गेल्यावर्षी एकरी कापूस २० क्विंटल इतरांना ५ ते ६ क्विंटल, तणनाशकाने गेलेली कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त होऊन एकरी १० क्विंटल उतारा

श्री. प्रितेश सुखदेव धोंगडे, मु.पो. वाठोडा, ता. जि. वर्धा,
मो. ९३२६५१४८६४


मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर गेल्यावर्षीपासून कापूस पिकावर करीत आहे. गेल्यावर्षी मी ३ एकर हलक्या प्रतिच्या जमिनीत १२ जुलै २०१५ ला ४ x १ फुटावर ५ एकरमध्ये कापूस लावला होता. मागील ३ वर्ष सतत दुष्काळ पडत होता. गेल्यावर्षी पाऊस झाला मात्र त्यामध्येही खंड पडत होता. शिवाय जमीन हलक्या प्रतीची होती. अशा परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे ३ एकरातून २० क्विंटल कापूस मिळाला होता. तर माझ्या बाजुच्या शेतकऱ्यांना फक्त ५ - ६ क्विंटल कापूस झाला.

मी कृषी विज्ञान मासिकाचा वाचक आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला. जमीन हलकी व मध्यम आहे. माझ्या शेतामध्ये सुरुवातीस तणनाशकाचा वापर केला, मात्र त्याच्या दुष्परिणामानी माझी ५ एकर कपाशी जवळपास ७५% खराब झाली. मला काय करावे कळेना. त्यानंतर मी कंपनी प्रतिनिधी गजानन भगत (मो.नं. ९०४९२१८११८) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + १० लि. पाणी याप्रमाणे आळवणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आळवणी केली. नंतर मी जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + न्युट्राटोन ५० मिली हे प्रतिपंपास घेऊन फवारणी केली. एवढ्यावर कापूस पिकात सुधारणा झाली आणि माझ्या हातातून गेलेले पीक डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे हाती आले. त्यानंतर या ५ एकराला सप्तामृताच्या ३ फवारण्या केल्या असता मला जवळपास एकरी ११ क्विंटल एवढा उतारा मिळाला.