नवीन लागवड असो वा केळीचा खोडवा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे सर्व प्रश्नांची सोडवणूक

श्री. प्रमोद नारायणराव नेरकर,
मु.पो.वर्धा मनेरी, ता.आर्वी, जि. वर्धा - ४४२२०१
मो.नं. ९६७३४११६३६


जानेवारी २०१५ ला मी सेवाग्राम (वर्धा) मधील बापुराव देशमुख कॉलेजला झालेले कृषी प्रदर्शन पाहण्याकरीता गेलो होतो. तिथे मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कंपनीचा स्टॉल दिसला. तेथील प्रतिनिधी सुजीत सुरेशराव भजभुजे यांची भेट घेतली. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल संपुर्ण माहिती दिली आणि सोबतच केळीचे पुस्तक दिले. त्यांनतर ते माझ्या शेतावर पाहणी करण्याकरीत आलो. त्यावेळेस केळीचा एक वर्षाचा खोडवा शेतामध्ये होता. त्यावर त्यांनी सप्तामृताची फवारणी करण्यास सांगितले. त्यावेळेस केळीला कमळ लागले होते, त्यावर सप्तामृताची फवारणी केली. त्यानंतर मला असे आढळून आले की पहिल्यापेक्षा झाडाची पाने टवटवीत व चमकदार दिसू लागली आणि सोबतच कमळामधून फणी टाकण्याची क्रिया गतीशील होवू लागली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पहिलीच फवारणी होती आणि ती मला समाधान कारक वाटली. त्यामुळे मी पुढील म्हण्यात पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची ही फवारणी करण्याचे ठरविले व सुजित भजभुजे यांना शेताची पाहणी करण्यास बोलविले. त्यांनी मला थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनी ही औषधे वापरण्यास सांगितली आणि त्याची मी लगेच फवारणी केली. त्यानंतर झाडाची पाहणी केली असता प्रत्येक कमळामधून सरसरी १३ ते १४ फण्या निघाल्या होत्या. झाडावर विशेष चमक होती. विशेषता थंडी चांगली असतांना सुद्धा त्यानंतर आम्ही शेवटची फवारणी केळी पोसण्यासाठी थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाण्यामधून केली. एवढ्यावर घडांचे पोषण चांगल्याप्रकारे होऊन या खोडवा पिकापासून सरासरी २० ते २२ किलोचा घड मिळाला. त्या प्लॉटला मला ७०० झाडाला सुमारे ३८,००० रू. खर्च आला. त्यामध्ये मला १५ टन केळीचे उत्पादन झाले आणि ते मी तालुका आर्वी येथील बाजारपेठेत प्रती ९००० रू. टनाने विकले. त्यापासून मला १ लाख ३५ हजार उत्पादन मिळाले. जे मला समाधानकारक होते. तेथून मी ठरवले की सर्व शेती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पद्धतीने करायची. या अनुभवा वरून मी पुढील केळी पिकाचे नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पद्धतीने केले.

१४ मार्च २०१५ ला मी नवीन केळी प्लॉटची लागण केली. त्याकरिता जी -९ टिश्युकल्चरची रोपे वापरली. लागवड करण्याअगोदर कंपनी प्रतिनिधींनी सांगितल्यानुसार १x१x१ फुट, आकाराचे खड्डे केले. त्यामध्ये निंबोळी पेंड २०० ग्रॅम, शेणखत अर्धे टोपले (छोटे), २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिसळून ७० ते ८० टक्के खड्डा भरला. नंतर त्यामध्ये टिश्युकल्चरचे रोप खड्ड्याच्या मध्यभागी जर्मिनेटरची प्रक्रिया करून लावून झाडाभोवती माती दाबून दिली. त्यानंतर पहिल्या दिवशी १ लि. जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट- पी चे द्रावण २०० लि. पाण्यामध्ये तयार करून प्रत्येक रोपावरून दरवान मुळापर्यंत जाईल असे सोडले. सोबतच केळीला सावली करीता झाडाच्या अवती-भोवती बोरूची (तागाची) लागवड केली. उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असल्यामुळे उष्णतेचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याकरीत पहिली फवारणी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + हार्मोनी १५० मिली प्रती २०० लिटर पाण्यामधून केली. त्यानंतर युरीया ५० किलो + पोटॅश ५० किलो + सिंगल सुपर फॉस्फेट १०० किलो यांचे समीश्र मिश्रण सम प्रमाणात प्रत्येकी ५० ग्रॅम झाडांना दिले. नंतर दर ६ दिवसांनी १२:६१:० खत १ किलो + ४ किलो पोटॅश आणि युरीया ३ किलो असे चार वेळा ड्रेंचिंग केले. तसेच दर महिन्याला मॅग्नेशियम सल्फेट ४ किलो + सुक्ष्मअन्नद्रव्य २ किलो ड्रीपद्वारे दिले आणि सोबतच दर पंधरा दिवसांनी १९:१९:१९ ड्रिपद्वारे सोडले.

