परंतु पीक परिस्थितीत सुधारणा जाणवत नव्हती. उन्हामुळे पाने निघत नसत व केळीची वाढ अतिशय मंद होती. तसेच लागवडीनंतर मर रोगाची लागण झाली होती. मी पृथ्वी अॅग्रो, अहमदनगर येथे सदर समस्या मांडून माहिती घेत असताना तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी भेटले. त्यांनी मला सप्तामृताची फवारणी करण्यास आणि जर्मिनेटर ड्रिपमधून सोडण्यास सांगितले, मी शेवटचा पर्याय म्हणून या कंपनीची औषधे नेली. नाहीतर केळी काढून टाकण्याच्याच विचारात होतो.

सप्तामृत व जर्मिनेटरने ५ व्या दिवशी उन्हाळ्यात केळीचे पान पुर्ण निघाले

सप्तामृताची फवारणी केल्यावर लगेच जर्मिनेटर एकरी एक लि. ड्रिपमधून सोडले. तर अवघ्या ५ व्या दिवशी केळीचे पण पुर्णपणे निघाल्याचे जाणवले व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यानंतर पुन्हा सप्तामृताची फवारणी केली. त्यामुळे ही केळी ऐन उन्हाळ्यातही चांगली वाढून पाने हिरवीगार झाली होती.

केळीचे घड बाहेर निघताना अवकाळी पाऊस झाल्याने केळीच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. घड पण निघण्यास अडचण येत होती. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची १० -१० दिवसाला २ वेळा फवारणी केली. त्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला व १ महिन्यात घड बाहेर आले.

साधारणपणे ८० - ९०% घड बाहेर आले. मी आतापर्यंत सप्तामृताच्या ६ ते ७ फवारण्या केल्या आहेत. तसेच कल्पतरू सेंद्रिय खताच्या ७ बॅग दिल्या आहेत. लागवडीपुर्वी उसाच्या पाचटाची कुटी केली होती.

घड निघतेवेळी वातावरण अतिशय खराब असल्याने आमच्या शेजारच्या केळीच्या बागेतील केळीचे घड गळून गेले. त्यामुळे काहींनी बागाच काढून टाकल्या. आमची मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने बाग पुर्णपणे वाचून सर्व झाडांवर समाधानकारक घड आहेत.