"हळद अशी शेतात कधीच पिकली नाही," शेजारचे शेतकरी म्हणत, हरभरा, ऊस पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर

श्री. सुभाष दिवेकर (से.नि.D.Y.S.P.) उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२0६.
मो. ९८९२३३३८३८


माझ्याकडे एकूण १५ एकर जमीन आहे . मी ठाणे येथे D.Y.S.P. होतो. मला शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर आपणही शेती करू याकारणाने गावी उमरखेड येथे आलो. मात्र सुरूवातील शेतीचा अनुभव नसल्याने कोणते पीक कसे घ्यावे, याबद्दलचे ज्ञान नव्हते. तेव्हा मला आमच्या पाहुण्यांनी उमरखेड येथील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी श्री. सतीश दवणे यांचा मो. नं. (९४२३६६२६५१) दिला व भी त्यांना फोन केला असता त्यांनी मला भेट देऊन सांगितले की, साहेब तुम्ही हळद, सोयाबीन व तूर हे पीक डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने घ्या. मी ३ एकर हळद लावली. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला लागवड करण्याच्या वेळेस मी मुंबई येथे असल्याने बिजप्रक्रिया केली नाही. पण हळद लागवड झाल्यानंतर १ महिन्यानंतर मी सुरुवातीला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + ३ किलो १९:१९:१९ ची एकरी आळवणी केली असता पांढऱ्या मुळ्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊन हळदीची वाढ निरोगी एकसारखी दिवस होती. त्यानंतर प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून केलेल्या शिफारशीनुसार जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉपशाईनर २५० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट-पी १५० ग्रॅम + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे पहिली फवारणी केली. त्यामुळे पाने व फुटव्याच्या जाडीत वाढ होऊन पिकाची जोमदार वाढ दिसत होती. अशाप्रकारे मी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत सप्तामृताच्या ५ फवारण्या व २ वेळेस कल्पतरूचा त्यामुळे आमच्यासारख्या नवख्या शेतकऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ही वरदानच ठरत आहे व शेती करण्यास आत्मविश्वास निर्माण करीत आहे. तसेच आमच्या आजुबाजुचे सर्व शेतकरी म्हणत आहेत की, "साहेब तुमच्या शेतात आतापर्यंत अशा पद्धीचे पीक कधीच बहरून आले नव्हते, असे तुम्ही केले तरी काय ? आम्हालापण सांगा." आजची पिकाची परिस्थिती पाहता माझ्या हळदीचे सरासरी ३० क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. कारण लागवड करून आज ७ महिने झाले असून या ७ महिन्यात पिकावर कुठल्याही प्रकारचा करपा, टिक्का, डाग तसेच हुमणी, अळी किंवा कंद माशीचा अजिबात प्रादुर्भाव नाही, हळदीची पाने ही केळीच्या पानासारखी मोठी दिसत आहेत. आपल्या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे झाडाचा बुंधा मजबुत, जाड होत आहे. गड्डे सुद्धा चांगले धरले आहेत. ५ ते ६ फुटवे आहेत. शिवाय कल्पतरूचा एकरी ४ पोटे वापर केल्यामुळे जमिनीत गारवा निर्माण होऊन जारवा तयार झाला आहे. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे गड्डे चांगल्या प्रकारे भरत आहेत. त्यामुळे मी हरभरा व ऊस या पिकासाठी देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे.