कमी - अधिक पावसातही सोयाबीन रासायनिक न वापरता दर्जेदार व यशस्वी

श्री. विलास दादासाहेब मेडशिंगे,
मु.पो. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर,
मोबा. ९८८११४६०८०


मी गेल्या ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सर्व औषधे वापरत आहे.

चालूवर्षी ९० गुंठे क्षेत्रावरती सोयाबीनच्या पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले आहे. ७ जून रोजी (महाबीज ३३५) सोयाबीन (मोग्ना) ने पेरून घेतला आणि २० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम प्रत्येकी ५० ते ६० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारले. पाऊस कमी असल्याने दररोज अर्धा तास स्प्रिंक्लरने पाणी दिले व वरीलप्रमाणे २० दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. सुरूवातीला एक महिना पाऊस नाही आणि नंतर एक महिना अति पाऊस असताना देखल सोयाबीनचा प्लॉट अतिशय चांगला होता. सप्तामृतमुळे खराब वातावरणात देखील पीक चांगले होते.

सुरूवातीला पीक घेण्यापुर्वी एक महिना बकरी (मेंढ्या) बसवली होती व स्वत: तयार केले गांडूळ खत वापरले. या व्यतिरिक्त अजिबात रासायनिक खते, औषधे वापरली नाहती. संपुर्ण सेंद्रिय सोयाबीन उत्पादन घेतले आहे. ९० गुंठे क्षेत्रातून २३ ते २४ क्विंटल सोयाबीन मिळाले. आम्ही सोयाबीन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केटमधील दराचा अंदाज घेवून विकतो. कारण ऑगस्ट - सप्टेंबरमधील दरापेक्षा क्विंटलला या काळात १००० ते १५०० रू. ज्यादा दर मिळतो. या सर्व उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कोल्हापूर प्रतिनिधींचे मार्गदर्शन मिळाले.