८ गुंठे तोंडल्यापासून ५० हजार

श्री. प्रदीप बाळासो पिसाळ,
मु.पो. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा.
फोन नं. (०२१६७) २६८०७१


तोंडल्याची लागवड ५' x ६' वर केली होती. वेली वाढीसाठी द्राक्षासारखा मांडव केला होता. काड्या जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्या. कल्पतरू १ पोते (५० किलो) वापरले. दीड महिन्यात वेलाने पुर्ण मांडव झाकला. सप्तामृताच्या १५ दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या घेतल्या, तर दिड महिन्यात तोंडली चालू झाली. मालाला ग्लेझिंग, वेलाला काळोखी, फुटवा भरपूर आहे आणि पानोपान फुले आहेत. भुरी अजिबात आली नाही. पाणी ८ दिवसांनी देतो. तोंडली वाढते, फुगते व लाल होऊ शकते. त्यासाठी तसेच भावही सापडतात. १५० ते १७५ किलो दर तोड्याला तोंडली निघतात. बाजार १६० ते १७० रू. कळीला मिळतो. एका बहाराचे ८ गुंठ्यात ५० हजार रू. झाले. तोडताना तोंडलीची कळी, मध्यम व जाड असे तीन प्रकार होतात. पानात कळी दिसत नाही. त्यामुळे काळी जाड होते. दिवसाआड तोडा करतो. पाणी कमी असताना तसेच अल्पभूधारक असताना तोंडलीसारखे पैसे देणारे कामधेनू दुसरे पीक नाही असे मला वाटते.