आम्ही जगभर एवढे प्लॉट पाहतो मात्र एवढा उत्कृष्ट प्लॉट पहायला मिळाला नाही- इस्राईल शास्त्रज्ञ

डॉ. अरुण पाटील, (M.Sc. Ph. D. Physics)
मु. पो. चिंचखेड, ता. साक्री, जि. धुळे.
मोबा. ९८५०२३०२३४


मी इंग्लंडमध्ये १५ वर्षाहून अधिक काळ गणित व फिजिक्सचा प्राध्यापक होतो. भारतात आल्यानंतर नोकरी करीत असताना गावाकडील शेतीकडेही लक्ष होते. आम्ही आमच्या चिंचखेड येथील शेतात डाळींब, कांदा, बाजरी, कापूस, तूर या पिकांना डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतो. ज्यावेळेस इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी आमच्या प्लॉटला भेट दिली, तेव्हा नुकत्याच झालेल्या पावसातही शेजारचे कांद्याचे रोप सडले होते. डाळींबावर डाग पडले होते. आमच्या मात्र कांद्याच्या रोपात पाणी साचलेले असतानाही रोपे टवटवीत हिरवीगार, डाळींबावर डाग नाहीत हे पाहून ते आश्चर्यचकीत होऊन म्हणाले की, "आम्ही जगभर एवढे प्लॉट पाहतो त्यामध्ये एवढे उत्कृष्ट प्लॉट आम्हाला कधीच पाहायला मिळाले नाहीत," याबद्दल त्यांनी विचारले असता आम्ही या सर्व पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत असल्याचे औषधाचे कॅन त्यांना दाखविले. त्यावरून या तंत्रज्ञानाच वापर आमच्या देशासाठी (इस्राईलसाठी) भारत सरकारला शिफारस करून जरूर करू व आमचाही माल याच प्रतीचा निर्माण करून साऱ्या जगभर निर्यात करू, असे इस्राईलचे शास्त्रज्ञ म्हणाले.