ऊस सुरू, खोडवा, निडवा व गरवा कांदा उत्पादन अधिक, दर्जेदार व भावही अधिकच

श्री. मदनलाल चांदमल मुथा,
मु.पो. उरळगाव, ता.शिरूर, जि.पुणे,
मो. नं. ९८९०९२४९२९आम्ही ४ - ५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे, तर किरणामालाचे दुकान, टुरीस्ट गाड्यांचा व्यवसाय पाहून अर्धवेळेमध्ये ही शेती यशस्वीरित्या पिकवित आहे. जे पुर्णवेळी शेती करतात त्यांच्यापेक्षा उत्तमरित्या उत्पादन मी घेत आहे.

चालूवर्षी २ महिन्यापुर्वी १०' x १०' च्या सपाट वाफ्यावर ४ - ४ बोटावर गावराण फुरसुंगी कांद्याची लागवड केली आहे. जमीन चांगली आहे. माझ्याकडे एकूण लहान - मोठी २२ जनावरे आहेत. त्यामुळे शेणखत शेतात दरवर्षीच टाकत असतो. तसेच गांडूळ खताचाही वापर करतो. रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे रोपाची वाढ चांगली झाली. १।। महिन्याचा कांदा असताना पहिली खुरपणी केल्यावर सप्तामृताची पहिली फवारणी केली. सध्या (३ जानेवारी २०१६) २ महिन्याचा कांदा असून एका फवारणीवरच पात गुडघ्याला लागत आहे. पात हिरवीकच्च असून गाठ बारीक लिंबासारखी धरली आहे.

आमच्या परिसरात खराब हवामानाने ३० ते ४०% प्लॉट वाया गेले आहेत. अशा परिस्थितीत सनसवाडी ते न्हावरा या पट्ट्यात आपला कांदा १ नंबर आहे. आता हा कांदा पोसण्यासाठी आज सप्तामृत औषधे घेण्यास आलो आहे. त्याचबरोबर नवीन अर्धा एकरमध्ये उसासाठी सरी काढली आहे. त्या सरीच्या दोन्ही बाजूला कांद्याची लागवड करणार आहे. या अर्ध्या एकरला २५ गोणी गांडूळ खत आणि ४ ट्रॅाली शेणखत टाकले आहे. हा कांदा १ महिन्याचा झाल्यावर ८६०३२ वाणाच्या डोळ्याच्या उसाची लागण करणार आहे.

उसालादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर बेणे प्रक्रियेस वापरतो. तसेच पुढे २ ते ३ फवारण्यावर ऊस चांगला येतो. आता सध्या ८ ते ९ एकर निडवा (तिसरे पीक) ऊस आहे. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या आहेत. तेवढ्यावरच ऊस चांगला झाल्याने पुन्हा फवारणी केली नाही. सध्या हा ऊस ९ महिन्याचा असून २० - २२ कांड्यावर आहे. क्षेत्र भरपूर आणि इतर व्यवसाय यामुळे काही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. मजूर मिळत नाही तरी देखील डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे चांगल्याप्रकारे उत्पादन गेली ३ - ४ वर्षापासून घेत आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कांदा साठवणीत टिकेल

कांदा एकरी २०० ते २२५ गोण्या उत्पादन मिळते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कांदा गोल्टी, मध्यम आकाराचा, एकसारखा, वजनदार मिळतो. पत्ती डबल व टिकाऊ असते. त्यामुळे साठवणुकीत असा कांदा जास्त दिवस टिकतो. कांदा वजनदार मिळत असल्याने असा अनुभव आहे की ४० किलोच्या पिशवीमध्ये ५० किलो मावतो/बसतो. बाजारभाव जेथे चांगला असेल तेथे पुणे, सोलापूरला पाठवितो.

ऊस ९ -१० महिन्यात गुन्हाळाला देतो. २१५० रू./ टनाने गेल्यावर्षी भाव मिळाला. राहिलेला ऊस कारखान्याला देतो. रान १० महिन्यात खाली झाले की गहू किंवा उशिराचा रब्बीचा गरवा कांदा ही पिके घेता येतात. जानेवारीत लावलेल्या गावरान कांद्याला रोगराई कमी असते. तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३।। महिन्यात काढणीस येतो.