जर्मिनेटरमुळे उसाची उगवण अतिशय चांगली की, अशी कधीही मिळाली नाही !

श्री. सचिन नवनाथराव गुजर,
मु.पो. नायगाव, ता. केज, जि. बीड - ४३१११५.
मो. ९६०४७७८७५५


मागील ४ वर्षामध्ये सतत कमी पाऊस काळामुळे बागायती पिके घेणे अशक्य झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आणि खात्रीशीर उत्पन्न देणारे ऊस पीक गेलेच. सुदैवाने या वर्षी पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे वंजारा प्रकल्प १००% भरला. त्यामुळे ऊस लागवडीचा मार्ग किमान ३ वर्षाकरीता मोकळा झाला.

ऊस लावण्याची इच्छा असूनही बेणे मिळत नव्हते. प्रयत्न करून ८६०३२ ही जाते लागवडीसाठी निवडली. परंतु बेण्याचे भाव ४ ते ५ हजार रु./टन असल्याने लागवडीचा खर्च काटकसर करून कसा कमी करायचा हे शेतकऱ्यांसमोरील आव्हानच होते. उसाची लागवड करण्यापुर्वी शेताची मशागत केल्यानंतर मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा.लि. कंपनीचे प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो.नं. ८३०८८५१३८८) यांची शेतकरी कृषी सेवा केंद्र अॅण्ड मशीनरी मध्ये भेट झाली. यावेळी त्यांनी मला ऊस लागवडीसाठी जर्मिनेटरचा बेणे प्रक्रियेमध्ये वापर तसेच कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर उसाला कसा फायदेशीर आहे हे सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर्मिनेटरची बेणे प्रक्रिया करून ६ नोव्हेंबर २०१६ रोजी ४ x १ फुटावर ५० गुंठ्यामध्ये ऊस लागवड केली. जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे ऊस बेणे तोडल्यापासून ५ - ६ दिवसांनी ऐन थंडीत लावले असतानाही अवघ्या सातव्या दिवशी कोंब दिसण्यास सुरुवात होऊन १८ ते २० दिवसामध्ये माझ्या उसाची १००% उगवण होऊन रोपांची उंची एकसमान दिसायला लागली. मी आतापर्यंत बऱ्याच वेळी वेगवेगळ्या वाणांची लागवड करून देखील १००% उसाची उगवण कधीच झाली नव्हती. लागवडीच्या वेळी एकरी १०० किलो कल्पतरू खत वापरल्यामुळे जमीन भुसभुशीत राहिल्याने पाटपाणी असतानाही जमीन वाफश्यावर येते. सततच्या वाफसा अवस्थेमुळे पिकाची वाढ चांगली होते.

या अनुभवातून पुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर चालू ठेवणार आहे.