पिवळी पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चौथ्या दिवशी हिरवीगार!

श्री. गोविंद संताराम चांदणे,
मु.पो. सोमेश्वर, ता. पालम, जि. परभणी.
मो. ७६२८४८७४७०


माझी सोमेश्वर येथे ४ एकर जमीन आहे. त्यातील १ एकरमध्ये बेडवर मी तैवान ७८६ या जातीची पपई लागवड केली आहे. पपई मी कापूस या पिकामध्ये ८ x ६ अंतरावर लागवड केलेली आहे. माझी पपई पावसामध्ये जादा पाण्याने उबळली होती. त्यातील काही झाडे वाचली व काही अति पाण्यामुळे गेली. पपई वाढ एकदम खुंटली होती व पूर्ण पपई पिवळसर दिसत होती. मी कापसाला विषारी किटकनाशकाची फवारणी केली मात्र त्याचा दुष्परिणाम पपईवर झाला. पपईची वाढ खुंटून पपई पिवळसर पडली. या वेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. सय्यद (मो. ९१६८२११३७६) आम्हाला भेटले, त्यांना आम्ही आमची पपई दाखवली व त्यांनी आम्हाला कल्पतरू ५० किलोच्या २ बॅग आणि जर्मिनेटर व प्रिझम हे औषधे फवारण्यास सांगितले.

आम्ही दुसऱ्या दिवशी पालम येथील धनलक्ष्मी अॅग्रो एजन्सी येथून ते आणले व पपईला कल्पतरू खत टाकले व औषध फवारले, तर तेथून चौथ्या दिवशी आमची पपई अक्षरश: हिरवीगार होऊन वाढ सुरू झाल्याचे जाणवले व आम्ही सय्यद सरांना फोन करून बोलावले व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पपईला फवारणीसाठी पुढील औषधे आणून फवारणार आहोत. संध्या माझी पपई ४ महिन्यांनी आहे व मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी शेवटपर्यंत वापरणार आहे. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरावे.