जास्त पावसाने डाळींबाची मरू लागलेली बाग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त

श्री. उद्धव काका डोंगर,
मु.सावरगाव, पो.रामनगर, ता.जि. जालना.
मो. ९४२३७४८१९४



माझ्याकडे अडीच वर्षापूर्वी मध्यम प्रतिच्या जमिनीत १२ x १२ फुटावर लावलेले ३ एकर डाळींब असून माझे डाळींबाचे उत्पन्न चांगले आहे. परंतु या वर्षी जास्त पावसामुळे डाळींब बागेमध्ये काही दिवस पाणी साचून राहिल्याने डाळींबाची मुळकुज ने बरीचशी झाडे पिवळी पडली व पान गळ होवू लागली. अशी झाडाची नवीनच अवस्था पाहून मी थोडा घाबरली. कारण हे दुसरेच पीक होते आणि लगेचच झाडे जाऊ लागली. यावर इलाज म्हणून मी रामनगर येथील शेतकरी कृषी सेवा केंद्रामधून ट्रायकोडर्मा ५ लि. नेऊन २ वेळा सोडले. परंतु मला पाहिजे तेवढा काही परिणाम जाणवला नाही. त्यानंतर ८ दिवसांनी माझी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनी प्रतिनिधी श्री. संदीप ढेंगळे (मो.नं. ९७६५९००१०८) यांच्याशी भेट झाली. ते माझ्या शेतावर जर्मिनेटरचा डेमो देण्यासाठी आले. १० लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ८० मिली मिसळून हे द्रावण ५ - ५ लि. प्रमाणे २ झाडांना रिंग पद्धतीने गोलाकार मुळाला सोडले आणि या औषधाचा परिणाम पाहून कळविण्यास सांगितले. त्यानंतर ८ ते १० दिवसात मला एक चमत्कार पाहण्यास मिळाला. ज्या झाडांना जर्मिनेटरचे द्रावण सोडले होते त्यांनी पाने हिरवीगार, मोठी, रुंद व भरपूर प्रमाणात निघाल्याची दिसून आली. नंतर मी स्वतः ५ लि. जर्मिनेटर आणून संपूर्ण बागेला सोडले. आज रोजी माझा डाळींब बाग एकदम चांगल्या स्थितीत आहे. या अनुभवातून मी डाळींबाला बहार धरण्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.