ना कीड ना रोग, कपाशीने दिला एकरी २४ क्विंटल चा सुखाचा योग!

श्री. विद्यानंद मारोतराव नलावडे, मु.पो. कृष्णापूर, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो. ९५५२२३१२७६


मागील वर्षी मी बी.टी. ब्रम्हा जातीची कापूस ४ एकरमध्ये भारी काळ्या जमिनीत ५ x १ वर १२ जून २०१५ रोजी लावला. त्यामध्ये तुरीचा एक तास कापसाच्या प्रति ७ तासानंतर लावले. तुषार पद्धतीने पाणी देत होतो. आमचे मेव्हणे श्री. विक्रम कलाणे पाटील, करंजी यांचे कृषी केंद्र ढाणकी बाजार येथे असून त्यांच्या माध्यमातून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. सतिश दवणे (मो.नं. ९४२३६६२६५१) यांची भेट झाली.

त्यांच्या मार्गदर्शानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर, प्रिझम या औषधांच्या १५ - २० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. तसेच जमिनीतून १०:२६:२६ आणि कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. एवढ्यावर कापसाची वाढ जोमाने होऊन पाने हिरवीगार झाली होती. त्याकाळात थ्रिप्स व तुडतुड्यांचा सगळीकडेच जास्त प्रादुर्भाव असताना माझ्या प्लॉटमध्ये त्याचा अजिबात प्रादुर्भाव झाला नाही. नंतर पीक ४० दिवसाचे असताना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृताची तिसरी फवारणी केली. त्याने फुटवा भरपूर निघून पात्या निघू लागल्या. नंतर चौथी फवारणी कापूस ६० दिवसाचा असताना कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. हे २०० लि. पाण्यातून फवारले. त्यामुळे फुलपातीची गळ आटोक्यात राहून बोंडे धरली.

बाजुच्या शेतातील कपाशी लाल्या रोगाने ग्रासली असताना आमचा प्लॉट पुर्णपणे निरोगी होता. माझी कपाशी ५ फुट उंच वाढून बोंडांच्या वजनाने झाडे वाकली होती. तेव्हा आजुबाजुचे शेतकरी आम्हाला विचारत, पाटील काय वापरले? तेव्हा त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती देऊन कंपनी प्रतिनिधी व साई श्रद्धा कृषी केंद्राला भेट देण्यास सांगितले. या कपाशीपासून मला एकरी २४ क्विंटल कापूस झाला. कापसाबरोबर मिश्रपिक तुरीलाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारत होतो, तर तुरीचे एकरी ५ क्विंटल उत्पादन मिळाले. यापुर्वी आम्हाला एकरी १० ते ११ क्विंटल कापूस पिकत होता.

आता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत असल्याने चालू वर्षीच्या कपाशीचेही गेल्यावर्षी प्रमाणेच उत्पादन मिळेल. गेल्या एक वर्षापासून या तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याने मला ते चांगले वरदान ठरले आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावे व अनुभवावे अशी मला अपेक्षा आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे खात्रीशीर उत्पादन मिळत असल्याने आपण टाकलेले पाऊल हे अचुक पडले, अशी मला खात्री आहे आणि आमचे मेव्हणे श्री. विक्रम पाटील व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी प्रतिनिधींनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाने व त्यांनी चांगल्या कंपनीची दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिल्याने आभारी आहोत.