डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने वांग्याचे चांगले उत्पादन

श्री. पांडुरंगराव बाराहाते,
मु.पो. खापरी, ता. सेलू, जि. वर्धा.
मो.९६०४८५१०२४


मी पारंपारिक शेती करीत होतो. पण ते परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे मागच्यावर्षी पार्थ अॅग्रो एजन्सी येथे भेट दिली व त्यांनी काही पिकांविषयी माहिती दिली. त्यानुसार मागच्यावर्षी मी वांगी, टोमॅटो, भेंडी या पिकांची लागवड केली. या पिकांना बऱ्यापैकी भाव मिळाल्याने परवडले. त्यामुळे चालू वर्षी पार्थ अॅग्रोचे आदमाने यांच्या मार्गदर्शानुसार वांगी आणि टोमॅटोचे बियाणे घेत असताना त्यांनी बियाला बिजप्रक्रिया करण्यासाठी जर्मिनेटर दिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या बियांना जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून रोपासाठी बी टाकले. जर्मिनेटरमुळे उगवणशक्ती वाढून सर्व बी एकसारखे उगवले. रोप एकसारखे जोमदार दिसत होते. रोप १५ दिवसांचे असताना राजेश आदमाने यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधींना प्लॉटवर पाठवले. त्यांनी रोपांची पाहणी करून थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ३० मिली + स्प्लेंडर १० मिली + रेस या औषधांची फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार ८ - ८ दिवसांनी दोन वेळा वरील प्रमाणे फवारण्या केल्या. त्यामुळे रोपांवरील नागआळी व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आला. त्यानंतर टोमॅटो व वांग्याची लागवड २५ मे २०१६ रोजी माध्यम प्रतिच्या जमिनीत २।। x २ फुटावर केली. त्यानंतर कंपनी प्रतिनिधी श्री. कुकडे (मो.नं.७५०७५०३११७) यांना फोन करून प्लॉटवर बोलावून घेतले. त्यांनी मला लागवड चांगल्याप्रकारे झाल्याचे सांगून त्याची मर न होता वाढ होण्यासाठी जर्मिनेटर व ब्ल्यु कॉपर यांची ड्रेंचिंग करण्यास सांगितले. नंतर मी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. + ब्ल्यु कॉपर १ लि. ची २०० लिटर पाण्यातून ड्रेंचिंग केली. त्याने रोपांचा जारवा (पांढरी मुळी) वाढून वाढ सुरू झाली. त्यानंतर १० -१२ दिवसांनी थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम प्रती पंप याप्रमाणे वांगी व टोमॅटोवर फवारणी केली. त्याने दोन्ही पिकांची वाढ निरोगी, जोमाने झाली. त्यानंतर १५ - १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या शिफारशीनुसार केल्या. तेवढ्यावर वांग्याचे तोडे चालू झाले. टोमॅटो देखील सुरू झाले. वांग्याचा पहिला तोडा १५ कट्टे निघाला. त्याला ३०० ते ४०० रु. मन (४० किलोस) भाव मिळाला. त्यानंतर कुकडे साहेबांनी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + प्रिझम ३० मिली + न्युट्राटोन ४० मिली + राईपनर ४० मिली / पंप याप्रमाणे फवारणी करण्यास सांगितले. ही फवारणी केल्यानंतर ४ दिवसांनी वांग्याचा तोडा केला असता मालाचे प्रमाण वाढून ३० कट्टे निघाला. पुढे ही नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेतल्याने चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले. त्यामुळे भाव कमी असतानाही परवडले.

वांगी, टोमॅटो बरोबरच कापसावर देखील कुकडे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार कॉटन थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनरच्या फवारण्या घेतल्या. त्यामुळे कपाशीला नेहमीपेक्षा अधिक बोंडे लागली होती.