क्रोपशाईनर अति उष्णतेत पिकाला वरदान

त्यानंतर दुसऱ्या महिन्याला जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची प्रती २०० लि. पाण्यामधून फवारणी केली. त्यानंतर मे महिन्यामध्ये तापमान सरासरी ४७ डी. पर्यंत पोहोचले. त्याकरीता उपाय योजना म्हणून कंपनी प्रतीनिधींनी सांगितल्यानुसार १ लिटर क्रॉपशाईनर प्रती २०० लिटर पाण्यामधून ड्रेंचींग व सोबतच १५ लिटर पाण्याला ५० मिलीची वरून दर ७ दिवसांनी ४ वेळा फवारणी केली. त्यावरून असे मला आढळून आले की डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापरामुळे अतीउष्ण वातावरणातही केळीचे पीक तग धरून राहले. त्यावर अती उष्णतेचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही.

त्यानंतर तिसरी फवारणी थ्राईवर ५०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली + राईपनर २५० मिली + हार्मोनी १५० मिली + प्रोटेक्टंट-पी ५०० ग्रॅम प्रती २०० लिटर पाण्यामधून केली. त्यासोबतच जुनच्या शेवटच्या आठवड्यात हलकासा पाऊस आल्यानंतर केळीच्या अवती भोवती लावलेले बोरूचे (तागाचे) पीक हिरवळ खत मिळण्याकरीता मुळासकट काढून ते वाफ्यात गाडले.

त्यानंतर पुढील महिन्यात जोमदार वाढीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, राईपनर आणि प्रिझम प्रत्येकी १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यामध्ये टाकून चौथी फवारणी केली. त्यानंतर जोमदार वाढीसाठी व कमळ लागण्यासाठी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर १ लिटर + क्रॉपशाईनर १ लिटर + न्युट्राटोन १ लिटर + प्रोटेक्टंट- पी ५०० ग्रॅम प्रति २०० लिटल पाण्यामधून पाचवी फवारणी केली. त्यानंतर थ्राईवर १ लिटर + क्रोपशाईनर १ लिटर + राईपनर १ लिटर + न्युट्राटोन १ लिटर + हार्मोनी ३०० मिली २०० मिली पाण्यामधून फवारणी दर महिन्याला केली. एवढ्यावर मला असे आढळून आले की प्रत्येक कमळामधून सरासरी १४ ते १६ फण्या निघाल्या आहेत. घड पोसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथील बापु कुटी परिसरात आनंद भवन मध्ये श्रीमान डॉ. बावसकर सरांचे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र असल्याची नियंत्रण पत्रिका मिळाल्यावर कार्यक्रमामध्ये सरांची भेट झाली. सरांना सध्याच्या पिकाची परिस्थिती सांगितली. त्यानुसार घड पोसण्यासाठी क्रॉपशाईनर १ लिटर + राईपनर १ लिटर + न्युट्राटोन १ लिटरची फवारणी दर १५ दिवसांनी २०० लिटर पाण्यामधून करण्यास सरांनी सांगितले, त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी फवारणी केली असता सद्यपरिस्थितीत प्रत्येक घडाला १४ ते १६ फण्या आहेत व प्रत्येक घडाचे वजन सरासरी २२ ते २५ किलो आहे.

सरासरी हजार झाडांपासून सुमारे २२ ते २५ टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य परिस्थितीत आर्वी बाजारपेठेचा भाव ४ ते ४.५ हजार रुपये प्रती टन सुरू आहे. तरी १ ते १।। महिने केळी काढणीला वेळ आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानुसार दीड महिन्यांनी ७ ते ८ हजार रू. प्रती टन भाव मिळण्याची शक्यता आहे. केळीच्या होणाऱ्या उत्पादनावरून मी समाधानी आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यावर्षी केळीला बाजारभाव सुमारे ४० ते ६० % कमी आहेत. भावाचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होण्याची दाट शक्यता आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यामुळे मला केळी पिकामध्ये जाणवलेला विशेष फरक :

* रोपे व झाड सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत निरोगी व सशक्त राहून प्रतिकूल वातावरणासुद्धा मात केली.

* उन्हाळ्यामध्ये पारा ४७ डी. से. चढल्यानंतर ही निव्वळ क्रॉपशाईनरच्या वापरामध्ये अती उष्ण वातावरणातही पीक तग धरून राहिले. उष्णतेचा कोणताही परिणाम झाडावर दिसून आला नाही. कोणत्याही प्रकारची कीड किंवा विषाणुजन्य रोग आढळून आले नाहीत.

* तापमानात वाढ झाल्यानंतरही कमळ मुळ खोडापासून मोडून पडले नाही. त्यासोबतच घड मोडण्याचा प्रकार आढळून आला नाही. एरवी जेव्हा घडाचे वजन वाढते तेव्हा घड मोडण्याची दाट शक्यता असते ते आढळून आले नाही.

* डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यानंतर असे आढळून आले की, केळीचे घड लवकर वजनदार होतात व सोबतच ते निरोगी व सशक्त असतात आणि त्यावर विशेष चमक दिसून येते. याच्या वापरामुळे अतिउत्तम दर्जाची केळी तयार झाल्याचे अनुभवले.

* त्यामुळे मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी चे धन्यवाद मानतो व सोबतच कंपनी प्रतिनिधी सुजित भजभुजे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आभार मानतो. यापुढे मी सर्व शेती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ने करणार आहे व इतर माझ्या मित्रांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा सल्ला देत आहे. धन्यवाद.